Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हार्ट अटॅक वय पाहून येत नाही; वय २५ असेल तरी हेल्दी लाइफस्टाइल निवडा, त्यासाठी या ५ गोष्टी

हार्ट अटॅक वय पाहून येत नाही; वय २५ असेल तरी हेल्दी लाइफस्टाइल निवडा, त्यासाठी या ५ गोष्टी

World Heart Day: अगदी कमी वयात हृदय विकार जडल्याची किंवा हार्ट अटॅक आल्याची कित्येक उदाहरणे आपण आपल्या सभोवती पाहत असतो. म्हणूनच तर हृदयविकाराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पंचविशीनंतर लाईफस्टाईलमध्ये काही बदल केले पाहिजेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 01:20 PM2021-09-29T13:20:51+5:302021-09-29T13:22:10+5:30

World Heart Day: अगदी कमी वयात हृदय विकार जडल्याची किंवा हार्ट अटॅक आल्याची कित्येक उदाहरणे आपण आपल्या सभोवती पाहत असतो. म्हणूनच तर हृदयविकाराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पंचविशीनंतर लाईफस्टाईलमध्ये काही बदल केले पाहिजेत.

Heart attack does not come with age; Choose a healthy lifestyle even if you are 25 years old, here are 5 things to do | हार्ट अटॅक वय पाहून येत नाही; वय २५ असेल तरी हेल्दी लाइफस्टाइल निवडा, त्यासाठी या ५ गोष्टी

हार्ट अटॅक वय पाहून येत नाही; वय २५ असेल तरी हेल्दी लाइफस्टाइल निवडा, त्यासाठी या ५ गोष्टी

Highlightsअशी बेफिकीरी हृदय विकाराला आमंत्रण देऊन अंगलट येणारी ठरु शकते. म्हणूनच तर पंचविशीनंतर लाईफस्टाईलच्या काही गोष्टी बदला.

हार्ट अटॅक येऊन अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचा कमी वयात झालेला मृत्यू प्रत्येकाला चटका लावून गेला. सिद्धार्थ शुक्ला तर अतिशय फिट होता आणि व्यायाम देखील तो नियमितपणे करायचा. असे असतानाही त्याला हृदयविकाराचा झटका येणे ही अनेकांसाठी एक अचंबित करणारी घटना आहे. सिद्धार्थ शुक्लाच नाही, तर आपल्या आसपासही आपण एकतरी अशी घटना अनुभवलेलीच आहे, ज्यामध्ये कमी वयात हार्ट अटॅक आला आहे. म्हणूनच तर हृदय विकाराचा झटका काही वय बघून येत नाही.

 

आजकाल तर पंचविशीच्या तरूणांना देखील हृदयविकाराचा झटका आल्याचे आपण ऐकतो. म्हणूनच तर पंचविशीत येताच स्वत:च्या आरोग्याबाबत जागरुक व्हा. लाईफस्टाईल बदला आणि तब्येतीचे काही नियम कटाक्षाने पाळा. बऱ्याचदा पस्तिशी येईपर्यंत आरोग्याबाबत अनेक जण फार गंभीर नसतात. पंचविशीनंतर स्वत:चा पैसा हातात खुळखुळू लागतो. त्यामुळे मग थोडी फार चैन, हॉटेलिंग अशा गोष्टी करण्याकडे आणि आयुष्य एन्जॉय करण्याकडे तरूणांचा कल असतो. पण अशी बेफिकीरी हृदय विकाराला आमंत्रण देऊन अंगलट येणारी ठरु शकते. म्हणूनच तर पंचविशीनंतर लाईफस्टाईलच्या काही गोष्टी बदला.

 

१. Squalene चा आहारात समावेश
पंचविशीनंतर Squalene चा आहारातील समावेश वाढविला पाहिजे. Squalene म्हणजे शरीरात असणारे एक ऑर्गेनिक कम्पाउंड. यालाच शार्क लिव्हर ऑईल असेही म्हटले जाते. लहान मुलांच्या शरीरात Squalene मोठ्या प्रमाणात असते. पण ३० ते ४० या वयोगटात शरीरातील Squaleneची पातळी झपाट्याने घसरत जाते. त्यामुळेच आपल्या शरीरात Squaleneची कमतरता निर्माण होऊ नये म्हणून पंचविशीनंतर ऑलिव्ह ऑईलचा आहारातील वापर वाढविला पाहिजे. कारण ऑलिव्ह ऑईल हा Squalene चा सगळ्यात चांगला स्त्रोत आहे. शरीरातील चांगले कोलेस्टरॉल वाढविण्यासाठी आणि वाईट कोलेस्टरॉल कमी करून हृदयाचे कार्य उत्तम ठेवण्यासाठी Squalene अतिशय उपयुक्त् ठरते. Squalene च्या कॅप्सूलही आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकतो. 

 

२. नियमित व्यायाम करा
पंचविशीनंतर प्रत्येकाने आरोग्याबाबत जागरूक होणे गरजेचे आहे. यासाठी नियमित व्यायाम केलाच पाहिजे. अनेकदा सिक्स पॅक, एट पॅक किंवा मग आपले शरीर सुदृढ दिसण्यासाठी व्यायाम करण्याची क्रेझ अनेक तरूणांमध्ये पाहायला मिळते. या व्यायामासोबतच हृदयाची ताकद वाढविणारे, श्वसनसंस्था मजबूत करणारे व्यायामही आवर्जून केले पाहिजेत. हृदयाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी जॉगिंग, रनिंग, एरोबिक्स असा व्यायाम करण्याचा सल्लाही डॉक्टर देतात.

 

३. वजनावर ठेवा नियंत्रण
पंचविशीनंतर एकदा ऑफिस सुरू झालं की तासनतास एका जागी बसून काम करण्याचं प्रमाण वाढत जातं. यामुळे मग अनेक जणांमध्ये स्थूलता येते, लठ्ठपणा वाढत जातो. शरीरावरचे वाढते फॅट हृदयासाठी आणि आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. त्यामुळे पंचविशीनंतर वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण वजन कमी असते, तेव्हाच ते कंट्रोलमध्ये ठेवणे सोपे असते. वजनाचा काटा एकदा का झरझर पुढे सरकायला लागला, की मग त्याला पुन्हा पुर्व पदावर आणणे अतिशय कठीण होते.

 

४. जिभेचे चोचले थांबवा
तरूण वयात निश्चितच वेगवेगळे चटपटीत, मसालेदार पदार्थ खावेसे वाटतात. वयानुसार या पदार्थांचा आस्वाद नक्कीच घ्या. पण किती खायचं, यावर मात्र नियंत्रण ठेवा. ज्या दिवशी अशा गोष्टी जास्त खाणं होतील, त्याच्या दुसऱ्या दिवशी दुप्पट व्यायाम करा आणि खाण्यावर प्रचंड कंट्रोल ठेवा. ताजी फळे, भाज्या, सॅलड, प्रोटीन्स, ड्रायफ्रूट्स, कडधान्ये यांचे आहारातले प्रमाण वाढवा. 

 

५. नियमित आरोग्य तपासणी 
आपण अजून तर तिशीच्या आतबाहेरच आहोत, एकदम फिट आहोत... आपल्याला काय आरोग्य तपासण्यांची गरज.. असं म्हणत अनेक तरूण मंडळी नियमितपणे आरोग्य तपासणी करणे टाळतात. ही चूक करू नका. आपल्याला काही त्रास होत नसेल, आपण एकदम फिट आहोत, असे वाटत असेल, तरी ६ महिन्यांतून एकदा संपूर्ण शरीराची आणि हृदयाची तपासणी निश्चितच करून घ्या. 
 

Web Title: Heart attack does not come with age; Choose a healthy lifestyle even if you are 25 years old, here are 5 things to do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.