Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उकाड्याने हैराण-तापमान चाळीशी पार? उष्माघाताचा धोका टाळा, खा ५ गोष्टी रोज दुपारी

उकाड्याने हैराण-तापमान चाळीशी पार? उष्माघाताचा धोका टाळा, खा ५ गोष्टी रोज दुपारी

Heatwave in India: Diet and nutrition tips to remain healthy : उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून दुपारच्या वेळीस न चुकता खा ५ पदार्थ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2024 03:51 PM2024-04-17T15:51:31+5:302024-04-17T16:09:28+5:30

Heatwave in India: Diet and nutrition tips to remain healthy : उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून दुपारच्या वेळीस न चुकता खा ५ पदार्थ..

Heatwave in India: Diet and nutrition tips to remain healthy | उकाड्याने हैराण-तापमान चाळीशी पार? उष्माघाताचा धोका टाळा, खा ५ गोष्टी रोज दुपारी

उकाड्याने हैराण-तापमान चाळीशी पार? उष्माघाताचा धोका टाळा, खा ५ गोष्टी रोज दुपारी

एप्रिल महिना सुरु होताच सर्वत्र उन्हाच्या झळा बसू लागतात (Summer Special). काही ठिकाणी ४० डिग्री अंशावर पारा गेला आहे. ज्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास होऊ लागला आहे. उन्ह वाढलं की, घराबाहेर पाऊल ठेवायला नको वाटतं (Health care). तरीपण कामानिमित्त घराबाहेर पडावं लागतं. या दिवसात त्वचा अचानक गरम पडते, नाडी आणि हृदयाचे ठोके वेगाने चालतात, घाम न येणे यासह आपण अर्धवट शुद्धीत असतो. जर ही लक्षणं आपल्यालाही जाणवत असतील तर, वेळीच उष्माघातावर उपाय केलेला बरा. काही जण दुपारच्या वेळी खात नाही.

फक्त पेयांवर दिवस काढतात. पण हे करणं योग्य नाही. दुपारच्या वेळेस आपण घराबाहेर असाल तर, आरोग्याची काळजी घ्यायला हवी. दुपारच्या वेळेस उष्माघाताचा त्रास होऊ नये, म्हणून काय खावे? याची माहिती फार्मइझी या वेबसाईटला बीएएमएस डॉक्टर राजीव सिंग यांनी दिली आहे(Heatwave in India: Diet and nutrition tips to remain healthy).

उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून काय खावे?

लिक्विड डाएट

उन्हाळ्यात शरीरातून खूप घाम निघतो. ज्यामुळे सतत पाण्याची कमतरता जाणवते. या दिवसात जितका जास्त घाम येईल, तितका अशक्तपणा जाणवेल. या दिवसात आहारात लिक्विड पदार्थांचा आहारात समावेश करा. आपण दुपारच्या जेवणापूर्वी ताक पिऊ शकता. ताक प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. याशिवाय आपण जेवणासोबत दही खाऊ शकता.

पुदिन्याची पानं पिवळी होतात? २ दिवसात खराब? ३ टिप्स; पुदिना-कोथिंबीर टिकेल महिनाभर

काकडी

उन्हाळ्यात बाजारात काकडी मुबलक प्रमाणात मिळते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी काकडी खूप प्रभावी ठरते. यात अ‍ॅंटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते, जे बॉडी डिटॉक्सिफाय करते. पण काकडी खाल्ल्यानंतर लगेच भरपूर पाणी पिऊ नका. काकडी आधी खा मग दुपारचे जेवण करा. यामुळे पोट भरेल शिवाय वजन कमी करण्यासही मदत होईल.

दही

दही शरीरात प्रोबायोटिकप्रमाणे काम करते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. आपण आपल्या दुपारच्या आहारात दह्याचा समावेश करू शकता. त्यात गुड बॅक्टेरियाव्यतिरिक्त प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी ६ आणि व्हिटामिन बी १२ असते. आपण दुपारच्या जेवणात नियमित एक वाटी दही खाऊ शकता. यामुळे पोटाचे विकार दूर राहतात.

रामनवमी स्पेशल : करा प्रसादाचा शिरा, १ वाटीचे प्रमाण - पाहा परफेक्ट रेसिपी

कांदा

उन्हाळ्यात कांदा खाण्याचे अनेक फायदे आहेत. या दिवसात कांदा खाल्ल्याने शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते. आपण दुपारच्या जेवणात कांदा सॅलडच्या स्वरुपात खाऊ शकता. कांद्यात अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. ज्यामुळे उष्माघात टाळता येईल.

लिंबू

उन्हाळ्यात आपण लिंबू पाणी अधिक प्रमाणात पितो. लिंबू पाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. शिवाय त्यात व्हिटॅमिन सी आढळते. ज्यामुळे आरोग्य आणि त्वचाही चमकदार दिसते.

कोणते पदार्थ टाळावे?

उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून काही पदार्थ टाळणे गरजेचं आहे. यादिवसात तेलकट, तिखट, फास्टफूडसारखे पदार्थ टाळावे. यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो. ज्यामुळे दिवसभर अस्वस्थ वाटू शकते. आपण नाचणीचे पदार्थ खाऊ शकता. शिवाय सोलकढी, कोकम सरबत, हिरव्या पालेभाज्या आणि फळे खायला हवे.

Web Title: Heatwave in India: Diet and nutrition tips to remain healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.