Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > भेंडीची गिळगिळीत भाजी काय खायची, असं म्हणत नाक मुरडता? भेंडीचे 6 फायदे, तब्येत दणकट 

भेंडीची गिळगिळीत भाजी काय खायची, असं म्हणत नाक मुरडता? भेंडीचे 6 फायदे, तब्येत दणकट 

शास्त्रीय समुहात भेंडीला पोषण मुल्यांचा खजिना म्हटलं जातं. भेंडीमधे मोठ्या प्रमाणात खनिजं, जीवनसत्त्वं आणि अँण्टिऑक्सिडण्टस असतात. हे घटक जीवनशैलीतून निर्माण होणारे कोलेस्टेरॉल, मधुमेह , कॅन्सरसारख्या आजारांविरुध्द लढा देतात. म्हणूनच अभ्यासक म्हणतात निरोगी राहायचं असेल तर नियमित भेंडी खा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 06:26 PM2021-08-26T18:26:50+5:302021-08-26T18:43:52+5:30

शास्त्रीय समुहात भेंडीला पोषण मुल्यांचा खजिना म्हटलं जातं. भेंडीमधे मोठ्या प्रमाणात खनिजं, जीवनसत्त्वं आणि अँण्टिऑक्सिडण्टस असतात. हे घटक जीवनशैलीतून निर्माण होणारे कोलेस्टेरॉल, मधुमेह , कॅन्सरसारख्या आजारांविरुध्द लढा देतात. म्हणूनच अभ्यासक म्हणतात निरोगी राहायचं असेल तर नियमित भेंडी खा!

Healthy okra: 6 benefits of okra which makes health strong. | भेंडीची गिळगिळीत भाजी काय खायची, असं म्हणत नाक मुरडता? भेंडीचे 6 फायदे, तब्येत दणकट 

भेंडीची गिळगिळीत भाजी काय खायची, असं म्हणत नाक मुरडता? भेंडीचे 6 फायदे, तब्येत दणकट 

Highlightsभेंडी ही सीरम कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करुन हदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत करते.भेंडीमधे मोठ्या प्रमाणात अँण्टिऑक्सिडण्टस असल्याने कर्करोगास प्रतिबंध करते.भेंडीमधील पाचक फायबर पचनसंस्थेचं काम सुधारण्यास मदत करतात. यामुळे भेंडी खाणं आवश्यक आहे.

 
भेंडीची भाजी आवडते असं म्हणणारे फारच कमी भेटतात. उलट एखाद्याला भेंडी आवडत असल्यास त्याची मजाही घेतली जाते. पण भेंडी ही आलतू फालतू भाजी नसून सर्व वनस्पतीजन्य भाज्यांमधे गुणवंत भेंडीचा दर्जा खूप वरचा आहे असं अभ्यासक म्हणतात.
 मुळात भेंडी ही भारतीय भाजी नाही. ती आफ्रिकेतील इथोपियामधील डोंगराळ आणि पठारी प्रदेशातील स्थानिक भाजी म्हणून ओळखली जाते. आफ्रिकेतून ती उत्तरेत तिथून ती मध्यपूर्वेत, मग पूर्वेकडील देशात आली. भारतात भेंडी 12 व्या शतकात आली. भेंडी ही आपल्याकडे प्रामुख्याने वेगवेगळ्या भाजीच्या स्वरुपात खाल्ली जाते. पण इतर देशात भेंडीची फुलं, पानं वापरुन सूप केलं जातं किंवा भेंडीचा उपयोग करुन सलाड, स्ट्य़ू तयार केलं जातं.

छायाचित्र- गुगल

पौष्टिक भेंडीची आरोग्यदायी भूमिका

1. शास्त्रीय समुहात भेंडीला पोषण मुल्यांचा खजिना म्हटलं जातं. भेंडीमधे मोठ्या प्रमाणात खनिजं, जीवनसत्त्वं आणि अँण्टिऑक्सिडण्टस असतात. हे घटक जीवनशैलीतून निर्माण होणारे कोलेस्ट्रेरॉल, मधुमेह , कॅन्सरसारख्या आजारांविरुध्द लढा देतात.

2. भेंडीत फायबरचं प्रमाण मोठं असतं. हे फायबर रक्तातील साखर नियंत्रित करण्याचं काम करतं. आतड्यात साखर शोषली जाण्याआधी भेंडीतील फायबर ती नियंत्रित करतात. आतड्यातून अन्नाचा प्रवास होत असताना साखरेचं शोषण हळूवार करण्याचं काम भेंडीतील फायबर करतं.
संशोधनातून हे सिध्द झालं आहे की मधुमेह असलेली जी व्यक्ती रोज भेंडी खाते त्यांची किडनी खराब होण्याची शक्यता भेंडी न खाणार्‍या मधुमेही रुग्णांच्या तुलनेत नसते. 50 टक्के किडनीचे आजार हे मधुमेहामुळे होतात. म्हणूनच मधुमेह असलेल्या रुग्णांनी नियमित भेंडी खाणं महत्त्वाचं असतं असं संशोधक म्हणतात.

छायाचित्र- गुगल

3. अनेकदा कोलेस्टेरॉल वाढवणारं अन्न टाळणं अवघड होतं. अशा परिस्थितीत सोबत भेंडी खाल्ली तर भेंडी ही सीरम कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करुन हदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत करते. भेंडी खाल्ल्यानं कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास सुलभ जातं.
भेंडीमधे ‘म्युकिलेज’ हा चिकट घटक असतो जो शरीरातील कोलेस्टेरॉलला चिकटून राहातो. हा म्युकिलेज हा शौचावाटे सोबत कोलेस्टेरॉल घेऊन बाहेर पडतो . शरीरानं जर कोलेस्टेरॉल शोषून घेतलं तर हदयास त्याचा धोका निर्माण होतो. यावरुन लक्षात येतं की भेंडी खाणं किती महत्त्वाचं असतं ते. अभ्यासातून हे सिध्द झाले आहे की भेंडीची पावडर शरीरातील जास्तीत जास्त कोलेस्टेरॉल मलावाटे बाहेर टाकण्यास मदत करते.

4. भेंडीमधे मोठ्या प्रमाणात अँण्टिऑक्सिडण्टस असल्याने कर्करोगास प्रतिबंध करते. अभ्यास सांगतो की भेंडीमधे लक्षणीय प्रमाणात फ्लेवोनॉइडस आणि फिनॉल्स हे घटक असतात. हे घटक अँण्टिट्यूमर म्हणून ओळखले जातात. हे घटक स्तनांच्या कर्करोगालाही प्रतिबंध करतात.

5. भेंडीमधील पॉलिसॅच्चेराइडसमुळे पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. हा घटक अल्सरला कारणीभूत ठरणार्‍या हेलिकोबॅक्टर पायलोरी या जिवाणुला चिटकून राहातो. नियमितपणे भेंडी खाल्ली तर पोटातील घातक बाहेर टाकले जातात. शिवाय मोठ्या आतड्यातील विषारी घटकआणि जास्तीचं पाणी शोषलं जातं. भेंडीमधील पाचक  फायबर पचनसंस्थेचं काम सुधारण्यास मदत करतात. यामुळे भेंडी खाणं आवश्यक आहे.

छायाचित्र- गुगल

6. भेंडीमधील अ जीवनसत्त्वामुळे दृष्टी सुधारते. तसेच भेंडीमधील क आणि इ जीवनसत्त्व रोगप्रतिकारशक्ती वाढवते. तसेच हे गुणधर्म ऑक्सिडेटिव्ह ताण घालवतात. थकवा घालवतात, अशक्तपणा कमी करतात. तसेच नैराश्याचा सामना करणार्‍यांना, अल्सर आणि फुप्फुसांचा दाह हे आजार असणार्‍यांना भेंडी खाल्ल्यानं फायदा झाल्याचं अभ्यासातून सिध्द झालं आहे. 

Web Title: Healthy okra: 6 benefits of okra which makes health strong.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.