लघवीचा रंग आपल्या आरोग्याविषयी अनेक संकेत देतो. उन्हाळ्याच्या दिवसात, मोठ्या संख्येने लोक लघवीच्या पिवळ्या रंगाची तक्रार करतात. काही वेळा हा त्रास काही दिवसात स्वतःच बरा होतो, तर काही वेळा लघवीचा रंग बराच काळ पिवळा राहतो. अनेकदा डॉक्टर लघवीची चाचणी करण्यासाठी सांगतात. लघवीच्या चाचणीद्वारे मूत्रमार्गातील अनेक रोग आणि समस्या शोधण्यासाठी मदत होऊ शकते.
पण बराच काळ लघवीचा रंग पिवळा असेल तर, हे नक्की कशाचे संकेत आहे? याबाबतीत न्युज १८ या वेबसाईटला माहिती देताना नवी दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटल, यूरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ अमरेंद्र पाठक सांगतात, ''जर एखाद्या व्यक्तीने पुरेसे पाणी प्यायले नाही तर, लघवीचा रंग पिवळा होऊ शकतो. उन्हाळ्यात पुरेसे पाणी प्यायल्याने देखील पिवळ्या रंगाची लघवी होऊ शकते''(Here's what your Yellow urine colour is telling you about your health).
ते पुढे म्हणतात, ''खरं तर अति उष्णतेमुळे आपल्या शरीरातून घामाच्या रूपाने पाणी बाहेर पडते, व लघवीचे उत्पादन कमी होते. त्यामुळे लघवी एकाग्र होऊन त्याचा रंग पिवळा होतो. ही धोक्याची बाब नाही, पण योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने लघवीचा रंग सामान्य होऊ शकतो.''
इतर कारणे
डॉ अमरेंद्र पाठक यांच्या मते, ''डिहायड्रेशनमुळे अनेक वेळा लघवीचा रंग पिवळा होतो. जर एखादी व्यक्ती भरपूर पाणी पीत असेल आणि तरीही लघवीचा रंग बराच काळ पिवळा असेल तर, ही लक्षणं कावीळची असू शकतात. अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांना भेटून तपासणी करून घ्यावी.''
मुलांचा मेंदू तल्लख व्हावा, हुशार व्हावी मुलं असं वाटतं? आहारात हवेच ५ पदार्थ
ते पुढे म्हणतात, ''अनेक वेळा लोकांच्या लघवीचा रंग लाल होऊ लागतो. सामान्यत: जेव्हा लघवीमध्ये रक्त येऊ लागते तेव्हा त्याचा रंग लाल होतो. किडनी स्टोन, युरेटर स्टोन, व लघवीच्या पिशवीतील कॅन्सरमुळे ही स्थिती उद्भवू शकते. अशा स्थितीत, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.''
गरोदरपणानंतर १० दिवसात १० किलो वजन कमी? गौहर खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, फोटो व्हायरल..
उन्हाळ्यात किती प्रमाणात पाणी प्यावे
डॉक्टरांच्या मते, ''उन्हाळ्यात दररोज किमान ३ लिटर पाणी प्यावे. किडनी स्टोनच्या रुग्णांनी जास्त पाणी प्यावे. उन्हाळ्यात पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते, व डिहायड्रेशनचा धोका कमी होतो. या ऋतूत लोकांनी आपल्या आहारात द्रवपदार्थाचाही समावेश करावा.''