Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पित्ताची जळजळ असो नाही तर पाळीचं दुखणं.. आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात प्या ३ घरगुती पेयं

पित्ताची जळजळ असो नाही तर पाळीचं दुखणं.. आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात प्या ३ घरगुती पेयं

पित्त, पाळीतल्या वेदना, हाता पायांची जळजळ, लघवीला होणारी आग यावर आयुर्वेद तज्ज्ञांनी मनुके, तांदूळ आणि बडिशेपाचं पाणी पिण्याचा (healthy homemade drinks) सोपा पण प्रभावी उपाय सांगितला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2022 04:12 PM2022-09-13T16:12:10+5:302022-09-13T16:44:37+5:30

पित्त, पाळीतल्या वेदना, हाता पायांची जळजळ, लघवीला होणारी आग यावर आयुर्वेद तज्ज्ञांनी मनुके, तांदूळ आणि बडिशेपाचं पाणी पिण्याचा (healthy homemade drinks) सोपा पण प्रभावी उपाय सांगितला आहे.

Healthy homemade drinks from black raisins, rice and fennel can give relief from many health problems | पित्ताची जळजळ असो नाही तर पाळीचं दुखणं.. आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात प्या ३ घरगुती पेयं

पित्ताची जळजळ असो नाही तर पाळीचं दुखणं.. आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात प्या ३ घरगुती पेयं

Highlightsकाळ्या मनुकांमध्ये ॲण्टि ऑक्सिडण्ट्स असतात जे शरीराला थंडावा  देतात. गावरुन पांढरं पाणी जाणं, लघवी करताना जळ्जळणं, जुलाब, रक्त प्रवाह नीट न होणं, हाता पायाच्या तळव्यांची आग होणं या समस्या कमी करण्यासाठी तांदळाचं पाणी फायदेशीर असतं. मूड फ्रेश होण्यासाठी फायदेशीर असतात. बडिशेपातील गुणधर्म शरीर आणि मनाची ऊर्जा वाढवतात.

'डाॅक्टरांकडे जाण्याची गरज नाही पण त्रास होतो' या वर्गात मोडणाऱ्या अनेक आरोग्यविषयक समस्या आपल्याला रोज छळत असतात. या समस्यांमुळे आपल्या नेहेमीच्या कामात व्यत्यय येतात आणि मूडही खराब होतो. कधी पाळीमुळे पोटात कंबरेत प्रचंड वेदना असतात, कधी पित्तानं डोकं वर काढून छळायला सुरुवात केलेली असते तर कधी लघवी करताना होणारी जळजळ असह्य होते, हातापायाची आग होवून जीव कासावीस होतो. अशा समस्या का होतात याचं कारण जसं माहिती नसतं तसंच असा त्रास होताना काय करावं तेही कळत नाही. पण अशा त्रासांवर आयुर्वेदामध्ये घरच्याघरी करता येतील असे सोपे आणि असरदार  (home remedy) उपाय सांगितलेले आहेत. डाॅ. दीक्षा भावसार यांनी पित्त, पाळीतल्या वेदना, हाता पायांची जळजळ, लघवी करताना होणारी आग यावर फायदेशीर अशा तीन पेयांचा (healthy drinks)  उपाय सांगितला आहे. अवघ्या 10 मिनिटात हा उपाय करुन आपण या समस्या कमी करु शकतो असं डाॅ. दीक्षा सांगतात. काळे मनुके, तांदूळ आणि बडिशेप (drinks from black raisins, rice and fennel)  यांच्या सहाय्यानं ही पेयं तयार केली जातात. 

Image: Google

काळ्या मनुकाचं पाणी

पित्त, पित्ताने होणारे त्रास, पाळीत जास्त होणारा रक्तस्त्राव, केस गळती, शरीरात रक्ताची कमतरता अशा अनेक समस्यांवर मात करण्यासाठी आहारात काळ्या मनुका असणं आवश्यक आहे. काळ्या मनुकांमध्ये ॲण्टि ऑक्सिडण्ट्स असतात जे शरीराला थंडावा  देतात. पाळीत होणाऱ्या वेदना काळ्या मनुकांमुळे कमी होतात. काळ्या मनुकांच्या सेवनामुळे शरीरातील ऊर्जा वाढते. बध्दकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात. या सर्व समस्यांवर काळ्या मनुकांचा उपाय करताना काळ्या मनुकांचं पाणी पिणं जास्त फायदेशीर असतं असं डाॅ. दीक्षा भावसार सांगतात.
काळ्या मनुकांचं पाणी करण्यासाठी मूठभर काळ्या मनुका घ्याव्यात. त्या स्वच्छ धुवून रात्रभर 1 ग्लास पाण्यात भिजत घालाव्यात. दुसऱ्या दिवशी सकाळी भिजलेल्या मनुका पाण्यातच कुस्करुन घ्याव्यात. हे काळ्या मनुकांचं पाणी प्यायल्यानं पोटात थंडावा निर्माण होतो. सकाळी उपाशीपोटी हे पाणी पिणं फायदेशीर असतं. तसेच खाण्याच्या 1 तास आधी काळ्या मनुकांचं पाणी पिणं उपयुक्त ठरतं. 

Image: Google

तांदळाचं पाणी

तांदळाच्या पाण्यात स्टार्च असतात. सोबतच यात ॲण्टिऑक्सिडण्ट्स देखील असतात. या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. अंगावरुन पांढरं पाणी जाणं, लघवी करताना जळ्जळणं, जुलाब, रक्त प्रवाह नीट न होणं, हाता पायाच्या तळव्यांची आग होणं या समस्या कमी करण्यासाठी तांदळाचं पाणी फायदेशीर असतं. तांदळाचं पाणी पिण्यासोबतच या पाण्याचा उपयोग चेहरा आणि केस धुण्यासाठी केल्यास त्वचेचं आणि केसांचं सौंदर्य वाढतं. 
तांदळाचं पाणी तयार करण्यासाठी एक वाटी तांदूळ घ्यावेत. ते पाण्यानं एकदा धुवावेत. वाटीभर तांदळात 60- ते 80 मिली पाणी घालावं. मातीच्या किंवा स्टीलच्या भांड्यात 2 ते 6 तास तांदूळ पाण्यात भिजवावेत. भांड्यावर झाकण ठेवावं. तांदूळ भिजले की तांदळाचं पाणी गाळून घेऊन हे पाणी प्यावं.

Image: Google

बडिशेपाचं पाणी

आयुर्वेदानुसार बडिशेप ही आरोग्यदायी असते. बडिशेपातले गुणधर्म  मूड फ्रेश होण्यासाठी फायदेशीर असतात. बडिशेपातील गुणधर्म शरीर आणि मनाची ऊर्जा वाढवतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. पचन शक्ती सुधारण्यास, हदयाचं आरोग्य चांगलं राहाण्यास आणि पाळीत होणाऱ्या वेदना कमी करण्यास बडिशेपाचं पाणी उपयुक्त असतं. 
बडिशेपाचं पाणी तयार करण्यासाठी 1 ग्लास माठातलं थंड पाणी घ्यावं. त्यात 1 चमचा बडिशेपाची पावडर घालावी. त्यात  थोडं सैंधव मीठ घालावं. वाटल्यास थोडी साखर घालावी. हे पाणी चांगलं हलवून घ्यावं. हे बडिशेपाचं पाणी प्यायल्यास मनावरचा ताण कमी होतो. बडिशेपाचं पाणी दुपारच्या जेवणानंतर दोन तासांच्या दरम्यान पिणं फायदेशीर असतं. 


 

Web Title: Healthy homemade drinks from black raisins, rice and fennel can give relief from many health problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.