Join us   

दूध प्यायले नाही तर काय होईल? कॅल्शियमच्या कमतरतेव्यतिरिक्त शरीरात आणखी काय बदल घडतील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2023 3:13 PM

Here's what happens when you stop having milk एक महिना दूध न प्यायल्याने आरोग्यात काय बदल घडतील? तज्ज्ञ सांगतात, दूध किती महत्वाचे आहे.

दूध म्हणजे संपूर्ण आहार. दूध पिण्याचे आपण अनेक फायदे ऐकले असतील. लहानपणापासून आपल्याला दूध पिण्याची सवय लावण्यात आलेली असते. बहुतांश लोकं दूध पिण्यास टाळाटाळ करतात. सध्या व्हिगनचा ट्रेण्ड सुरु आहे. व्हिगन डाएटमध्ये लोकं दूध पीत नाही. तर काही लोकं आवडत नाही म्हणून दूध पिणे टाळतात. परंतु, दूध न प्यायल्याने आरोग्यावर खरंच काही परिणाम होतो का?

दूध हे कॅल्शियम, पोटॅशियम, प्रथिने, फॉस्फरस इत्यादी अनेक पोषक तत्वांचा उत्तम स्त्रोत आहे. यामुळे हाडे तर मजबूत होतातच, शिवाय आरोग्याला अनेक फायदे मिळतात. परंतु, एक महिना दूध न प्यायल्याने आरोग्यावर गंभीर समस्या उद्भवतात का? यासंदर्भात, श्याम शाह मेडिकल कॉलेजमधील पोषणतज्ज्ञ रश्मी गौतम यांनी एक महिना दूध न प्यायल्याने शरीरात काय बदल घडतील याची माहिती दिली आहे(Here's what happens when you stop having milk).

दूध न प्यायल्याने शरीरात खरंच काही बदल घडतात का?

कॅल्शियमची कमतरता भासते

पोषणतज्ज्ञ रश्मी गौतम सागंतात, 'निरोगी आरोग्यासाठी दूध पिणे गरजेचं आहे. जर आपण नियमित दूध पीत असाल तर, दूध पिणे सोडू नका. दूध पिणे सोडल्याने शरीरात कॅल्शियमची कमतरता भासू शकते. ज्यामुळे हाडांशी संबंधित समस्या वाढतात. कमी वयात दूध सोडल्याने उतार वयात हाडं ठिसूळ होण्याची शक्यता वाढतात.

दात पिवळे म्हणून चेहऱ्यावरची स्माइल हरवली? चिमूटभर मीठाचे ३ सोपे उपाय, दात दिसतील पांढरेशुभ्र

शरीरात होतील बदल

पोषणतज्ज्ञांच्या मते, 'दूध पोषक तत्वांचे भांडार आहे. दुधात कॅल्शियम, पोटॅशियम, प्रथिने आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात आढळते. जर नियमित दूध पीत असाल तर, अनेक गंभीर आजार दूर राहू शकतात. जर महिनाभर आपण दूध पिणे बंद केले तर, शरीरात कॅल्शियमची पातळी कमी होऊ शकते. दुग्धजन्य पदार्थांच्या कमतरतेमुळे त्वचेच्या निगडीत समस्या उद्भवू शकतात. यासह शरीरात उर्जेची कमतरता देखील भासू शकते.'

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता या गोष्टी खाऊन पूर्ण करा

- जर आपण दूध स्वेच्छेने सोडत असाल तर, प्लांट बेस्ड दुधाचे सेवन करा. याव्यतिरिक्त बदाम दूध, सोया दूध किंवा नारळाचे दूध देखील पिऊ शकता. हे दूध कॅल्शियम, व्हिटॅमिन डी सारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहेत. स्वतःला फिट आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित याचे सेवन करा.

तुम्ही रात्री अंधारातही तासंतास मोबाइल स्क्रीन पाहता? ४ गंभीर आजार होण्याचा धोका, लक्षणांची ही घ्या यादी

- दुधाव्यतिरिक्त आपण आपल्या डाएटमध्ये हिरव्या पालेभाज्यांना अॅड करू शकता. पाले भाज्यांमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आढळते.

- दुधापासून मिळणाऱ्या पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी, आहारात नट्स आणि बियांचा समावेश करा. ड्रायफ्रुट्स हे कॅल्शियमचे उत्तम स्त्रोत मानले जाते. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.

टॅग्स : दूधहेल्थ टिप्सआरोग्य