दुकानांमध्ये पाकिटात मिळणारे बटाट्याचे गोल्डन पांढऱ्या रंगाचे चिप्स लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात. बाहेर प्रवासाला निघाल्यावर तर हमखास वेगवेगळ्या चिप्सची पाकिटे आपण हौसेने घेतो. हॉटेलमध्ये गेल्यावर जेवण येण्यापुर्वी बरेच जण फ्रेंच फ्राईज मागवतात. कधीतरीच हे पदार्थ खात असाल, तर हरकत नाही. पण वारंवार या पदार्थांचं खाणं होत असेल तर मात्र याविषयी डॉक्टर काय सांगत आहेत, हे एकदा बघायलाच हवं. (Side effects of deep frying potato for making French fries and potato chips)
या विषयीचा व्हिडिओ एका डॉक्टरांनी drdimplejangda या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
त्या म्हणतात की चिप्स किंवा फ्रेंच फ्राईज करण्यासाठी आपण बटाटे डिप फ्राय करतो. त्यामुळे त्यातून acrylamide हा विषारी पदार्थ तयार होतो. जेव्हा आपण बटाटे गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत तळतो तेव्हा त्यातले व्हिटॅमिन्स आणि इतर पौष्टिक घटक तर नष्ट होतातच. पण ते पचायलाही खूप कठीण होतात.
acrylamide चे अनेक दुष्परिणाम शरीरावर होत असतात. त्यामुळे मज्जा संस्थेचे कार्य बिघडते nerve damage. शिवाय स्नायूंना थकवा येण्याचा त्रासही सुरू होतो.
परीक्षेच्या आधी मुलांना खाऊ घाला ५ पदार्थ, एकाग्रता वाढेल आणि पाठ केलेलं आठवेल भरभर
त्यामुळे बटाटा तळून तो खाणे शक्य तेवढे टाळावे. त्याऐवजी उकडलेला बटाटा खाणे अधिक पौष्टिक असंही डॉक्टरांनी सांगितलं. घरी जर बटाट्याचे चिप्स किंवा फ्रेंच फ्राईज करणार असाल तर बटाटे अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. त्यामुळे त्यातल्या acrylamide चं प्रमाण कमी होईल, असा उपायही डॉक्टरांनी सांगितला.