Heart Blockage Symptoms : आपल्या शरीरात अनेक अवयव आहेत आणि त्यांची कामेही वेगवेगळी असतात. शरीरातील सगळ्यात महत्वाचं अवयव हृदय मानलं जातं. कारण ते बंद पडलं जीव जातो. हृदयाद्वारे ऑक्सीजन आणि रक्त शरीराच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं जातं. त्यामुळे हृदय निरोगी राहणं फार महत्वाचं असतं. पण आजकालची चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे हृदयात ब्लॉकेज होण्याची समस्या खूप वाढत चालली आहे. ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. हृदयाच्या धमण्यांमध्ये ब्लॉकेज होण्याला कोरोनरी आर्टरी डिजीज असं (Coronary Artery Disease) म्हटलं जातं. याची काही लक्षणं शरीरात दिसतात जे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही वेळीच सावध होऊन योग्य ते उपचार कराल.
हृदयात ब्लॉकेजची लक्षणं
मळमळ आणि अपचन
डॉक्टरांनुसार, जर छातीत वेदनेसोबत पुन्हा पुन्हा उलटी झाल्यासारखं वाटत असेल किंवा पचन तंत्र बिघडलं असेल तर हा हृदयाच्या धमण्यांमध्ये ब्लॉकेजचा संकेत असू शकतो. हे लक्षण दिसलं तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य ते उपचार करा.
पायांमध्ये वेदना आणि सूज
जर पायांमध्ये वेदना आणि सूज दिसत असेल तर हा सुद्धा हृदयामध्ये ब्लॉकेज असण्याचा संकेत असू शकतो. रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज झाल्यानं शरीराच्या खालच्या भागात तरल पदार्थ जमा होतात. त्यामुळे गुडघे आणि शरीराच्या खालच्या भागात वेदना होतात आणि सूज येते.
थकवा आणि चक्कर येणे
तुम्हाला जर पुन्हा पुन्हा चक्कर येत असेल आणि काही न करता खूप थकवा जाणवत असेल तर हे हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेजचं लक्षण असू शकतं. अशावेळी हृदयाला ब्लड पंप करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे चक्कर येतात आणि थकवा जाणवतो.
श्वास घेण्यास समस्या
एखादं हलकं काम केलं किंवा थोडंही चाललं तरी श्वास घेण्यास समस्या होत असेल तर ही काळजी करण्याची बाब आहे. हा नसांमध्ये ब्लॉकेज असण्याचा संकेत असू शकतो. हृदयाच्या धमण्यांमध्ये ब्लॉकेज झाल्यानं शरीराला पुरेसं ऑक्सीजन मिळत नाही, ज्यामुळे श्वास घेण्यास समस्या होते.
छातीत वेदना
हृदयाच्या धमण्यांमध्ये ब्लॉकेज असेल तर छातीत वेदना होणं हे सगळ्यात मोठं लक्षण आहे. जर तुम्हाला असं काही जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांना दाखवा.