Join us   

हृदयाचे कार्य सुरळीत ठेवायचे तर १ गोष्ट कराच; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2022 4:47 PM

Heart Health Care Tips : हृदयरोगाची समस्या असणाऱ्यांमध्ये भारत हा जगात सर्वात वरच्या स्थानी आह, त्यामुळे वेळीच काळजी घ्यायला हवी.

ठळक मुद्दे फायबर, प्रोटीन आणि इतर जीवनसत्त्वे असणारा चांगला आहार घ्यायला हवा. धमन्या कडक झाल्य़ाने किंवा त्यांच्यात स्टीफनेस आल्याने हृदयरोगाची समस्या उद्भवते.

हृदय हा आपल्या शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. हृदयाचे कार्य जोपर्यंत सुरळीत आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत. पण एकदा का हृदयाचे कार्य थांबले की काही क्षणात मनुष्य होत्याचा नव्हता होतो हे आपल्याला माहित आहे. हार्ट अॅटॅक ही अशी गोष्ट आहे की ज्यामुळे काही क्षणात आपले जीवन थांबून जाते.  हृदयरोगाची समस्या असणाऱ्यांमध्ये भारत हा जगात सर्वात वरच्या स्थानी आहे. आपल्या देशात १०० मिलियनहून जास्त जण हृदयरोगाचे रुग्ण आहेत. याचे सर्वात महत्त्वाचे कारण ही आपली जीवनशैली हे आहे (Heart Health Care Tips). 

(Image : Google)

वाढते ताणतणाव, खाण्यापिण्याच्या पद्धती, व्यायामाचा अभाव यांमुळे कोलेस्टेरॉल, डायबिटीस, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, व्यसनाधिनता यांसारख्या समस्या वाढतात आणि पर्यायाने त्याचा हृदयावर परिणाम होतो. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी हृदयरोग होण्याची कारणे आणि त्यावर कोणते उपाय करता येतील याविषयी महत्त्वाची माहिती शेअर करतात. इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून त्या आपल्याल ही माहिती देतात. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने दृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता निर्माण होते. आता हे अडथळे कशामुळे निर्माण होतात आणि हृदयाची काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं हे वेळीच समजून घ्यायला हवं. 

आहारात आवर्जून घ्या हा घटक, कारण..

हृदयाचे आणि हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन के २ (Vitamin K2) आहारात अवश्य घ्यायला हवे. त्यामुळे धमन्यांचे कार्य चांगले राहण्यास मदत होते आणि पर्यायाने हृदयरोगाची शक्यता कमी होण्यास मदत होते. धमन्या कडक झाल्य़ाने किंवा त्यांच्यात स्टीफनेस आल्याने हृदयरोगाची समस्या उद्भवते. पण व्हिटॅमिन के २ नियमितपणे घेतल्यास ही समस्या कमी होण्यास मदत होते. वाढत्या वयानुसार प्लॅक म्हणडेच कॅल्शियम डिपॉझिट आणि फॅटस वाढतात आणि हृदयाला रक्तपुरवठा करण्याच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. ३ महिने म्हणजेच १२ आठवडे नियमितपणे व्हिटॅमिन के २ घेतल्यास हृदयाच्या कार्यासाठी ते फायदेशीर ठरते. यासोबतच फायबर, प्रोटीन आणि इतर जीवनसत्त्वे असणारा चांगला आहार घ्यायला हवा. व्यायाम, झोप, व्यसनापासून दूर राहणे अशा जीवनशैलीशी निगडीत गोष्टींकडेही लक्ष द्यायला हवे.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहृदयरोगहृदयविकाराचा झटका