Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मला लागली कुणाची उचकी ? उचकी घालवण्यासाठी सोपे झटपट उपाय... उचकी होईल मिनिटांत गायब...

मला लागली कुणाची उचकी ? उचकी घालवण्यासाठी सोपे झटपट उपाय... उचकी होईल मिनिटांत गायब...

Apan Vayu Yoga Mudra Will Stop Hiccups In 15 Minutes : उचकी रोखण्यासाठी आपण अनेक उपाय करतोच परंतु एखादे सोपे आसन करुन आपण झटपट आपल्याला लागलेली उचकी थांबवू शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2023 04:14 PM2023-05-25T16:14:03+5:302023-05-25T16:26:38+5:30

Apan Vayu Yoga Mudra Will Stop Hiccups In 15 Minutes : उचकी रोखण्यासाठी आपण अनेक उपाय करतोच परंतु एखादे सोपे आसन करुन आपण झटपट आपल्याला लागलेली उचकी थांबवू शकतो.

Hiccups will stop in 15 minutes with Apana-Vayu Yoga Mudra | मला लागली कुणाची उचकी ? उचकी घालवण्यासाठी सोपे झटपट उपाय... उचकी होईल मिनिटांत गायब...

मला लागली कुणाची उचकी ? उचकी घालवण्यासाठी सोपे झटपट उपाय... उचकी होईल मिनिटांत गायब...

आपल्यापैकी काहीजणांना काहीवेळा सारखी उचकी लागण्याची समस्या उद्भवते. काहीवेळा या उचकीचा आपल्याला खूप त्रास जाणवतो. उचकी लागल्यामुळे  दिवसभर उचकीने आपला जीव हैराण होतो. उचकी ही एक अनिश्चित गोष्ट आहे. आपल्याला उचकी कधीही लागू शकते, उचकी एकदा लागली की ती थांबवणे खूपच कठीण असते. उचकी लागणे ही एक सामान्य बाब आहे. उचकी लागली की ती काही काळासाठी लागते आणि काही वेळानंतर आपोआप बंद होते. उचकी लागण्याची अनेक कारणे आहेत. गरजेपेक्षा जास्त खाणे, मसालेदार पदार्थ आणि घाईघाईत जेवण करणे. तसेच अल्कोहोलिक ड्रिंक्स, स्मोकिंग, तणाव, भीती, अतिउत्साह या सर्व कारणांमुळे उचकी लागू शकते. उचकी लागल्याची अनेक कारणे असू शकतात. 

उचकी लागल्यानंतर काही वेळातच ती आपोआप बंद होत असते. जर उचकी जास्त वेळपर्यंत असेल तर त्यावर आपण काही घरगुती उपाय करू शकतो. एकदा उचकी लागल्यावर पाणी पिणे, लिंबू चाटणे, थोडा वेळ श्वास रोखून ठेवणे यांसारखे एक ना अनेक उपाय आपण हजारो वेळा करून पाहतो. सामान्यतः असे मानले जाते की, डायफ्रामची मसल्स अचानक अकुंचन पावल्याने उचकी सारखी स्थिती निर्माण होते. अशात अनेक घरगुती उपाय यातून बाहेर पडण्यात उपयोगी पडतात आणि आपली उचकी थांबते. उचकी रोखण्यासाठी आपण अनेक उपाय करतोच परंतु एखादे सोपे आसन करुन आपण झटपट आपल्याला लागलेली उचकी थांबवू शकतो(Hiccups will stop in 15 minutes with Apana-Vayu Yoga Mudra).

अपान वायू मुद्रा म्हणजे काय ? 

अपान मुद्रा (Apaan mudra) अपान वायू मुद्रा (Apan Vayu Mudra) एक अशी मुद्रा आहे जी आपल्या डोळे, तोंड, कान आणि नाकातील कचरा काढून शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते. ही मुद्रा योग्यरित्या केल्यास आणि योग्यप्रकारे श्वास घेतल्यास आपण आपल्या शरीरातून ९०% विषारी (Toxins) द्रव्ये काढून टाकू शकता.

सिधे रस्ते की उलटी चाल! डोकं फारच भंजाळलं, स्ट्रेस वाढला तर १ सोपा उपाय...

अपान वायू मुद्रा कशी करावी ? 

१. आपण विश्रांती घेऊ शकता अशी शांत जागा शोधा. आता अगदी सहजतेने जमिनीवर झोपा, बसा किंवा मग उभे राहा. कारण आपण ही मुद्रा आडवं झोपून, बसून किंवा उभं राहून देखील करू शकतो. 
२. तळवे आपल्या मांडीवर ठेवा आणि लक्षात ठेवा की तळवे जमिनीच्या दिशेने नव्हे तर आकाशाच्या दिशेने म्हणजेच वरील बाजूस असले पाहिजेत
डोळे बंद करा आणि आपल्या श्वासांवर लक्ष द्या
३. आता आपला अंगठा मध्यमा आणि अनामिका बोटांना जोडा. यावेळी हाताची तर्जनी आणि करंगळी सरळ ठेवा. हे दोन्ही हातांसोबत करा.
४. हळू आणि दीर्घ श्वास घ्या आणि कोणतीही आवाज ऐकून आपले चित्त विचलित होणार नाही याची खात्री करा
५. ही मुद्रा दररोज दिवसातून एकदा ३० ते ४५ मिनिटांसाठी करावी. जर तुम्हाला एकत्र ३० ते ४५ मिनिटांचा वेळ मिळत नसेल तर दिवसातून १० ते १५ मिनिटांचा वेळ काढून तीन वेळा सराव केला जाऊ शकतो
६. ही मुद्रा कोणत्याही ठिकाणी आणि कधीही केली जाऊ शकते. पण सकाळी केल्याने जास्त चांगले परिणाम मिळू शकतात.

रोज मॉर्निंग वॉकला जाता पण वजन कमीच होत नाही? ५ गोष्टी करा, वजन आणि होईल कमी...

उचकी घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय :- 

१. थंड पाणी प्या किंवा बर्फ तोंडात ठेवा.
२. दालचिनीचा एक तुकडा तोंडात ठेवला तरी उचकीपासून मुक्तता मिळते. 
३. लांब श्वास घ्या आणि होत असेल तितका वेळ रोखून धरा. हीच प्रक्रिया दुसऱ्यांदा करा. 
४. काळी मिरीची बारीक भुकटी करून दोन ग्राम चूर्ण मधासोबत खाल्ल्याने उचकी थांबते. 
५. जीभेच्या खाली साखर ठेवून चोखत राहा.
६. जमीनीवर झोपून गुडघ्यांना आपल्या डोक्याकडे ओढा. त्यामुळे डायाफ्राममधील बिघाड दुरुस्त होऊ शकतो.
७. लिंबाच्या रसामध्ये मध आणि थोडे काळे मीठ घालून ते खाल्ल्याने उचकी बंद होते.

Web Title: Hiccups will stop in 15 minutes with Apana-Vayu Yoga Mudra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.