दिवाळी, वाढदिवस, लग्न किंवा इतर सणवार असो या दिवसात आपण कपड्यांची खरेदी करतो. ऑनलाईन असो किंवा बाजारात जाऊन, शॉपिंग प्रत्येकाला आवडते. अशा वेळी हे कपडे आपल्याला परफेक्ट बसतील की नाही, हे चेक करण्यासाठी आपण एकदा ट्राय करून पाहतो. परंतु, कपडे ट्रायल करण्यापूर्वी एकदा आपल्या आरोग्याचा विचार करा. कारण यामुळे आपण आजारी देखील पडू शकता.
सध्या ऑनलाईन कपडे अधिक प्रमाणात खरेदी केले जातात. कपडे व्यवस्थित बसत नसल्यास आपण परत रिटर्न करतो. त्याचप्रमाणे शो रूम्समध्ये लोकं कपडे ट्राय करून पाहतात, व आवडत नसल्यास ते तिथेच सोडून देतात. पण यामुळे स्किन इन्फेक्शनची समस्या निर्माण होऊ शकते. यासंदर्भात, दिल्ली येथील एम्स रुग्णालयातील डर्मेटोलॉजिस्ट डॉ. संजय शर्मा यांनी, नवीन कपड्यांद्वारे हे विषाणू एका व्यक्तीवरून दुसऱ्या व्यक्तीवर कशा प्रकारे परिणाम करतात याची त्यांनी माहिती दिली आहे(Here is why you should never wear new clothes without washing them).
कपडे ट्रायल केल्याने होईल स्किन इन्फेक्शन
शो रूममध्ये कपडे खरेदी करण्यापूर्वी आपण एकदा ट्राय करून पाहतो. कपडे फिट बसतात की नाही हे चेक करतो. त्याच प्रमाणे ऑनलाईन शॉपिंग केल्यानंतर कपड्याची फिटिंग चेक करतो. हे कपडे फिट बसत नसल्यास आपण रिटर्न करतो. अशा वेळी एखद्या व्यक्तीचा घाम, व त्याला काही स्किन इन्फेक्शन असेल तर त्या कपड्यांवर चिकटते. ज्याचा थेट परिणाम आपल्या स्किनवर होतो. त्यामुळे कपडे घालण्यापूर्वी धुवून घालण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
पडल्या - पडल्या २ मिनिटात लागेल झोप, फॉलो करा सोपी लिएइसी टेक्नीक, शांत - गाढ झोपेसाठी बेस्ट पर्याय
रसायनांमुळे पडू शकता आजारी
तज्ज्ञांच्या मते, ''बहुतांश कंपन्या कपड्यांवर रंग देण्यासाठी अनेक रसायनांचा वापर करतात. जे आपल्या आरोग्य आणि स्किनसाठी हानिकारक ठरते. कंपन्या या रसायनाबाबत फारशी माहिती देत नाही. त्यामुळे कपडे ट्रायल केल्यानंतर त्वचा धुवून घ्या.''
धाप लागते, श्वास कोंडतो - ५ गोष्टी करा तातडीने - सोपे लाईफस्टाईल बदल - श्वास घ्या मोकळा
या लोकांना संसर्ग अधिक होऊ शकतो
तज्ज्ञांच्या मते, ''नवीन कपड्यांचा धोका लहान मुले आणि गर्भवती महिलांना अधिक असतो. अशा वेळी लहान मुलांना मोलस्कम सारख्या विषाणूजन्य संसर्गाचा धोका जास्त असतो. त्याचबरोबर गरोदरपणात महिलांची प्रतिकारशक्तीही कमकुवत असते, त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.''