Join us   

१५ दिवस भाज्या आणि फळं खाल्लीच नाहीत तर? डॉक्टर सांगतात, नखरे करण्याचे ३ दुष्परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2023 1:29 PM

Here’s what happens to your body when you stop eating fruits and veggies for 15 days भाज्या-फळंच फारशा न खाता जंक आणि सटरफटरच खात राहिले तर शरीराचं तंत्र कसं बिघडतं पाहा..

आपल्या शरीराला असंख्य पोषक तत्वांची गरज असते. हे पौष्टीक घटक आपल्याला फळं व भाज्यांमधून मिळते. हेल्दी लाईफ जगण्यासाठी पौष्टीक आहार गरजेचं आहे. काही लोकं पाले भाज्या खाण्यास नाकं मुरडतात. पण योग्य फळं - भाज्या न खाल्ल्यास त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. जर एखाद्या व्यक्तीने १५ दिवसांसाठी फळं - भाज्या खाणंच टाळलं तर? तर शरीराचं सगळं तंत्रच कायमचं बिघडून जातं(How Dangerous is a Lack of Fruit and Vegetables?).

यासंदर्भात, न्युज १८ शी बोलताना अपोलो हॉस्पिटल्स, बेंगळुरू येथील पोषण आणि आहारशास्त्र विभागाच्या प्रमुख, डॉ. प्रियंका रोहतगी सांगतात, ''१५ दिवस भाज्या व फळे न खाल्ल्याने शरीरात फक्त कार्बोहायड्रेट्स आणि खराब चरबी साठून राहते. ज्यामुळे शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजांची मोठी कमतरता होते.

पोटात गुडगुड होते, पोट फुगल्यासारखे वाटते? ओवा-हिंगाचा करा भन्नाट उपाय, पोटाला चटकन आराम

दररोज संतुलित आहार घेणे गरजेचं आहे. जर शरीरात जीवनसत्त्वे किंवा खनिजांची कमतरता भासली तर, विविध आजार  उद्भवू शकतात. भाजी व फळे पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांसारख्या अनेक खनिजांचा स्त्रोत आहे. ज्यामुळे शरीरात उर्जेची कमतरता भासते.

शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असल्यास स्कर्वी रोग होतो. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो. जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे शिरा फुटू लागतात व शरीरातून रक्त बाहेर पडू लागते. लोह, कॅल्शियम, आयोडीनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, ऑस्टिओपोरोसिस, यांसारखे आजार होतात. त्यामुळे आहारात भाज्या व फळांचा समावेश हवा.

झोपेत आपण धाडकन पडल्यासारखे वाटते? हा भास की आजार? नक्की कारण काय..

सध्याच्या काळात लोकांमध्ये जंक फूड खाण्याची क्रेझ आहे. जंक फूड खाल्ल्यामुळे घरातील पौष्टीक अन्न पोटात जात नाही. अशा स्थितीत शरीराला योग्य आहार मिळत नाही. काही लोकांना पाणी न पिण्याची सवय असते. असे केल्याने कळत - नकळत आपण आजारालाच आमंत्रण देत आहोत. कमी वयातच लोकांना हृदयाच्या संबंधित आजार, ब्लड प्रेशरचा त्रास, मधुमेह अशा प्रकारचे घातक आजार होत आहे. जे लोकं आधीच आजारासह दोन हात करीत आहे, त्यांना अधिक त्रास होऊ शकतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सभाज्याफळेआरोग्यलाइफस्टाइल