Vegetables For Gut Health : आतड्यांची समस्या जसे की, सूज किंवा अल्सर जंक फूडूस किंवा तळलेल्या पदार्थांमुळे होतात. एकदा का आतड्यांमध्ये काही बिघाड झाला तर अन्न पचन होत नाही आणि हळूहळू शरीरातील इतर अवयव सुद्धा निकामी होऊ लागतात. म्हणजे पुढे जाऊन जीवाला धोका होतो. त्यामुळे आतड्या हेल्दी ठेवण्यासाठी काय करावं किंवा आतड्यांसाठी कोणत्या भाज्या फायदेशीर असतात हे जाणून घेऊ. आम्ही तुम्हाला ४ अशा भाज्यांबाबत सांगणार आहोत, ज्यात फायबर भरपूर प्रमाणात असतं. तसेच या भाज्यांमध्ये पाणी सुद्धा मुबलक असतं. नियमितपणे जर या भाज्या खाल्ल्या तर आतड्यांसंबंधी समस्या दूर राहतील.
आतड्या हेल्दी ठेवणाऱ्या भाज्या
टोमॅटोमध्ये पाणी भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहतं. त्यासोबतच यात अॅंटी-ऑक्सिडेंट्सही असतात, जे आपली पचनक्रिया आणखी चांगली करतात. यात लायकोपीन नावाचं तत्व असतं, जे आतड्यांची सफाई करण्यास मदत करतं. रोज टोमॅटोची भाजी खाल्ल्यानं बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते आणि पोटाला थंडावा मिळतो.
काकडी
उन्हाळ्यात काकडी भरपूर खाल्ली जाते. यात पाणी भरपूर असतं, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहतं. तसेच काकडीनं आतड्यांचं आरोग्यही चांगलं राहतं. काकडीमध्ये फायबर भरपूर असतं त्यामुळे रोज काकडी खाल्ल्यानं पोट साफ होतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या लगेच दूर होते. उन्हाळ्यात भरपूर काकड्या खाल्ल्यानं शरीर शांत आणि थंड राहतं.
पालक
पालक भाजीमध्ये वेगवेगळे व्हिटामिन्स असतात. सोबतच यात पाणी आणि फायबर दोन्ही तत्व जास्त असतात. ज्यामुळे आतड्या निरोगी राहतात आणि त्यांमध्ये जळजळही होत नाही. पोट थंड ठेवण्यासाठी पालक खूप फायदेशीर मानली जाते. आठवड्यातून एक ते दोन वेळा पालक खाल्ल्यास पचन तंत्र मजबूत राहतं.
तुरई
उन्हाळ्यात तुरई भरपूर मिळते. ही एक खूप पौष्टिक भाजी मानली जाते. यात कॅलरी कमी असतात आणि आतड्यांची सफाई सुद्धा करते. ही भाजी पचायला हलकी असते. पोटाच्या आरोग्यासाठी ही भाजी खूप फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात ही भाजी खाल्ल्यानं पोटदुखी, गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता या समस्या दूर होतात.