Join us   

छातीत दुखते, कळ येते - ॲसिडिटी म्हणून दुर्लक्ष करू नका, हार्ट अटॅकची तर ही लक्षणे नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2023 4:34 PM

Heartburn or heart attack: When to worry आपल्याला नेमकं अॅसिडिटीमुळे छातीत दुखत आहे? की हार्ट अॅटकमुळे, फरक समजा, स्वतःची काळजी घ्या..

धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे कठीण जाते. अशाच दुर्लक्षामुळे गंभीर आजार शरीरात उद्भवतात. काही आजार आपल्याला समजून येतात. पण काही आजार लगेच कळून येत नाही. त्यातील एक म्हणजे छातीत दुखणे. छातीत दुखत असल्याने अनेकजण गोंधळून जातात. काही लोकांना ते हृदयविकाराच्या झटक्याचे दुखणे वाटते, तर काही लोकं याला अॅसिडिटी किंवा स्नायू दुखणे म्हणून दुर्लक्ष करतात. काहीवेळेला अॅसिडिटीमुळे छातीत दुखते. पण जर हे दुखणे हृदयविकाराच्या संबंधित असले तर? छातीत दुखणे हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं का? ते ओळखायचे कसे?

यासंदर्भात, नवी दिल्लीतील, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल, कार्डिओलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार, डॉ. वनिता अरोरा सांगतात, ''सहसा लोकं हृदयविकाराच्या झटक्यामुळे छातीत येणाऱ्या कळीला गॅस्ट्र्रिटिस, ऍसिडिटी किंवा स्नायू दुखणे म्हणून दुर्लक्ष करतात.

स्नायु दुखीत छातीवर किंवा बरगड्यांवर हात ठेवले की वेदना वाढते, तर हृदयविकाराचा झटक्यात, हात लावून किंवा छातीत दाबून वेदनांमध्ये कोणताही बदल होत नाही. तर दुसरीकडे अॅसिडिटीमुळे छातीच्या मध्यभागी जळजळ होते. छातीत जळजळ होत असेल आणि चालण्याने आराम मिळत असेल, तर समजावे की ही अॅसिडिटी आहे''(Heartburn or heart attack: When to worry).

सतत होणाऱ्या पित्ताच्या त्रासाने वैतागलात?१० उपाय - खवळलेले पित्त होईल शांत

हृदयविकाराच्या स्थितीत ही चिन्हे दिसतात

- हृदयविकाराच्या झटक्यामध्ये छातीत दुखणे थांबत नाही, ही कळ सतत चालू राहते. चालण्याने हा त्रास तीव्रतेने वाढतो.

- छातीत डाव्या बाजूला दुखत असेल आणि खांद्यापर्यंत किंवा हातापर्यंत पोहोचत असेल तर, ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते.

- जर वेदना छातीपासून सुरू होऊन जबड्यापर्यंत पोहोचत असेल तर, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते.

कंबर आणि पाठदुखीने छळलंय, पायाचे तळवे तर कमकूवत नाहीत? ४ उपाय, तळव्यांना द्या ताकद

- कधीकधी छातीत दुखणे मानेपर्यंतही पोहोचते. अशा वेदना गांभीर्याने घेतल्या पाहिजेत.

- जर छातीत कोणतेतरी ओझे ठेवले आहे, असे वाटत असेल तर, हे लक्षण हृदयविकाराच्या झटक्याचे असू शकते.

टॅग्स : हृदयविकाराचा झटकाहृदयरोगहेल्थ टिप्सआरोग्य