सध्याचं प्रदूषण वातावरण आरोग्यासाठी घातक ठरत आहे. आपण ज्या हवेत श्वास घेतो, ती दिवसागणिक अधिक प्रदूषित होत चालली आहे. मोठ - मोठ्या इंडस्ट्रीमुळे सर्वत्र धुराचं साम्राज्य पसरले आहे. प्रदूषित हवेचा थेट परिणाम फुफ्फुसांवर होतो. ज्यामुळे फुफ्फुस खराब आणि कमकुवत होतात. कमकुवत आणि दूषित फुफ्फुस सीओपीडी, एम्फिसीमा, ब्रॉन्काइक्टेसिस आणि क्रॉनिक ब्राँकायटिस यासारख्या जीवघेण्या रोगांचा धोका वाढवतात. फुफ्फुसात साचलेली घाण काढायची असेल तर, आहारात ५ पदार्थांचा समावेश करा.
अमेरिकन डॉक्टर जोसेफ मर्कोला यांच्या मते, ''फुफ्फुस मजबूत करून श्वसनाचे आरोग्य सुधारण्यासाठी अधिकाधिक सुपरफूडचे सेवन करा. हे पदार्थ जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असावे, जे फुफ्फुसाचे कार्य वाढवण्यास मदत करतील, यासह श्वसन समस्या टाळण्यास मदत करतील''(Here are 5 foods that may help boost lung function).
कच्चे आणि ताजे पदार्थ खा
फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी प्रोसेस्ड फूड्स खाणे टाळा. त्याऐवजी, आपण आपल्या आहारात अधिक कच्चे आणि ताज्या पदार्थांचा समावेश करू शकता.
हेल्दी फॅट्सचे सेवन करा
आपल्या दैनंदिन कॅलरीजपैकी 50 ते 85 टक्के हेल्दी फॅट्समधून शरीराला मिळायला हवे. यासाठी दररोज ड्रायफ्रुट्स, एवोकॅडो, ऑलिव्ह ऑईल आणि बियांचे सेवन करा.
आहारात भाज्यांचे प्रमाण वाढवा
फुफ्फुस साफ व त्याचे कार्य योग्यरित्या पार पाडण्यासाठी, आहारात स्टार्च नसलेल्या भाज्यांचा समावेश करा. ब्रोकोली, गाजर, सेलेरी, मिरची, टोमॅटो या भाज्या नियमित खा.
वाढलेले वजन - मासिक पाळी अनियमित? तज्ज्ञ सांगतात, हर्मोनाल घोळाची ४ कारणे
प्रोटीन पण आहे आवश्यक
फुफ्फुसांच्या आरोग्याला चालना देण्यासाठी, आपण अधिक प्रथिने खाणे आवश्यक आहे. आपल्या शरीराच्या वजनाच्या प्रति पौंड 0.7 ते 1.0 ग्रॅम प्रथिने खावे.
भरपूर पाणी प्या
रिफाइंड शुगर, फ्रुक्टोज, प्रोसेस्ड ग्रेन किंवा मैदा खाणे टाळा. या सर्व गोष्टी थेट तुमच्या फुफ्फुसांना कमकुवत करण्याचे काम करतात. याशिवाय सोडा, कोल्ड्रिंक्स इत्यादी टाळा, त्याऐवजी भरपूर स्वच्छ पाणी प्या.