Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दीर्घायुष्य जगण्यासाठी काय खाल्लं पाहिजे? अमेरिकन रिसर्चचा दावा; म्हणाले शाकाहारी खाल्ल्याने..

दीर्घायुष्य जगण्यासाठी काय खाल्लं पाहिजे? अमेरिकन रिसर्चचा दावा; म्हणाले शाकाहारी खाल्ल्याने..

Here's how to eat to live longer, new study says : स्वयंपाकघरातल्या शाकाहारी पदार्थ खाल्ल्याने आपण कायम फिट आणि तंदुरुस्त दिसू शकता..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2024 02:51 PM2024-08-02T14:51:39+5:302024-08-02T14:53:22+5:30

Here's how to eat to live longer, new study says : स्वयंपाकघरातल्या शाकाहारी पदार्थ खाल्ल्याने आपण कायम फिट आणि तंदुरुस्त दिसू शकता..

Here's how to eat to live longer, new study says | दीर्घायुष्य जगण्यासाठी काय खाल्लं पाहिजे? अमेरिकन रिसर्चचा दावा; म्हणाले शाकाहारी खाल्ल्याने..

दीर्घायुष्य जगण्यासाठी काय खाल्लं पाहिजे? अमेरिकन रिसर्चचा दावा; म्हणाले शाकाहारी खाल्ल्याने..

दीर्घायुष्य जगण्यासाठी काय केले पाहिजे? काय खाल्लं पाहिजे असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो (Health Tips). उत्तम आरोग्य हवं असेल तर, आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे (Live Longer). औषध किंवा टॉनिक नसून, व्यायाम आणि आहारावर सगळं काही अवलंबून असतं. एका नव्या स्टडीनुसार, शाकाहारी डाएटमुळे बायोलॉजिकली वय वाढण्याची प्रक्रिया कमी होते. म्हणजेच आपलं वाढतं वय लवकर कळून येत नाही.

बायोमेडिकल सेंट्रल मेडिसिन या जर्नलच्या रिसर्चमध्ये शाकाहारी पदार्थ खाल्ल्याने कशा पद्धतीने वयोमान कमी दिसते, आरोग्य कसे सुदृढ राहील, याची माहिती देण्यात आली आहे(Here's how to eat to live longer, new study says).

रिसर्च काय सांगते?

एका अमेरिकन संशोधन पथकाने जुळ्या मुलांना आठ आठवडे शाकाहारी पदार्थ खायला दिले. ज्यामध्ये शाकाहारी डीएनएवर आहाराचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यात आला. शाकाहारी आहार घेणाऱ्यांमध्ये, हृदय, यकृत तसेच चयापचय क्रिया बुस्ट होते. ज्यामुळे शरीर सुदृढ राहते.

गरम तव्यावर ओतले १ रुपयाचे शाम्पूचे सॅशे, पाहा कमाल- तवा कसा काय चमकायला लागला नव्यासारखा

शिवाय शाकाहारी आहारामध्ये इतर खाण्याच्या पद्धतींपेक्षा कमी कॅलरीज, सॅच्युरेटेड फॅट्स आणि बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी असते. याशिवाय शाकाहारी आहारामध्ये फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ज्याचा फायदा आरोग्याला होतो.

हृदय आणि यकृत निरोगी

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, शाकाहारी लोक इतर प्रकारचे पदार्थ खाणाऱ्यांपेक्षा जास्त जगतात. शाकाहारी पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे लठ्ठपणा, टाईप - २ मधुमेह आणि हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका टळतो.

मासिक पाळीत पोट दुखते-पायात गोळे येतात? ३ गोष्टी टाळा, क्रॅम्प होतील चटकन कमी

वजन होते कमी

शाकाहारी पदार्थ खाल्ल्याने वजन वाढत नाही. शाकाहारी आहारामुळे कॅलरीजचे प्रमाण कमी होते. वजन कमी झाल्याने एपिजेनेटिक एजिंग कमी होते. ज्यामुळे आपली स्किन आणि केसही निरोगी राहतात.

Web Title: Here's how to eat to live longer, new study says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.