अंघोळ करताना केलेल्या चुका आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. यामुळे फक्त त्वचा नाही तर केसांनाही इजा पोहोचू शकते. अंघोळ करताना साबण आणि शॅम्पूमध्ये असलेले केमिकल्सयुक्त पदार्थ हाताळताना काळजी घ्यायला हवी. अन्यथा त्याचे साईड इफेक्ट दिसू शकतात. मेडिसिन डायरेक्टचे सुप्रीटेंडेट फार्मासिस्ट हुस्सैन अब्देह यांनी अशाच काही चुकांबाबत बारकाईनं विश्लेषण केलं आहे. (We should not make these 5 mistakes during bath)
एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानमुसार साबण किंवा शॅम्पू जास्तवेळपर्यंत वापरल्यानंतर त्वचा कोरडी पडू लागते. यामुळेच शॅम्पूच्या वापरानंतर केस शॉवरखाली व्यवस्थित धुणं गरजेचं आहे. अन्यथा त्वचा कोरडी पडू शकते तर कधी भेगासुद्धा पडतात. शॉवरखाली जास्त वेळ उभं राहण्याबाबतही तज्ज्ञांनी सावध केले आहे. जास्तवेळ शॉवरखाली उभं राहिल्यानं त्वचा कोरडी पडते याशिवाय त्वचेवर लालसरपणाही येतो. त्वचा खूप सेंसिटिव्ह होते. म्हणूनच १५ मिनिटांपेक्षा जास्तवेळ अंघोळ करणं योग्य नसल्याचं तज्ज्ञ सांगतात.
हार्वर्ड हेल्थनुसार परफ्यूम, शॅम्पू, कंडीशनर आणि साबणात उपस्थित तत्व त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकतात. यामुळे एलर्जिक रिएक्शन्स उद्भवतात. तुम्ही कशी अंघोळ करता याबरोबरच कितीवेळ अंघोळ करता हे सुद्धा महत्वाचं असतं. जास्त वेळ अंघोळ केल्यानं त्वचा फाटू लागते त्यात बॅक्टेरिया, एलर्जी निर्माण करणारे तत्व त्वचेत शिरतात. एंटीबॅक्टेरिअल साबण नॉर्मल बॅक्टेरियांना मारतात. यामुळे त्वचेवरील मायक्रोऑर्गेनिझमच संतुलन बिघडतं.
रात्री अंघोळ करण्याचे फायदे
रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने तुमचा दिवसभरातील थकवा दूर होतो. तुम्हाला चांगली झोप लागतो. थंड पाण्याने अंघोळ केली तर शरिराचे तापमान योग्य राहते. तज्ज्ञांच्यामते थंड पाण्याने अंघोळ केल्यावर केस आणि त्वचाही चांगली राहते. त्वचा कोरडी रखरखीत असल्यास मऊपणा येतो. याशिवाय तुमची इम्युनिटी अधिक स्ट्राँग होते. थंड पाण्याने अंघोळ केल्यावर इम्युनिटी लेवल वाढण्यासही मदत होते आणि रक्तपुरवठाही चांगला होतो.