Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Health Tips :  नसांमधील ब्लॉकेज हटवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'हे' ८ पदार्थ; ब्‍लड सर्क्युलेशनही होईल वेगानं

Health Tips :  नसांमधील ब्लॉकेज हटवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'हे' ८ पदार्थ; ब्‍लड सर्क्युलेशनही होईल वेगानं

Health Tips : शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित होत नसेल तर काही लक्षणं दिसून येतात. मासपेशीत वेदना होणं, हात पाय सुन्न पडणं, पचनासंबंधी आजार, हातापायांमध्ये वेदना जाणवणं या लक्षणांचा यात समावेश होतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 02:18 PM2021-08-05T14:18:37+5:302021-08-05T14:31:32+5:30

Health Tips : शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित होत नसेल तर काही लक्षणं दिसून येतात. मासपेशीत वेदना होणं, हात पाय सुन्न पडणं, पचनासंबंधी आजार, हातापायांमध्ये वेदना जाणवणं या लक्षणांचा यात समावेश होतो.

Health Tips: These 8 vegetables will be useful to remove blockages in the veins; Blood circulation will also be faster | Health Tips :  नसांमधील ब्लॉकेज हटवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'हे' ८ पदार्थ; ब्‍लड सर्क्युलेशनही होईल वेगानं

Health Tips :  नसांमधील ब्लॉकेज हटवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'हे' ८ पदार्थ; ब्‍लड सर्क्युलेशनही होईल वेगानं

शरीरात खराब रक्ताच्या संचारामुळे वेगवेगळ्या प्रकारचे धमन्यांचे रोग, लठ्ठपणा, डायबिटीस या आजारांचा सामना करावा लागू शकतो. शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित होत नसेल तर काही लक्षणं दिसून येतात. मासपेशीत वेदना होणं, हात पाय सुन्न पडणं, पचनासंबंधी आजार, हातापायांमध्ये वेदना जाणवणं या लक्षणांचा यात समावेश होतो. अशा स्थितीत शरीरात योग्यप्रकारे रक्तप्रवाह सुरू ठेवण्याासाठी लोक औषधं किंवा व्यायामाचा आधार घेतात. जर तुमच्या शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित होत नसेल, तर काही खाद्यपदार्थ फायदेशीर ठरू शकतील. ८ प्रकारच्या भाज्यांचा आहारात समावेश करून तुम्ही स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवू शकता.

कांदा

कांद्याच्या सेवनानं अनेक  समस्यांपासून आराम मिळतो याबाबत तुम्ही ऐकून असालच. कांद्यात फ्लेवोनोईड आणि एंटीऑक्सिडेंट्स असतात जे हृदयाचे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. अलिकडेच प्रयोगासाठी २३ पुरूषांना तीन दिवसांपर्यंत ४.३ ग्राम कांद्याचे सेवन करण्यास सांगितले होते.  त्यानंतर असं दिसून आलं की कांद्याच्या सेवनानं ब्लड सर्क्यूलेशन व्यवस्थित होत आहे.  कांद्यात एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात ते रक्तासह धमन्यांमध्ये आलेली सूज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

दालचिनी

तुम्ही आतापर्यंत भाज्यांमध्ये मसाला म्हणून दालचिनीचा वापर केला असेल. अनेक अभ्यासातून असं दिसून आलंय की दालचिनी रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी फायदेशीर ठरते. उंदरांवर करण्यात आलेल्या एका परिक्षणात दालचिनीमुळे रक्तप्रवाहात सुधारणा झाल्यानं नोंदवण्यात आलं.  दुसरीकडे मधुमेह असलेल्या रुग्णांना दालचिनीचे सेवन करण्यास सांगितले, त्यानंतर सिस्टोलिक ब्लड प्रेशरमध्ये कमतरता असल्याचं दिसून आलं. 

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या जसे पालक, मेथी, शेपू यांचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील रक्तभिसारण सुधारू शकते. वास्तविक या भाज्यांमध्ये नायट्रेट आढळते. ज्याचे शरीरात नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर होते. हे एक अतिशय शक्तिशाली वासोडिलेटर आहे, ज्याद्वारे रक्तवाहिन्या पसरतात आणि रक्त परिसंचरण वाढते.

टॉमॅटो

रक्तवाहिन्या आणि रक्ताभिसरण यासाठी टोमॅटोचा वापर हा एक उत्तम पर्याय आहे. खरं तर, टोमॅटोमध्ये असलेले गुणधर्म एंजियोटेनसिन रूपांतरित एंजाइमची क्रिया कमी करतात.  टॉमॅटोचे सेवन आपल्या रक्तवाहिन्या संकुचित होण्यापासून प्रतिबंधित करते आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते. याशिवाय ट़ॉमॅटोमधील इतर पोशक तत्व शरीर उत्तम ठेवतात.

लसूण

लसूण फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर एक औषधी वनस्पती आहे. त्याच्या सेवनाने तुमच्या शरीरातील रक्त परिसंचरण देखील सुधारते. नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासानुसार लसणामध्ये अॅलिसिन असते जे सल्फर कंपाऊंड आहे. हे आपल्या रक्तवाहिन्यांना आराम देते आणि रक्त परिसंचरण सुधारण्यासाठी कार्य करते.

बीट

बर्‍याच समस्यांसाठी बीटरूटचे सेवन फायदेशीर मानले जाते. खेळाडून विशेषतः बीटरूटचा रस किंवा पावडर वापरतात ज्यामुळे शरीर चांगले राहते, कार्यपद्धती सुधारते. याचे कारण असे की बीटरूटमध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असते आणि जे तुमचे शरीर नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित करते. हेच नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्यांना आराम देऊन मसल्स टिश्यू आणि रक्तप्रवाह वाढवण्यास फायदेशीर ठरतात. यावर सुरू असलेल्या अध्ययनातूनही दिसून येते की बीटाचे सेवन तुमच्या शरीरातील रक्त प्रवाह  चांगला करण्यासाठी फायदेशीर ठरते. 

हळद

हळदीचा उपयोग भाज्यांमध्ये आपण करतो. हळदीत अनेक एंटी व्हायरल गुणधर्म असून रक्ताभिसरण चांगले ठेवण्यासाठी हळद गुणकारी ठरते. हळद रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हळद पाणी, हळद दूध उकळून प्यायल्याने तुमची आजारांपासून मुक्तता होऊ शकते. 

लाल मिरची

लाल मिरचीची तिखट चव कॅप्साइसिन नावाच्या फायटोकेमिकलमधून येते. कॅप्सॅसीन रक्तदाब कमी करून आणि नायट्रिक ऑक्साईड आणि इतर वासोडिलेटर किंवा संयुगे सोडण्यास उत्तेजित करून रक्त परिसंचरण वाढवते.  ज्याद्वारे तुमच्या रक्तवाहिन्यांचा विस्तार होऊ लागतो. अनेक संशोधनांमधून समोर आलेल्या माहितीनुसार रक्ताभिसरण चांगले ठेवण्यासाठी लाल मिरचीचे सेवन फायद्याचे ठरते. 

Web Title: Health Tips: These 8 vegetables will be useful to remove blockages in the veins; Blood circulation will also be faster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.