Join us   

हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसतात ५ साधे बदल; वेळीच ओळखा, अचानक येणारा मृत्यू टळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 12:26 PM

Heart Attack Warning Signs : या लक्षणांकडे लक्ष न दिल्यास कधीही मृत्यूची गंभीर स्थिती ओढावू शकते.

सध्याच्या स्थितीत हार्ट अटॅकनं मृत्यू होणं कॉमन झालं आहे. हृदयाच्या गंभीर आजारांमुळे कधीही अटॅक येऊ शकतो. कमी वयातच मृत्यू येण्याचं कारण हा आजार ठरतो. हार्ट अटॅकच्या सुरूवातीच्या  लक्षणांकडे लक्ष न दिल्यानं याचा धोका वाढतो. (Warning Signs of a Heart Attack) हार्ट अटॅक येण्याच्या १ महिना आधी शरीर काही वॉर्निंग साईन्स देते. या लक्षणांकडे लक्ष न दिल्यास कधीही मृत्यूची गंभीर स्थिती ओढावू शकते. (Heart Attack Warning Signs)

जर्नल सर्क्युलेशनमध्ये प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टनुसार हार्ट अटॅक येण्याच्या १ महिना आधीच याची लक्षणं दिसतात. या रिसर्चमध्ये ५०० पेश्रा अधिक महिलांचा समावेश करण्यात आला होता. एकूण सहभागींपैकी ९५ टक्के लोकांना अटॅक येण्याआधी ही लक्षणं दिसली होती. ७१ टक्के लोकांना थकवा जाणवला. तर ४८ टक्के लोकांनी सांगितले की त्यांना झोपेशी संबंधित समस्या उद्भवल्या.  काही महिलांना छातीत दुखणं, छातीत दबाव  याचा सामना करावा लागला. (Heart Attack Symptoms, Risk, and Recovery)

हार्ट अटॅकची लक्षणं

१) थकवा, झोपेची समस्या, अपचन, हृदय धडधडणे, हात कमकुवत, अति विचार किंवा  दृष्टी बदल, भूक न लागणे, हात आणि पायांना मुंग्या येणे, रात्री श्वास घेण्यात अडचण.

कंबरेपर्यंत वाढतील-दाट होतील केस; 'या' ५ पैकी एका तेलानं मालिश करा; लांब केसांचं सिक्रेट

२) हार्टच्या आजारांचे मुख्य संकेत आहेत पचनासंबंधित समस्या. जर सतत पोटात किंवा छातीत जळजळ होत असेल तर हृदयाच्या समस्यांचे संकेत असू शकते. याकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

३) हार्टशी संबंधित आजारांमुळे शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. यामुळे श्वास घ्यायला त्रास होणं, थकवा येणं ही लक्षणं जाणवतात.

४) जर तुम्हाला सतत पोट फुगण्याची समस्या जाणवत असेल आणि अति प्रमाणात गॅस होत असेल तर  त्वरीत डॉक्टरांचा  सल्ला घ्या. 

पोट साफ, आतडे स्वच्छ आणि तब्येत ठणठणीत हवी? रोज खा ही ५ फळं

५) रिपोर्ट्सनुसार पायांमध्ये सूज येणं हार्ट अटॅकचं सगळ्यात कॉमन लक्षण आहे. एक्सपर्ट्सच्यामते जेव्हा हृदय व्यवस्थित रक्त  पंप करत नाही.  तेव्हा पायांमध्ये सूज येण्याची समस्या उद्भवते. अशा स्थिती डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हार्ट अटॅकची कारणं

लठ्ठपणा, मधुमेह, उच्च कोलेस्टरॉल, उच्च बीपी, धुम्रपान आणि जास्त मद्यपान, उच्च चरबीयुक्त आहार. हार्ट निरोगी ठेवण्यासाठी आणि संतुलित आहार घ्या. प्रोसेस्ड, शुगरयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा. याशिवाय नियमित व्यायाम करा, वजन नियंत्रणात ठेवा, रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि साखरेचा स्तर नियंत्रित करा. जर तुम्ही धुम्रपान, मद्यपान करत असाल तर हळूहळू या सवयी सोडा.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्सहृदयरोगहृदयविकाराचा झटका