Join us   

High BP Control Food : हाय बीपीचा त्रास होणार नाही; रोज हा पदार्थ खा, उत्तम आरोग्यासाठी डायटिशियनचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 3:08 PM

High BP Control Food : डायटीशियन श्वेता शाह यांनी उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय सांगितला आहे.

वाढत्या वयामुळे आणि तणावामुळे उच्च रक्तदाबाची समस्या सामान्य झाली आहे. पण हाय बीपीला अजिबात हलक्यात घेऊ नका. कारण तो सायलेंट किलर (Silent Killer) म्हणून काम करतो. उच्च रक्तदाब नियंत्रणात (BP) न राहिल्यास हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यांसारखी जीवघेणी परिस्थिती उद्भवू शकते. जर तुमचा रक्तदाब देखील सामान्य पातळीपेक्षा जास्त असेल तर नक्कीच उपचार करा. तज्ज्ञांच्या मते, रक्तदाबाची सामान्य पातळी (BP नॉर्मल रेंज) 80/120 mmHg आहे. (Deepika padukone dietician shweta shah suggests drinking beetroot juice to control high blood pressure)

डायटीशियन श्वेता शाह यांनी उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय सांगितला आहे. त्यांच्या मते सकाळी बीटाचा रस प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. श्वेता शाह अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या डायटिशियन आहेत आहे. 

गॅसेसचा त्रास, पोट फुगतं, व्यवस्थित साफही होत नाही? १ उपाय, पचनाचे त्रास राहतील लांब

न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी सांगितले की, उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी दररोज बीटरूटचा रस प्यावा. बीटरूटचा रस प्यायल्याने सिस्टोलिक ब्लड प्रेशर सरासरी 4-5 पॉइंट्सनी कमी होतो. 2012 च्या अभ्यासाचा दाखला देत त्यांनी उच्च रक्तदाबासाठी या घरगुती उपायाबद्दल सांगितले.

रक्ताच्या नसा साफ करून शरीर निरोगी ठेवतात ६ फळं; रोज खा, हार्ट अटॅकचा टळेल धोका

आहारतज्ञांच्या मते, बीटरूटमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात. जे शरीरात जाऊन नायट्रिक ऑक्साईडमध्ये बदलतात. त्याच्या मदतीने रक्त वाहून नेणाऱ्या नसा शिथिल होतात आणि रक्तदाब सामान्य होतो.  तसे, बीटाचा रस दिवसाच्या कोणत्याही वेळी प्याला जाऊ शकतो. पण तज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्याच्या १ तास आधी बीटचा रस प्यायल्याने त्याचा पुरेपूर फायदा होऊ शकतो. बीटचा रस शरीराला इतरही अनेक आरोग्यदायी फायदे देतो.

उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी काय करावे? 

बीटाचा रस प्यायल्याने इतरही अनेक फायदे मिळू शकतात. हेल्थलाइनच्या मते, उच्च बीपीची पातळी कमी करण्यासोबतच बीटचा रस देखील स्टॅमिना वाढवतो.

 

स्मृतीभ्रंश, हृदयविकार, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल किंवा यकृताच्या आजाराने त्रस्त असाल तर बीटचा रस पिणे सुरू करा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य