बिघडलेल्या जीवनशैलीमुळे सध्या शरीर कमजोर होत चाललं आहे (Health Tips). तारुण्यातचं लोकांचे केस पांढरे, हाडं ठिसूळ आणि गंभीर आजारांचा धोका वाढत चालला आहे. काही लोकांना विशीतच पायऱ्या चढताच दम लागतो आहे. शिवाय अशक्तपणाही जाणवत आहे. मुख्य म्हणजे खराब आहार खाल्ल्याने शरीर लठ्ठ होते. ज्यामुळे आपले शरीर विविध आजारांना आमंत्रण देते. त्यामुळे कॅलरीज इनटेकची विशेष काळजी घ्यायला हवी.
शरीर पन्नाशीनंतरही सुदृढ राहावे असे वाटत असेल तर, गुरुग्राम स्थित पारस हेल्थच्या इंटरनल मेडिसिन एचओडी डॉ आर आर दत्ता यांनी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करा(Healthy Oil to Cook With, According to Nutritionists).
तज्ज्ञ म्हणतात, 'कॅलरीजच्या गरजा वय, लिंग, अॅक्टिव्हिटी, एकूण आरोग्यावर असते. प्रत्येक वयोगटातील लोकांनी आपल्या शरीराच्या गरजेनुसार खावे. कोणतं तेल, कोणता आहार शरीरासाठी फायदेशीर ठरतं, हे जाणून घेणं गरजेचं आहे. यामुळे आरोग्य सुधारते.'
वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत काय खावे?
किशोरवयीन मुलांची वाढ झपाट्याने होते. यासाठी मुलांनी आपल्या आहारात जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम, लोह आणि प्रथिने भरपूर खाद्यपदार्थांचा समावेस करावा. आपले मुल किती अॅक्टिव्ह आहे, यावर अन्नाचे प्रमाण ठरवावे.
१८ ते ३५ वयोगटातील लोकांसाठी तेल
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, 'वय वाढलं की, शारीरिक हालचाली देखील जास्त होतात. त्यामुळे उर्जा टिकवून ठेवण्यासाठी पोषणयुक्त आहार घ्यायला हवा. शिवाय प्रोटीनयुक्त पदार्थ खा. तसेच हेल्दी फॅट्ससाठी ऑलिव्ह ऑइल, एवोकॅडो आणि बदाम खा.
३५ नंतर मेटाबॉलिज्म होते स्लो
३५ वर्षानंतर चयापचय मंद होते. त्यामुळे आहारात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, फायबर आणि बी जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांचा समावेश करा. हे पौष्टीक पदार्थ पचवण्यासाठी हलके असतात. प्रोटीन, धान्य, फळे, भाज्या आणि हेल्दी फॅट्सवर लक्ष केद्रिंत करा. जे हाडांची ताकद वाढवतात.
ब्रशने न घासताही टॉयलेट होईल चकाचक! १ एकदम सोपा उपाय; पिवळे डाग आणि दुर्गंधीही गायब
पन्नाशीनंतर अशी घ्या स्वतःची काळजी
वयानुसार लोकांच्या पोषणाच्या गरजा बदलतात. चयापचयाची गती मंदावते. त्यामुळे कमी कॅलरीजचे पदार्थ खा. परंतु, त्यात पोषणची कमतरता नसावी. त्वचेवरच्या वृद्धत्वाचा खुणा आणि पोटाचे विकार टाळण्यासाठी पुरेसे पाणी प्या. कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी अँटिऑक्सिडंटयुक्त फळे आणि भाज्या खा.