Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Heart Attack Prevention : 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे वाढतोय अचानक येणाऱ्या हार्ट अटॅकचा धोका; तज्ज्ञ सांगतात की...

Heart Attack Prevention : 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे वाढतोय अचानक येणाऱ्या हार्ट अटॅकचा धोका; तज्ज्ञ सांगतात की...

Heart Attack Prevention : युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात शास्त्रज्ञांनी सांगितले की, ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे त्यांना इतर लोकांपेक्षा हृदयविकाराचा धोका जास्त असतो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 12:42 PM2022-01-03T12:42:55+5:302022-01-03T12:49:14+5:30

Heart Attack Prevention : युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात शास्त्रज्ञांनी सांगितले की, ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे त्यांना इतर लोकांपेक्षा हृदयविकाराचा धोका जास्त असतो

Heart Attack Prevention : Vitamin d deficiency causing cardiovascular disease says studyHeart Attack Prevention : Vitamin d deficiency causing cardiovascular disease says study | Heart Attack Prevention : 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे वाढतोय अचानक येणाऱ्या हार्ट अटॅकचा धोका; तज्ज्ञ सांगतात की...

Heart Attack Prevention : 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे वाढतोय अचानक येणाऱ्या हार्ट अटॅकचा धोका; तज्ज्ञ सांगतात की...

गेल्या दशकभरात जगभरात हृदयरुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अधिकार्‍यांच्या मते, हृदयविकार हे जागतिक स्तरावर मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. गंभीर बाब म्हणजे या आजाराला वृद्धत्वाची समस्या म्हणून पाहिले जात होते, मात्र आता हा आजार तरुणांमध्येही आढळून येत आहे. मुख्यतः जीवनशैली आणि आहारातील गडबड ही हृदयविकाराची मुख्य कारणे मानली जात होती, तरीही अलीकडील अभ्यासात शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे की विशिष्ट जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो. (Vitamin D and Cardiovascular Disease)

युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात शास्त्रज्ञांनी सांगितले की, ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे त्यांना इतर लोकांपेक्षा हृदयविकाराचा धोका जास्त असतो. या व्हिटॅमिनच्या रोजच्या गरजा आहारातून पूर्ण करण्यावर सर्व लोकांनी भर द्यावा, असे संशोधकांचे म्हणणे आहे. व्हिटॅमिन-डी शरीरासाठी अत्यंत आवश्यक मानले जाते. 

हृदयरोग आणि व्हिटामीन डी (Heart attack and vitamin d) 

अभ्यासात असे दिसून आले की व्हिटॅमिन डीची कमतरता असलेल्या लोकांना उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो, जो हृदयविकाराचा एक प्रमुख घटक मानला जातो. या व्हिटॅमिनची कमतरता असलेल्या लोकांना इतर लोकांच्या तुलनेत हृदयविकाराचा झटका आणि इतर अनेक हृदयविकारांचा धोका असू शकतो. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की जागतिक स्तरावर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग (CVDs) हे जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहेत, ज्यामुळे दरवर्षी अंदाजे 17.9 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो.

लोकांमध्ये व्हिटॅमिन डीच्या गंभीर कमतरतेची प्रकरणे अत्यंत दुर्मिळ आहेत, दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील प्राध्यापक एलिना हायपोनेन म्हणतात, सामान्य प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात त्याची कमतरता हृदयावर नकारात्मक परिणाम करू शकते. शहरी लोकसंख्येमध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची प्रकरणे अधिक दिसतात, याचे मुख्य कारण त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे हे असू शकते. याबाबत लोकांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

सुमारे 267,980 लोकांच्या या अभ्यासात, शास्त्रज्ञांना व्हिटॅमिन डीची कमतरता आणि CVD यांच्यातील संबंधाचे पुरावे आढळले. संशोधकांनी सांगितले की, शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे प्रमाण  विविध प्रकारच्या हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. आहार आणि सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून ही कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न केल्यास जागतिक स्तरावर हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.

व्हिटामीन डी कसं मिळवायचं? (Source of vitamin d)

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आहारात काही विशेष बदल करून व्हिटॅमिन-डीची कमतरता दूर केली जाऊ शकते. याशिवाय सकाळच्या वेळी सूर्यप्रकाशात राहण्याचा फायदा सर्व लोकांना होऊ शकतो. या गोष्टींचा आहारात समावेश केल्यास व्हिटॅमिन-डी सहज मिळू शकते, असे अभ्यासातून दिसून आले आहे. फॅटी फिश, ट्यूना, मॅकेरल आणि सॅल्मन, व्हिटॅमिन डी समृद्ध अन्न जसे की काही डेअरी उत्पादने, संत्री, सोया दूध आणि संपूर्ण धान्य, चीज आणि अंडी, भुईमूग.
 

Web Title: Heart Attack Prevention : Vitamin d deficiency causing cardiovascular disease says studyHeart Attack Prevention : Vitamin d deficiency causing cardiovascular disease says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.