Join us   

...म्हणून भारत जगातील सर्वाधिक डायबिटीस रुग्णांचा देश; करा आहारात बदल, साखर घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2022 4:15 PM

Healthy Lifestyle and Diet Tips For Diabetic and Heart Disease : प्रसिद्ध सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी आहाराबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात

ठळक मुद्दे कमीत कमी ग्लायसेमक इंडेक्स असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. सतत पोळी, भाकरी, भात यांसारखे पदार्थ खाल्ल्याने आपला मेटाबॉलिझम योग्य पद्धतीने काम करत नाही. 

आहे. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच सध्या डायबिटीसची समस्या भेडसावते. कमी वयात आणि सर्व स्तरांमध्ये आढळणारा हा आजार काहीसा गुंतागुंतीचा असून त्यामुळे आरोग्याच्या इतरही अनेक समस्या निर्माण होतात. भारतात युरोप आणि अमेरिकेपेक्षा टाईप २ डायबिटीसच्या रुग्णांचे प्रमाण जास्त असून हृदयरोगाशी निगडीत समस्यांचे प्रमाणही जास्त आहे. यामागे नेमकी काय कारणे आहेत आणि आहारात कशा पद्धतीचे बदल केल्यास या समस्य़ा कमी होऊ शकतात हे समजून घेणे आवश्यक आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी आहाराबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात, आहारात कोणते बदल केल्याने या समस्यांचे प्रमाण कमी होईल याबाबत समजून घेऊया Healthy Lifestyle and Diet Tips For Diabetic and Heart Disease...

१. भारतीयांमध्ये स्नायूंची ताकद कमी असून शरीरावरील चरबीचे प्रमाण जास्त असते. अनुवंशिकरित्या हे पुढच्या पिढीकडे पास होणारे असल्याने भारतीयांच्या पोटाचा घेरही कायम वाढलेला दिसतो. या समस्येमुळे डायबिटीस, लठ्ठपणा आणि हृदरोगाशी निगडीत समस्या वाढतात. 

२. जगभरात जितके हृदयरोगाचे रुग्ण आहेत त्यापैकी एकट्या भारतात ६० टक्के रुग्ण आढळतात. तर भारतात १० कोटी हृदयरोगाचे रुग्ण आहेत. त्यामुळे ही समस्या वाढू नये यासाठी आपण काय करायला हवं यावर विचार करायला हवा. 

३. आपण खूप जास्त खातो, तसंच आपण आहारात प्रोटीन, जीवनसत्त्वे यांच्या तुलनेत आहारात कार्बोहायड्रेटस जास्त प्रमाणात घेतो आणि शरीरावर ग्लायसेमिक लोड घेतो. सतत पोळी, भाकरी, भात यांसारखे पदार्थ खाल्ल्याने आपला मेटाबॉलिझम योग्य पद्धतीने काम करत नाही. 

४. आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपण शरीराला आवश्यक असणारा व्यायाम करत नाही. जे करतात ते अर्धा किंवा एक तास करतात, मात्र त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. याचे कारण आपण दिवसातला बाकी सगळा वेळ कॉम्प्युटरसमोर बसलेले असता. एकावेळी दोन तासांहून जास्त काळ बसलेले असाल तर इन्शुलिन रेझिस्टन्स तयार होतो. 

५. त्यामुळे कमीत कमी ग्लायसेमक इंडेक्स असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. हे फक्त मोठ्यांसाठीच नाही तर लहान मुलांसाठीही आवश्यक आहे. म्हणजे आपला देश भविष्यात डायबिटीस आणि हृदयरोग यांसारख्या आजारांपासून काही प्रमाणात का होईना दूर राहू शकेल.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल