रोज आपण धावपळ करतो घरातील कोणतीही काम करतो त्यासाठी जी एनर्जी लागते ती अन्नातून मिळत असते. जर तुम्ही योग्यवेळी जेवण केले तर शरीर चांगल्या पद्धतीने कार्य करते. अलिकडेच प्रकाशित झालेल्या संशोधनात जेवणाची वेळ आणि हृदयाच्या आजारांमधील संबंध स्पष्ट करण्यात आले आहे. (Heart Health Tips) नेचर कंम्यूनिकेशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार वेळेवर जेवण केल्याने कार्डिओवॅस्कुलर आजारांचा धोका कमी होतो. (Delaying breakfast and dinner increases chances of heart attack)
मेडकल न्यूज टु डे च्या रिपोर्टनुसार वेळेवर जेवल्याने हृदयाचे आजार बऱ्याच प्रमाणात टाळता येतात. कारण उशीरा जेवल्याने रक्तवाहिन्याशी संबंधित आजारांचा धोका असतो. संशोधकांनी ४२ वर्ष वयोगटातील मध्यम वयाच्या १,०३,३८० लोकांवर अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे. उशीरा जेवल्याने शरीरावर काय परिणाम होतो हे या संशोधनातून दिसून आले.( Eating Meals Early Can Help Reduce Cardiovascular Disease Risk)
या अभ्यासानुसार जर तुम्ही दिवसाचे पहिले जेवण सकाळी ९ च्या दरम्यान करत असाल किंवा ८ च्या आधी घेत नसाल आणि शेवटचे जेवण ८ वाजताच्या दरम्यान न करता ९ वाजता करत असाल तर तुम्हाला हृदयाशी संबंधित आजारांचा धोका उद्भवू शकतो. महिलांमध्ये हा धोका जास्त असतो. कारण संध्याकाळी लवकर जेवल्याने रात्री बराचवेळ फास्टींगसाठी मिळतो. कार्डिओवॅस्कुलर आजारांना रोखण्यासाठी ही सवय फायदेशीर ठरते.
जेवणाच्या वेळा चुकवल्यास शरीरावर काय परिणाम होतो?
1) नाश्ता सोडल्यामुळे हृदयाचे आजार होण्याचा धोका वाढतो.
२) एक तास उशीरा जेवल्याने सेरेब्रोवॅक्सुलर आजारांचा धोका ६ टक्क्यांनी वाढतो.
सद्गगुरू सांगतात जेवताना कसं, किती खावं याचे ५ नियम; वजन कंट्रोलमध्ये राहील-आजारही दूर
३) रात्री ९ नंतर जेवण केल्याने सेरेब्रोवॅस्कुलर आजारांचा धोका २८ टक्क्यांनी वाढतो.
४) रात्री लवकर जेवल्याने या आजारांचा धोका ७ टक्क्यांनी कमी होतो.
जेवणाची वेळ सर्काडियन रिदमशी जोडलेली आहे. सर्काडियन रिदम शरीरात बायोलॉजिकल पॅटर्न ठरवते. २४ तासांच्या सायकलवर काम होते ज्यामुळे फिजियोलॉजी, मेटाबॉलिझ्म सुधारतो. जेव्हा शरीर सर्काडियन रिदमपासून बाहेर जाते तेव्हा फॅट स्टोअर करणारे हॉर्मोन्स वाढतात आणि लठ्ठपणाही वाढतो.
सकाळी वॉक करता तरी पोट कमी होईना? वेट लॉससाठी वॉक करताना खाऊन जायचं की नाही-तज्ज्ञ सांगतात...
तुम्ही कोणत्यावेळी ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर करता हे सर्काडियन रिदमवर अवलंबून असते. एक्सपर्ट्सच्य सल्ल्यानुसार तुम्ही सकाळचा नाश्ता ८ पर्यंत करायला हवा. रात्रीचे जेवण ८ च्या आधी करू नका. सुर्यास्तापर्यंत रात्रीचे जेवण करायलाच हवे. जेणेकरून फास्टिंगसाठी जास्तवेळ मिळेल. खाण्यापिण्याच्या वेळा चुकवल्यास तब्येतीवर गंभीर परिणाम होतो.