Join us   

इम्यूनिटीसाठी काढा पिणारे सर्वाधिक लोक करतात या ५ चुका; संसर्ग टाळण्यासाठी वेळीच जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 1:33 PM

Health Tips : कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेपासूनच लोक स्वत:चा संसर्गापासून बचाव करण्यासाठी काढा पिण्यावर अधिक भर देत आहेत.

आपली रोगप्रतिकारकशक्ती आजारांपासून लढण्याची शक्ती देते. कोरोना व्हायरसचा वाढता  धोका लक्षात घेता  डॉक्टरांकडून काढा पिण्याचा सल्ला दिला जात होता. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार नकळतपणे लोक काढा बनवताना काही चुका करत आहेत. त्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरित परिणाम होत आहे. कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेपासूनच लोक स्वत:चा संसर्गापासून बचाव करण्यासाठी काढा पिण्यावर अधिक भर देत आहेत. इम्यूनिटी वाढवण्याासाठी घेतल्या जात असलेल्या काढ्याचे अतिसेवन किंवा त्यातील  गुणकारी तत्वांचं अयोग्य प्रमाण  शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. (Immunity booster kadha against omicron 5 side effects)

१) तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार काढा घेत असलेल्यांनी वय, हवामान आणि आरोग्य या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. नाकातून रक्त बाहेर येणं, एसिडिटी, मुत्र विसर्जन, पचनक्रियेसंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशा स्थितीत तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

२) काढा तयार करताना बरेच लोक काळी मिरी, दालिचीनी, हळद, गुळवेल, अश्वगंधा, वेलची आणि सुंठाचा वापर करतात. तुमच्या शरीराला गरम ठेवण्यासाठी या पदार्थांचे सेवन फायदेशीर ठरते. पण अतिसेवन केल्यास शरीराचं तापमान अचानक वाढल्यानं नाकातून रक्त बाहेर येणं, एसिडिटी यांसारख्या समस्या जाणवू शकतात.

३) काढा तयार करण्यासाठी तुम्ही ज्या पदार्थांचा वापर करत आहात त्याचं संतुलन असणं गरजेचं आहे. जर काढा प्यायल्यानं तुम्हाला कसलाही त्रास होत असेल तर त्यात दालचिनी, काळी मिरी या मसाल्यांचं प्रमाण कमी ठेवा.

४) सर्दी, खोकल्यासाठी काढा खूप फायदेशीर मानला जातो. ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी काढा पिताना सावधगिरी बाळगायला हवी. मसाल्यांचा वापर कमी प्रमाणात करावा.

५) जर तुम्ही नियमित काढा घेत नसाल तर कमी प्रमाणात घेणं उत्तम ठरेल. काढा बनवताना १०० मिलीलीटर पाणी घ्या. त्यात सर्व पदार्थ घालून उकळून घ्या नंतर हे पाणी अर्ध होईपर्यंत वाट पाहा नंतर गाळून गरमागरम काढ्याचे सेवन करा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल