Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > बॅड कोलेस्टेरॉल ते फॅटी लिव्हर, 'या' डाळीचं पाणी प्या रोज; पचनक्रिया सुधारेल - हृदयही राहील निरोगी

बॅड कोलेस्टेरॉल ते फॅटी लिव्हर, 'या' डाळीचं पाणी प्या रोज; पचनक्रिया सुधारेल - हृदयही राहील निरोगी

High Cholesterol and Liver Disease; Drink Moong dal Water Everyday : 'या' पौष्टीक डाळीचं पाणी पिऊन आपण गंभीर आजारांचा धोका टाळू शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2024 05:24 PM2024-10-13T17:24:15+5:302024-10-13T17:25:23+5:30

High Cholesterol and Liver Disease; Drink Moong dal Water Everyday : 'या' पौष्टीक डाळीचं पाणी पिऊन आपण गंभीर आजारांचा धोका टाळू शकतो

High Cholesterol and Liver Disease; Drink Moong dal Water Everyday | बॅड कोलेस्टेरॉल ते फॅटी लिव्हर, 'या' डाळीचं पाणी प्या रोज; पचनक्रिया सुधारेल - हृदयही राहील निरोगी

बॅड कोलेस्टेरॉल ते फॅटी लिव्हर, 'या' डाळीचं पाणी प्या रोज; पचनक्रिया सुधारेल - हृदयही राहील निरोगी

सध्या लोकांमध्ये फॅटी लिव्हर (Fatty Liver) आणि बॅड कोलेस्ट्रॉलची समस्या झपाट्याने वाढत आहे (Bad Cholesterol). बॅड कोलेस्टेऱॉल वाढल्यामुळे लोक हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडत आहेत (Health Tips). ज्यामुळे गंभीर आजारांचाही धोका वाढतो. लिव्हर निरोगी आणि बॅड कोलेस्टेरॉलची समस्या कमी करायची असेल तर, आहारात मूग डाळीचा समावेश करून पाहा.

मूग डाळीमध्ये अनेक पौष्टीक घटक असतात. मूग डाळीचा आहारात समवेश केल्याने फक्त  फॅटी लिव्हर आणि बॅड कोलेस्ट्रॉलची समस्या कमी होत नसून, इतर गंभीर आजारांचाही धोका टळतो(High Cholesterol and Liver Disease; Drink Moong dal Water Everyday).

मूग डाळ खाण्याचे फायदे

- मूग डाळीचे पाणी अनेक समस्यांवर फायदेशीर ठरते. तयार मूग डाळीचं पाणी शरीरात जमा झालेली चरबी डिटॉक्स करते आणि पचनक्रियाही वेगवान करते. याशिवाय, शिरांमध्ये जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल साफ करून हृदयाच्या आरोग्याची काळजी घेते.

भाजलेले की भिजवलेले? चणे नेमके कसे - केव्हा खाणे योग्य? वजन कमी करायचा फायदा हवा तर..

मूग डाळीचं पाणी पिण्याचे फायदे

- मूग डाळीमध्ये फायबर आणि काही विशेष अँटिऑक्सिडंट असतात. जे पचनसंस्थेला गती देतात, आणि यकृताचे कार्य सुधारतात. मूग डाळीच्या पाण्यामुळे शरीर डिटॉक्स होते. यासाठी सकाळी रिकाम्या पोटी मूग डाळीचं पाणी प्या.

- मूग डाळीचं पाणी लिव्हरच्या पेशींमध्ये साचलेली घाण डिटॉक्स करते. ज्यामुळे लिव्हरच्या कार्यास गती मिळते. लिव्हर हे एक असे अवयव आहे, जो कोलेस्टेरॉल तयार करण्यात मोठी भूमिका बजावतो.

भाजीसोबत फुकट मिळणारी 'ही' पानं वेट लॉससाठी बेस्ट; चमचाभर चटणी रोज खा; पोटाची चरबी झरकन घटेल

- मूग डाळीचे पाणी शरीराला डिटॉक्सिफाय करते आणि पचनक्रिया वेगवान होण्यास मदत करते.

- मूग डाळ फायबर आणि पोटॅशियमचा एक चांगला स्रोत आहे, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर दोन्ही पोषक आहेत. फायबर कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते, तर पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

Web Title: High Cholesterol and Liver Disease; Drink Moong dal Water Everyday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.