Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Health Tips : ENT तज्ज्ञांनी सांगितला पावसाळ्यात सर्दी- खोकल्याला लांब ठेवण्याचा उपाय; वेळीच तब्येत सांभाळा

Health Tips : ENT तज्ज्ञांनी सांगितला पावसाळ्यात सर्दी- खोकल्याला लांब ठेवण्याचा उपाय; वेळीच तब्येत सांभाळा

Health Tips : साधारण पावसाळ्यात पसरणारे आजार पाणी, हवा आणि दुषित अन्नामुळे पसरतात.  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 12:41 PM2021-07-30T12:41:18+5:302021-07-30T12:50:06+5:30

Health Tips : साधारण पावसाळ्यात पसरणारे आजार पाणी, हवा आणि दुषित अन्नामुळे पसरतात.  

Health Tips : How to prevent from cough cold and flu in rainy season | Health Tips : ENT तज्ज्ञांनी सांगितला पावसाळ्यात सर्दी- खोकल्याला लांब ठेवण्याचा उपाय; वेळीच तब्येत सांभाळा

Health Tips : ENT तज्ज्ञांनी सांगितला पावसाळ्यात सर्दी- खोकल्याला लांब ठेवण्याचा उपाय; वेळीच तब्येत सांभाळा

Highlightsबरेच लोक आहेत ज्यांना आधीच सर्दी किंवा फ्लूचा त्रास आहे. संसर्गापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, अशा लोकांपासून स्वतःला दूर ठेवणे आवश्यक आहे.

पावसाळा आल्यानं सर्दी, तापाची लक्षणं अनेकांमध्ये दिसायला सुरूवात होते. कमकुवत रोगप्रतिकारकशक्तीमुळे वयस्कर लोक आणि लहान मुलं, महिलांना आजारांचा सामना करावा लागतो. पावसाळ्याच्या वातावरणात बॅक्टेरिया आणि व्हायरसचं संक्रमण दुप्पटीनं वाढतं त्यामुळे हानिकारक सूक्ष्मजीव वाढण्याची  शक्यता असते. साधारण पावसाळ्यात पसरणारे आजार पाणी, हवा आणि दुषित अन्नामुळे पसरतात.  

या हंगामात हवेतून होणाऱ्या विषाणूंच्या प्रसारामुळे अनेक आजार होऊ शकतात. म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.  बरेच लोक आहेत ज्यांना आधीच सर्दी किंवा फ्लूचा त्रास आहे. संसर्गापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, अशा लोकांपासून स्वतःला दूर ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय वैयक्तिक स्वच्छतेकडेही लक्ष द्यायला हवं. 

सतत तोंडाला हात लावू नका

आपले हात वारंवार धुवा. हात साबणाने किंवा साध्या पाण्याने धुवावेत. वाटल्यास आपण हँड सॅनिटायझर देखील वापरू शकता. मास्कला वारंवार स्पर्श करू नका. कारण कोणताही संसर्ग नाका तोंडाच्या माध्यमातून वेगानं पसरतो. 

घराला हवेशीर आणि बॅक्टेरिया फ्री ठेवा

पावसाळ्याच्या दिवसात  घरात जितकी जास्त हवा येते तितकं चांगले. त्यामुळे घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा. आपण ज्याला स्पर्श करता त्या पृष्ठभागाची नियमित साफसफाई करुन पृष्ठभाग जीवाणू मुक्त करा. दरवाजा लॅच, कीबोर्ड आणि अगदी मोबाईल फोन साफ ​​करण्यासाठी वेळोवेळी अल्कोहोलिक जंतुनाशक वापरावे. कारण अशा पृष्ठभागावर फ्लू विषाणूंची वाढ होण्याची शक्यता असते.

गरम पाण्याचे सेवन

पावसाळ्यात पाण्याच्या स्वच्छतेबाबत विशेष काळजी घ्यावी. म्हणून या हंगामात वारंवार गरम पाणी पिण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास, आपल्या पिण्याचे पाणी आपल्याबरोबर कामावर किंवा शाळेत घेऊन जा. लक्षात घ्या की कोणत्याही प्रकारचे संक्रमण टाळण्यासाठी फक्त बाटली किंवा फिल्टर केलेले पाणी प्या. जर हे शक्य नसेल तर पाणी उकळून ते थंड झाल्यावर प्या.

शिंकताना तोंडावर रूमाल ठेवा

या हंगामात व्हायरस आणि बॅक्टेरिया टाळण्यासाठी, व्हायरस इतरांमध्ये पसरण्यापासून रोखणे आवश्यक आहे. विशेषत: जर तुम्हाला सर्दी किंवा खोकला असेल तर शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड हाताने किंवा स्वच्छ रुमालाने झाकून ठेवा. पावसाळ्यात थंडी वाजणं खूप सामान्य आहे. म्हणूनच, आपल्या मुलांना आजारी माणसांच्या जवळ जाऊ न देणे हा संसर्ग टाळण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

रोग प्रतिकारशक्ती मजबूत ठेवून, आपण व्हायरसच्या संक्रमणापासून वाचू शकता. यासाठी तुम्ही व्हिटॅमिन सी युक्त  फळे खाणे आणि लिंबूपाणी पिणे चांगले. चांगल्या प्रमाणात पाणी पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होईल. आपल्या शरीरावर संक्रमणास लढायला तयार करण्यासाठी जास्तीत जास्त विश्रांती घ्या.

डासांपासून असा करा बचाव

डास हे आज रोगांचे मुख्य कारण आहे. म्हणूनच, पाऊस सुरू होताच आपला पहिला प्रयत्न डासांना टाळण्याचा असावा. यासाठी तुम्ही झोपताना मच्छरदाणी आणि डासांच्या कॉइल्सचा वापर करा. तसेच, तुमच्या घरात आणि आजूबाजूला डास जमा होऊ देऊ नका. पावसाळ्यात आजारी पडण्याचा धोका खूप जास्त असतो. म्हणून, स्वतःची तसेच लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्या. जर रोगाची लक्षणे गंभीर दिसत असतील तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा. सर्दी आणि खोकल्यापासून दूर राहा आणि सुरक्षित रहा.

Web Title: Health Tips : How to prevent from cough cold and flu in rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.