Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Healthy Lifestyle : सकाळी उठल्या उठल्या करा फक्त 3 सिम्पल गोष्टी, दिवसभर मूड फ्रेश-तुम्ही फ्रेश

Healthy Lifestyle : सकाळी उठल्या उठल्या करा फक्त 3 सिम्पल गोष्टी, दिवसभर मूड फ्रेश-तुम्ही फ्रेश

Healthy Lifestyle : मनानेही तुम्ही एकदम ताजेतवाने व्हाल आणि दिवसभर आनंदात, फ्रेश राहू शकाल. यासाठी सकाळी उठल्या उठल्या काय करायचे याबाबत प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 11:30 AM2022-03-29T11:30:33+5:302022-03-29T13:22:33+5:30

Healthy Lifestyle : मनानेही तुम्ही एकदम ताजेतवाने व्हाल आणि दिवसभर आनंदात, फ्रेश राहू शकाल. यासाठी सकाळी उठल्या उठल्या काय करायचे याबाबत प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र सांगतात...

Healthy Lifestyle: Get up in the morning and do these 4 things, stay fresh all day long .... | Healthy Lifestyle : सकाळी उठल्या उठल्या करा फक्त 3 सिम्पल गोष्टी, दिवसभर मूड फ्रेश-तुम्ही फ्रेश

Healthy Lifestyle : सकाळी उठल्या उठल्या करा फक्त 3 सिम्पल गोष्टी, दिवसभर मूड फ्रेश-तुम्ही फ्रेश

Highlightsन चुकता झोपेतून उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्या. पोट साफ होण्यासाठी पवनमुक्तास, भद्रासनासारखी काही सोपी योगासने आवर्जून करा. 

सकाळी उठल्यावर आपली छान झोप झाली असेल तर आपल्याला एकदम फ्रेश वाटते. पण झोप नीट झाली नसेल किंवा आणखी काही तक्रारी असतील तर आपण बराच काळ आळसावलेले राहतो. मग बेडमधून बाहेर यायची इच्छाच होत नाही. तुम्हालाही वारंवार असे होत असेल तर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या स्वत:साठी ५ मिनीटे तरी द्यायला हवीत (Healthy Lifestyle ). तसे केले नाही आपला पुढचा संपूर्ण दिवस आळसात आणि कंटाळवाणा जातो. अशावेळी सकाळी उठल्यावर गादीत असतानाच ५ मिनीटे ठराविक मॉर्निंग रुटीन (Morning Routine) फॉलो केले तर तुम्हाला शारीरिकदृष्ट्या फ्रेश व्हायला तर मदत होईलच. पण मनानेही तुम्ही एकदम ताजेतवाने व्हाल आणि दिवसभर आनंदात, फ्रेश राहू शकाल. यासाठी सकाळी उठल्या उठल्या काय करायचे याबाबत प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र सांगतात...

(Image : Google)
(Image : Google)

१. उठल्या उठल्या देवाची प्रार्थना करा. आपल्याला या सृष्टीवर आणल्याबद्दल देवाचे आभार माना. देव किंवा एखादी शक्ती आपल्यासोबत आहे यावर पूर्ण विश्वास ठेवा. देव आपल्यासोबत असताना आपण कोणत्याही गोष्टीला का घाबरायचे असा विचार करा आणि काही वेळ तुम्हाला आवडेल त्या देवाचे नामस्मरण करा. ही सकारात्मक उर्जा तुम्हाला दिवसभर फ्रेश राहायला अतिशय उपयोगी ठरेल. 

२. देवाचे नामस्मरण केल्यावर डोळे मिटून २ ते ३ मिनीटे शांत बसा. या वेळात श्वासावर लक्ष केंद्रित करा. प्राणायाम, अनुलोमविलोम यांसारख्या गोष्टींमुळे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि दिवसभर एनर्जी टिकून राहण्यास मदत होईल. सकाळच्या फ्रेश हवेमध्ये प्राणायाम केल्याने शरीरातील अनावश्यक वायू बाहेर पडण्यास मदत होईल. 

३. पोटावर लक्ष केंद्रित करा, ज्यामुळे तुमचे पोट साफ व्हायला मदत होईल. सकाळी पोट साफ झाले की आपल्याला एकदम फ्रेश वाटते. पण पोट साफ झाले नाही तर दिवसभर अस्वस्थ होते. त्यामुळे पोटावर लक्ष केंद्रित करा आणि पोट साफ होण्यासाठी पवनमुक्तास, भद्रासनासारखी काही सोपी योगासने आवर्जून करा. 

(Image : Google)
(Image : Google)

४. उठल्यावर ब्रश झाल्यानंतर न चुकता एक ग्लासभर पाणी आवर्जून प्यायला हवे. हे पाणी कोमट असेल तर आणखी चांगले. कारण कोमट पाण्यामुळे हिरड्या चांगल्या राहण्यास मदत होते. घशाला काही इन्फेक्शन असेल तर ते निघून जाण्यास मदत होते. तसेच कोमट पाण्यामुळे जीभ, घसा साफ होण्यास मदत होते. पोट चांगले साफ होते. त्यामुळे न चुकता झोपेतून उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्या. 

Web Title: Healthy Lifestyle: Get up in the morning and do these 4 things, stay fresh all day long ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.