Join us   

Heart attack : रोजच्या ३ चुकांमुळे कधीही येऊ शकतो हार्ट अटॅक; जीवघेणा आजार टाळण्यासाठी 'अशी' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 1:25 PM

Heart attack : हृदयाचा जीवघेणा आजार टाळण्यासाठी 'अशी' घ्या काळजी अन् तब्येत सांभाळा.

गेल्या काही दशकात जीवनशैली आणि आहाराच्या चुकीच्या सवयी यामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गंभीर प्रकरणांमध्ये, अशा रुग्णांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. हृदयविकार ही सामान्यतः वृद्धत्वाची समस्या मानली जाते, गेल्या काही वर्षांमध्ये तरुण लोक देखील या गंभीर समस्येचे मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित न झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो. या प्रकारचा अडथळा सामान्यतः रक्तवाहिन्यांमध्ये चरबी, कोलेस्टेरॉल आणि इतर पदार्थांच्या साठ्यामुळे निर्माण होतो. (How to prevent heart attack)

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आपण दररोज जाणूनबुजून किंवा नकळत काही गोष्टी करतो ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. आपल्या सवयी सुधारून आपण हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी कमी करू शकतो. (Health Care Tips) कोणत्‍या सवयींमुळे हृदयविकाराचा झटका येण्‍याचा धोका वाढतो. हे आधी समजून घ्यायला हवं. 

वजन नियंत्रणात ठेवा

आजच्या काळात, बहुतेक लोकांचे वजन जास्त आहे किंवा ते लठ्ठ आहे, आरोग्य तज्ज्ञ  लठ्ठपणाला हृदयविकाराच्या जोखीम घटकांपैकी एक मानतात. लठ्ठपणामुळे उच्च रक्तातील कोलेस्टेरॉल, उच्च ट्रायग्लिसराइड, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका वाढतो, या सर्वांमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. जर तुम्ही ओव्हरवेट असाल तर शरीराचे वजन 10%  कमी केल्याने हा धोका कमी होऊ शकतो. हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवायला हवं.

 डायबिटीस नियंत्रणात ठेवतात रोजच्या वापरातील ४ पदार्थ; अचानक शुगर वाढण्याचा टळेल धोका

शारीरिक निष्क्रियता

तुम्हालाही आरामदायक जीवन आवडत असेल तर तुमच्या या सवयीमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. शारीरिक निष्क्रियतेमुळे हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो. जेव्हा शरीर निष्क्रिय होते तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये चरबीयुक्त पदार्थ तयार होऊ लागतात. तुमच्या हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या धमन्या खराब झाल्या किंवा बंद झाल्या तर त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. यामुळेच सर्व लोकांना दररोज व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. नियमित व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका 40 टक्क्यांपर्यंत कमी होतो.

 गर्भाशयाच्या कॅन्सरचे संकेत देतात बायकांमध्ये जाणवणारी 'ही' लक्षणं; तज्ज्ञांनी सांगितले बचावाचे उपाय

धुम्रपान आणि ताण तणाव

रिसर्च दर्शवितो की जे लोक धूम्रपान करतात आणि जास्त तणावाखाली असतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांमध्ये कालांतराने प्लेक तयार होतो. यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे, अधिक ताण घेतल्याने रक्तदाबाची समस्या देखील वाढते, जी हृदयविकारांमध्ये मुख्य घटक म्हणून पाहिली जाते.

टॅग्स : हृदयरोगहृदयविकाराचा झटकाहेल्थ टिप्सआरोग्य