Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Health Tips : सकाळी नाक गळतं, डोळे चुरचुरतात? डॉ. नेनेंनी सांगितले हिवाळ्यात ऍलर्जीला लांब ठेवण्याचे सोपे उपाय

Health Tips : सकाळी नाक गळतं, डोळे चुरचुरतात? डॉ. नेनेंनी सांगितले हिवाळ्यात ऍलर्जीला लांब ठेवण्याचे सोपे उपाय

Health Tips : अनेकदा ऍलर्जीचं कारण समजण्यासाठी डॉक्टर रक्त तपासणी करण्याचा सल्ला  देतात.  स्किन एलर्जेन टेस्टच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला ऍलर्जी होण्यासाठी कारणीभूत ठरत असलेल्या घटकांचा शोध घेतला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 04:50 PM2021-12-22T16:50:53+5:302021-12-22T17:17:58+5:30

Health Tips : अनेकदा ऍलर्जीचं कारण समजण्यासाठी डॉक्टर रक्त तपासणी करण्याचा सल्ला  देतात.  स्किन एलर्जेन टेस्टच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला ऍलर्जी होण्यासाठी कारणीभूत ठरत असलेल्या घटकांचा शोध घेतला जातो.

Health Tips : Madhuri's husband Dr. Nene suggests an easy way to keep colds and coughs long in winter | Health Tips : सकाळी नाक गळतं, डोळे चुरचुरतात? डॉ. नेनेंनी सांगितले हिवाळ्यात ऍलर्जीला लांब ठेवण्याचे सोपे उपाय

Health Tips : सकाळी नाक गळतं, डोळे चुरचुरतात? डॉ. नेनेंनी सांगितले हिवाळ्यात ऍलर्जीला लांब ठेवण्याचे सोपे उपाय

हिवाळ्याचा ऋतू सगळ्यांनाच हवाहवासा वाटणारा असतो. पण वातावरणात बदल होताच सर्दी, खोकल्याची ऍलर्जी जाणवते. सतत शिंका येणं, नाक चोंदणं, नाकात खाज येणं, पाणी गळणं, डोळे चुरचुरणं अशा समस्या वाढत जातात. त्यामुळे चिडचिड तर होतेच पण  संपूर्ण दिवसही खराब जातो.  अभिनेत्री माधुरी दिक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर सीजनल एलर्जीवर उपाय सांगितले आहेत. (Dr. Nene suggests an easy way to keep colds and coughs long in winter)

एलर्जीपासून बचावासाठी काय करायचं?

डॉ. नेने यांनी व्हिडीओमध्ये दिलेल्या माहितीनुसार आपण आपल्या शरीराच्या साफ सफाईकडे विशेष लक्ष द्यायला हवं. सोफा कव्हर, बेडशीट नियमित बदलत राहणं, स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे.  ऍलर्जी सतत होत असेल तर नाकाच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यायची.

नाक साफ करण्यासाठी कोणत्याही भांड्यात पाणी घेऊन त्यात नाक घाला आणि लगेच बाहेर काढा. ऍलर्जी निर्माण करणारे कण नाकातून निघून जातील. जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट फुलाच्या परागकणांपासून ऍलर्जी असेल तर त्यापासून लांब राहा. हिवाळ्यात जास्त त्रास होत असेल तर घरातून बाहेर निघणं टाळा.

 

डॉक्टरांकडे कधी जायला हवं?

डॉ. नेने सांगतात की एलर्जीचा त्रास वाढत असेल तर लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा.  तुमच्या ऍलर्जीचा पूर्ण इतिहास समजून घेऊन डॉक्टर उपचार सुरू करतील. अनेकदा ऍलर्जीचं कारण समजण्यासाठी डॉक्टर रक्त तपासणी करण्याचा सल्ला  देतात.  स्किन एलर्जेन टेस्टच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला एलर्जी होण्यासाठी कारणीभूत ठरत असलेल्या घटकांचा शोध घेतला जातो.

या टेस्टमध्ये व्यक्तीला त्वचेच्या वेगवेगळ्या एलर्जेनवर ठेवलं जातं.  ज्या एलर्जेनवर त्वचेवर लाल चट्टे येतात किंवा कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया येते. अशावेळी व्यक्तीला एलर्जेनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.  डॉ. नेने सांगतात की  स्थिती नियंत्रणाबाहेर असल्यास डॉक्टर स्टेरॉइड्सचा डोस घेण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांच्या सल्लानुसार ऍलर्जीच्या त्रासासाठी स्टेरॉईड घेणं सुरू करायला हवं. 

Web Title: Health Tips : Madhuri's husband Dr. Nene suggests an easy way to keep colds and coughs long in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.