Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Healthy Food to control blood Sugar and Diabetes : शुगर कंट्रोल आणि डायबिटीस नियंत्रणासाठी मदत करतात असे 5 पदार्थ, घ्या यादी

Healthy Food to control blood Sugar and Diabetes : शुगर कंट्रोल आणि डायबिटीस नियंत्रणासाठी मदत करतात असे 5 पदार्थ, घ्या यादी

Healthy Food to control blood Sugar and Diabetes शुगरवर कंट्रोल ठेवला नाही तर आरोग्याची गुंतागुंत वाढत जाते. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात घ्यायलाच हवेत अशा पदार्थांची यादी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 05:27 PM2022-02-09T17:27:20+5:302022-02-09T17:36:14+5:30

Healthy Food to control blood Sugar and Diabetes शुगरवर कंट्रोल ठेवला नाही तर आरोग्याची गुंतागुंत वाढत जाते. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात घ्यायलाच हवेत अशा पदार्थांची यादी...

Healthy Food to Control Blood Sugar and Diabetes: Here are 5 foods that can help control sugar and control diabetes | Healthy Food to control blood Sugar and Diabetes : शुगर कंट्रोल आणि डायबिटीस नियंत्रणासाठी मदत करतात असे 5 पदार्थ, घ्या यादी

Healthy Food to control blood Sugar and Diabetes : शुगर कंट्रोल आणि डायबिटीस नियंत्रणासाठी मदत करतात असे 5 पदार्थ, घ्या यादी

Highlightsरक्तातील वाढलेली साखरेची पातळी आरोग्याची गुंतागुंत करण्यास कारणीभूत ठरते, तेव्हा वेळीच काळजी घेतलेली चांगलीडायबिटीस हा आजार नसून ही सध्या जीवनशैलीविषयक समस्या झाली आहे...

शुगर आणि डायबिटीस हे शब्द सध्या अतिशय सामान्य झाले आहेत. रक्तातील वाढलेली साखरेची पातळी आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या विविध तक्रारी यांमुळे सध्या अनेक जण हैराण झालेले दिसतात. मग कधी आयुर्वेदीक उपचार तर कधी डॉक्टरांनी दिलेली औषधे, इतकेच नाही तर अनेकांना ही शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्शुलिनही घ्यावे लागते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सध्या डायबिटीसचे प्रमाण वाढले असून शुगर नियंत्रणात ठेवणे हे मोठे आव्हान झाले आहे. आहार हा डायबिटीसच्या लोकांमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि नियंत्रण ठेवण्याचा विषय आहे. यावरुन अनेकदा घरांमध्ये वाद होत असल्याचेही पाहायला मिळते. पण तुम्हाला शुगर असेल तर तुम्ही आहाराबाबत आवर्जून काळजी घ्यायला हवी Healthy Food to control blood Sugar and Diabetes. त्याचा आपल्यालाच फायदा होणार आहे हे वेळीच लक्षात घ्या. आता आहारात अशा कोणत्या पदार्थांचा समावेश केल्याने शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते ते पाहूया.

कडधान्ये 

मसूर, राजमा, काळा हरभरा यांसारख्या कडधान्यांचा आहारात समावेश असायला हवा. त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने शुगर नियंत्रणात राहण्यास त्याचा फायदा होतो. या कडधान्यांमधून अतिशय हळूपणे कार्बोहायड्रेटस निर्माण होत असल्याने शुगर एकदम वाढण्यावर नियंत्रण येते. त्यामुळे आहारात नियमित या कडधान्यांचा वापर करायला हवा. 

सफरचंद 

डायबिटीस असलेल्यांनी फळे खाऊ नयेत असे आपण अनेकदा ऐकतो. त्यातही गर असणारी फळे डायबिटीससाठी चांगली नसतात हे आपल्याला माहित असते. पण सफरचंदाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने सफरचंद डायबिटीस असणाऱ्या लोकांना खाल्लेली चालतात. सफरचंदामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते, तसेच त्यात फॅटस नसतात, त्यामुळे डायबिटीस असणारे लोक प्रमाणात सफरचंद खाऊ शकतात. बाहेर जाताना सोबत ठेवण्यासाठी सफरचंद हा उत्तम पर्याय ठरु शकतो. 

बदाम 

बदामात मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. तसेच यामध्ये असणाऱ्या खनिजांमुळे शरीरातील इन्शुलिन योग्य पद्धतीने वापरण्याचे काम केले जाते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवायचे असेल तर आहारात नियमितपणे ठराविक प्रमाणात तज्ज्ञांच्या सल्ल्याने बदामांचा समावेश करायला हवा. 

पालक 

पालकामध्ये मॅग्लेशियम आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्याने डायबिटीससाठी ही भाजी अतिशय चांगली असते. शिजवलेल्या एक कप पालकामध्ये केवळ २१ कॅलरीज असतात. त्यामुळे पालक पनीर, पालक पुलाव, पालक भजी, पालक पराठा यांसारख्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आपण पालकाचा अतिशय चांगला वापर करु शकतो. 

हळद 

हळदीमध्ये असणाऱ्या कर्क्यूमिन या घटकामुळे स्वादुपिंडांचे काम चांगले राहण्यास मदत होते. तुम्ही प्री डायबिटीक असाल तर टाईप २ प्रकारच्या डायबिटीसमध्ये त्याचे रुपांतर होण्यापासून तुम्ही वाचू शकता.  

Web Title: Healthy Food to Control Blood Sugar and Diabetes: Here are 5 foods that can help control sugar and control diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.