Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > High Cholesterol Food : ३ पदार्थ खाल्ल्यानं वाढतं शरीरातलं घातक कॉलेस्टेरॉल; आजपासूनच हे पदार्थ टाळा तब्येत सांभाळा

High Cholesterol Food : ३ पदार्थ खाल्ल्यानं वाढतं शरीरातलं घातक कॉलेस्टेरॉल; आजपासूनच हे पदार्थ टाळा तब्येत सांभाळा

High Cholesterol Food : आपल्या शरीरासाठी विशिष्ट प्रमाणात साखर आवश्यक असते, परंतु त्याची चव आपल्याला अधिक खाण्यास भाग पाडते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 03:57 PM2022-05-27T15:57:15+5:302022-05-27T16:14:29+5:30

High Cholesterol Food : आपल्या शरीरासाठी विशिष्ट प्रमाणात साखर आवश्यक असते, परंतु त्याची चव आपल्याला अधिक खाण्यास भाग पाडते.

High Cholesterol Food : High cholesterol food risk of heart attack diabetes blood pressure processed meat oats nuts | High Cholesterol Food : ३ पदार्थ खाल्ल्यानं वाढतं शरीरातलं घातक कॉलेस्टेरॉल; आजपासूनच हे पदार्थ टाळा तब्येत सांभाळा

High Cholesterol Food : ३ पदार्थ खाल्ल्यानं वाढतं शरीरातलं घातक कॉलेस्टेरॉल; आजपासूनच हे पदार्थ टाळा तब्येत सांभाळा

कोलेस्टेरॉल हा एक चिकट पदार्थ आहे जो आपल्या रक्तामध्ये आढळतो, ते चांगले आणि वाईट दोन्ही असतात. जर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले तर त्यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका वाढतो. (Cholesterol Control Tips म्हणून बॅड कोलेस्टेरॉल असलेल्या पदार्थांचे सेवन कमी करायला हवे. चांगले कोलेस्टेरॉल हा आपल्या नसांसाठी अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे, तो पेशीच्या पडद्याला ताकद आणि लवचिकता देतो, परंतु अनेकदा तेलकट अन्नपदार्थ खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉल मर्यादेपलीकडे वाढते, जे नंतर घातक ठरते. अशा वेळी खाण्यापिण्याच्या काही गोष्टींपासून अंतर राखले पाहिजे. (High cholesterol food risk of heart attack diabetes blood pressure processed meat oats nuts)

१) गोड पदार्थ

आपल्या शरीरासाठी विशिष्ट प्रमाणात साखर आवश्यक असते, परंतु त्याची चव आपल्याला अधिक खाण्यास भाग पाडते. साखरेचे जास्त प्रमाण  आपल्या आरोग्याला खूप हानी पोहोचवतात. त्यामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएल वाढू लागते.

२) तेलकट पदार्थ

भारतात तेलकट, तळलेले पदार्थ खाण्याचा ट्रेंड खूप जास्त आहे, परंतु अशा प्रकारचे पदार्थ आरोग्य बिघडवू शकतात, अशा स्थितीत तुम्ही फ्रेंच फ्राईज, बटाटा चिप्स, समोसा, कचोरी यासारख्या तळलेल्या पदार्थांपासून दूर राहावे.

रात्री झोपण्याआधी चुकूनही हे पदार्थ खाऊ नका; तब्येत कधी खराब होईल कळणारही नाही

३) प्रोसेस्ड फूड

सध्या  प्रोसेस्ड फूडचा ट्रेंड वाढला आहे, विशेषत: जे या प्रकारचे मांस खातात, त्यांच्या शरीरात खराब कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका नेहमीच असतो. लठ्ठपणा टाळण्यासाठी हेल्दी डाएट निवडा, असं अनेकदा म्हटलं जातं. यासाठी अक्रोड, बदाम यांसारख्या ड्रायफ्रूट्सचे सेवन सुरू करा. याशिवाय सकाळच्या नाश्त्यात ओट्सचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक लागत नाही. 

रक्ताची कमतरता दूर करतात रोजच्या जेवणातील १० पदार्थ; आजपासूनच खायला लागा, तब्येत राहील उत्तम 

जर तुम्ही ताज्या फळांचा रस प्यायला तर ते निरोगी राहण्यासाठी एक उत्तम उपाय ठरेल. प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट 'निखिल वत्स' यांनी सांगितले की, तुम्ही जेवणात हेल्दी फॅट्स जसे की अॅव्होकॅडो, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल वापरू शकता, याशिवाय नारळाचे तेल (कोकोनट ऑइल) हे सर्वोत्तम आहे.
 

Web Title: High Cholesterol Food : High cholesterol food risk of heart attack diabetes blood pressure processed meat oats nuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.