Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > अॅसिडिटी होईल म्हणून तळकट-मसालेदार पदार्थ खाणं टाळताय? करून पाहा ३ उपाय, खा बिनधास्त

अॅसिडिटी होईल म्हणून तळकट-मसालेदार पदार्थ खाणं टाळताय? करून पाहा ३ उपाय, खा बिनधास्त

Heartburn Prevention Tips for Spicy Food Lovers : अॅसिडिटीच्या त्रासाला घाबरू नका, त्रास झाल्यास करून पाहा ३ उपाय, मिळेल आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2023 05:09 PM2023-10-18T17:09:09+5:302023-10-18T17:10:33+5:30

Heartburn Prevention Tips for Spicy Food Lovers : अॅसिडिटीच्या त्रासाला घाबरू नका, त्रास झाल्यास करून पाहा ३ उपाय, मिळेल आराम

Heartburn Prevention Tips for Spicy Food Lovers | अॅसिडिटी होईल म्हणून तळकट-मसालेदार पदार्थ खाणं टाळताय? करून पाहा ३ उपाय, खा बिनधास्त

अॅसिडिटी होईल म्हणून तळकट-मसालेदार पदार्थ खाणं टाळताय? करून पाहा ३ उपाय, खा बिनधास्त

सध्या अॅसिडिटीचा (Acidity) त्रास होणं सामान्य झालं आहे. बिघडलेली जीवनशैली, जेवण करण्याची अनियमित वेळ, जागरण, बदलेले आहाराचे स्वरूप या कारणांमुळे अपचन किंवा अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. पण या कारणांमुळे अनेक लोकं तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाणं टाळतात.

मुख्य म्हणजे या पदार्थांमुळे अॅसिडिटी, छातीत जळजळ, उलट्या, पोटात गॅस, आंबट ढेकर येणे, पोट फुगणे अशा प्रकारचा त्रास निर्माण होतो. जर आपल्याला अचानक छातीत जळजळण्याचा त्रास होत असेल तर, आपल्याला गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिझीज देखील होऊ शकते(Heartburn Prevention Tips for Spicy Food Lovers).

याकारणामुळे बरेच जण आवडणारे तळलेले, मसालेदर पदार्थ खाणं टाळतात. जर आपल्याला तळकट, मसालेदार पदार्थ खायचे असेल, पण अॅसिडिटीच्या त्रासामुळे टाळत असाल तर, आयुर्वेदिक डॉक्टर दिक्षा भावसार यांनी संगीतलेल्या ३ उपायांना फॉलो करून पाहा.

बॅड कोलेस्टेरॉल वाढल्याच्या पायांवर दिसतात ६ खुणा, वेळीच लक्षणं ओळखा-दुर्लक्ष केलं तर जीवाला धोका

अॅसिडिटीवर ३ रामबाण उपाय

मनुके

जर आपल्याला अॅसिडिटीचा होत त्रास असेल तर, काळे मनुके खा. मनुके खाल्ल्याने अॅसिडिटीचा त्रास कमी होतो. यात अँटिइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. यासाठी १० ते १५ काळे मनुके पाण्यात चांगले धुवून घ्या. नंतर कपभर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी हे मनुके खा आणि त्याचे पाणी प्या.

आवळा

आवळा खाल्ल्याने पचनाच्या संबंधित त्रास कमी होतो. यातील गुणधर्मांमुळे अपचन, अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेसारखा त्रास होत नाही. यासाठी एका वाटीत आवळा पावडर घ्या, त्यात एक चमचा तूप मिसळा. तयार पेस्ट खा, त्यानंतर ग्लासभर कोमट पाणी प्या.

अनवाणी चालण्याचे ७ भन्नाट फायदे, डोळ्यांपासून हृदयापर्यंत अनेक आजारांपासून मिळेल आराम

धन्याचे  पाणी

धन्याचे पाणी पचनसंबंधित समस्या दूर करण्याचे काम करते. यासह पोटातील जळजळ, गॅस, पोटदुखीसारख्या समस्यांमधून सुटका मिळते. यासाठी रात्रभर पाण्यात धणे भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी गाळून त्या पाण्यात खडीसाखर मिसळून पाणी रिकाम्या पोटी प्या. आपण हे पाणी दिवसभरात कधीही पिऊ शकता.

Web Title: Heartburn Prevention Tips for Spicy Food Lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.