गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आशियाई लोकांमध्ये अनुवांशिक कारणांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30 टक्के जास्त असते. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी संतुलित आहाराचे पालन करणे, नियमित व्यायाम करणे आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियमितपणे नियंत्रित करणे यावर तज्ञांनी दीर्घकाळ जोर दिला आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात हृदयविकाराच्या वाढत्या जोखमीवर परिणाम करणारा आणखी एक नवीन घटक समोर आला आहे. संशोधकांनी सांगितले की, रात्री योग्य वेळी झोपल्याने हृदयविकाराचा धोका खूप कमी होतो.
हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी रात्री 10-11 च्या दरम्यान झोपा
हृदयविकाराचा झटका अनेकदा जीवघेणा असू शकतो. म्हणून, मुख्य जोखीम घटकांवर लक्ष ठेवणे आणि त्यांना नियंत्रणात ठेवण्याच्या दिशेने कार्य करणे महत्वाचे आहे. कमी चरबीयुक्त आहारापासून ते नियमित व्यायामापर्यंत, हृदयविकाराचा धोका असलेले लोक ते टाळण्यासाठी सर्वकाही करतात. एका नवीन अभ्यासानुसार, झोपण्याची योग्य वेळ हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी करू शकते. अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की रात्री 10-11 वाजता झोपल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो, कारण यामुळे बॉडी क्लॉक चांगले राहण्यास मदत होते.
युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात, तज्ञांनी यूके बायोबँकमधील 88,000 सहभागींचे विश्लेषण केले. त्यांना असे आढळून आले की जे लोक नियमितपणे रात्री 10-11 च्या दरम्यान झोपतात त्यांचे हृदय निरोगी असते, कारण ते शरीराच्या चक्रातील व्यत्यय कमी करते. याशिवाय रात्री 10 वाजण्यापूर्वी झोपी गेलेल्यांमध्ये हृदयविकाराचा धोका 24 टक्क्यांनी वाढल्याचेही आढळून आले आहे. या अभ्यासाचे सह-लेखक असलेल्या एक्सेटर विद्यापीठातील एका तज्ज्ञाने हा खुलासा केला आहे.
....म्हणून कमी वयातच घटतो पुरूषांचा स्पर्म काऊंट; चांगल्या Sex Life साठी जाणून घ्या उपाय
झोपेची कमतरता हृदय रोगाची जोखिम वाढवते?
इंग्लंडची राष्ट्रीय आरोग्य सेवा प्रौढांना कमीत कमी 6 ते 9 तासांची झोप कशी घेता येईल यावर लक्ष केंद्रित करते. पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. कारण दीर्घकाळ झोपेची कमतरता उच्च रक्तदाब, उच्च हृदय गती, हृदयावरील ताण आणि जळजळ यांच्याशी जोडलेली आहे. याशिवाय झोपेच्या कमतरतेमुळे लठ्ठपणा, वजन वाढणे, चयापचय विकार आणि मधुमेहाचा धोका वाढतो.
झरझर वजन कमी होण्यासह डायबिटीसही कंट्रोलमध्ये राहिल; फक्त जेवल्यानंतर १ काम करा
जास्त झोपल्यानं काय होतं?
जे लोक खूप झोपतात त्यांच्यासाठी हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे की जास्त झोपल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की दीर्घकाळ झोपेमुळे अल्झायमर रोगाची लक्षणे आणि स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते, हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी झोप हा एकमेव पॅरामीटर नाही. तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी, तुम्ही चरबीयुक्त अन्न टाळावे तसेच प्लांट बेस्ड डाएट करायला हवं. .