खोकला, सर्दी या वातावरणातील बदलांमुळे उद्भवत असलेल्या समस्यांसाठी गरमागरम हळदीचं दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. इन्फेक्शनपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तसंच इम्यूनिटी वाढवण्यासाठी हळदीचं दूध पिणं फायदेशीर समजलं जातं. डॉक्टरसुद्धा हे हेल्दी ड्रिंक पिण्याचा सल्ला देतात. बदलत्या वातावरणात सर्दी, खोकल्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी रात्री झोपताना हळदीचं दूध प्यायलाच हवं. (Health turmeric milk side effects drinking excessive can cause kidney stone abdominal cramps)
हळदीत असे अनेक गुणधर्म असतात जे शारीरिक समस्या रोखण्यासाठी फायदेशीर ठरतात. हळदीत एंटी इंफ्लेमेटरी, एंटीऑक्सिडेंट, एंटीसेप्टीक गुणधर्म असतात. यामुळे अर्थरायटीस, इंफेक्शन, कॅन्सर, हार्ट डिजीससारख्या आजारांपासून बचाव होतो. याशिवाय दूध हाडं आणि दातांना मदबूत बनवते. हळदीचं दूध जास्त प्यायल्यानं काही प्रमाणात नुकसानही होऊ शकतं. इतकंच नाही तर गरमीच्या वातावरणात अधिक हळदीचं दूध प्यायाल्यानं तब्येतीच्या समस्या उद्भवू शकतात. हळदीचं दूध पिणं कोणत्याही स्थितीत टाळायला हवं समजून घेऊया.
हळदीचा वापर त्याच्या औषधी आणि उपचारात्मक गुणधर्मांसाठी वर्षानुवर्षे केला जातो. हळदीतील सक्रिय घटक कर्क्यूमिन प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात उपस्थित असल्याने ते एक देसी सुपरफूड बनते. हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे. जे गंभीर रोगांना कारणीभूत असलेल्या फ्री रॅडिकल्सशी लढते. हे सर्व घटक सांधेदुखीपासून आराम देतात ज्यामुळे जखमा लवकर भरतात. असे असूनही, कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन केल्यास फायदा होण्याऐवजी नुकसानच होते.
वेबएमडी डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार काही लोकांमध्ये करक्युमिन खराब पोटाची समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरते. तर काहींना नुकसान पोहोचवते. एका अभ्यासानुसार योग्य प्रमाणात करक्यूमिनचे सेवन केले गेले नाही तर पोटात वेदना जाणवतात. डायरिया होण्याची शक्यता असते. जास्त हळदीचं दूध प्यायल्यानं पोटाचे त्रास, मळमळ, उलट्या उद्भवू शकतात.
१) किडनी स्टोन होण्याचा धोका असतो. हळदीत २ टक्के ऑक्सालेट अससते. उच्च प्रमाणात ऑक्सालेटचे सेवन किडनी स्टोनचं कारण ठरू शकते. किडनीची संबंधित आजारांचा धोका असल्यास हळदीच्या दूधाचं सेवन करू नका.
२) हळदीचे दूध जास्त प्रमाणात प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. तुम्ही हे अँटीडायबेटिक औषधांसोबत घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी खूप कमी होऊ शकते. जर तुम्हाला मधुमेह असेल तर हळदीचे दूध पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
वय कमी पण केस खूपच पिकले; कांद्याच्या सालीचा डाय घरीच लावा; झटपट मिळवा काळेभोर केस
३) हळदीच्या दुधामुळे लोहाची कमतरता होऊ शकते. जास्त हळद लोह शोषण्यास अडथळा आणू शकते. यामुळे दररोज पुरेसे लोह न खाणाऱ्या लोकांमध्ये लोहाची कमतरता होऊ शकते. म्हणून अतिप्रमाणात या दुधाचं सेवन न करता योग्य प्रमाणातच करा.