Join us   

बी १२ च्या कमतरतेमुळे वाढतो विसराळूपणा आणि चिडचिड, नियमित ५ व्हेज पदार्थ खा-वाढेल स्टॅमिना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 11:52 AM

High Vitamin B-12 Foods For Vegetarians : अनेकजण वजन वाढेल किंवा आपण जाड होऊ म्हणून बटाटा खाणं टाळतात. बटाट्यात बरीच पोषक तत्व असतात. बटाट्यात व्हिटामीन बी-2 असते. बटाटा महत्वाच्या भाज्यांपैकी एक आहे.

रोजच्या जगण्यात निरोगी राहण्यासाठी व्हिटामीन बी-१२ (Vitamin B-12) महत्वाच्या पोषक तत्वांपैकी एक आहे. लाल रक्तपेशी तयार होणं, नर्व्हस सिस्टिम उत्तम राहणं, शरीराला ताकद मिळणं यासाठी व्हिटामीन्स फायदेशीर ठरतात. (Health Tips) व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेमुळे रक्ताची कमतरता भासणं,  थकवा, कमकुवतपणा येणं अशा समस्या उद्भवतात. (High Vitamin B-12 Foods Eat 5 Foods To Increase Natural Vitamin B-12)

व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेची लक्षणं कोणती? (Vitamin B-12 Deficiency Symptoms)

जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल, डोकेदुखी, अपचन, भूक कमी लागणं, कमकुवतपणा, थकवा उद्भवत असेल तर वजन कमी झालं असेल तर शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता असू शकते. व्हिटामीन बी-१२ च्या कमतरेमुळे अनेक गंभीर आजारही उद्भवू शकतात. आहारातज्ज्ञ शिखा अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार तुम्ही आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भरून निघेल.

मशरूम

नॅशनल सेंटर फॉर बायोक्नोलॉजीच्या रिपोर्टनुसार मशरूमच्या (Ref) सेवनाने व्हिटामीन बी-12 ची कमतरता दूर होते. रोज व्हिटामीन बी-12 ची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जवळपास  50 ग्रॅम  मशरूमची आवश्यकता असेल. मशरूम भाजी किंवा सॅलेडमध्ये खाऊ शकता. मशरूम खाल्ल्याने व्हिटामीन डी सुद्धा मिळते. 

बीट

बीटात व्हिटामीन्स, मिनरल्स, आयर्न, कॅल्शियम यांसारखी पोषक तत्व असतात. ही लाल रंगाची  भाजी खाल्ल्याने व्हिटामीन्सची कमतरता दूर होण्यस मदत होते. सॅलेड किंवा ज्यूसच्या स्वरूपात खाऊ शकता. 

बटाटा

अनेकजण वजन वाढेल किंवा आपण जाड होऊ म्हणून बटाटा खाणं टाळतात. बटाट्यात बरीच पोषक तत्व असतात. बटाट्यात व्हिटामीन बी-2 असते. बटाटा महत्वाच्या भाज्यांपैकी एक आहे. यात मोठ्या प्रमाणात स्टार्च असते. पोटॅशियम, सोडियम आणि व्हिटामीन बी-12, व्हिटामीन ए चा चांगला स्त्रोत आहे. 

ऐन तारूण्यात कंबरदुखीने हैराण आहात? ५ पदार्थ खा; म्हातारे झालात तरी कंबरदुखी छळणार नाही

दूध

एनआयएचच्या रिपोर्टनुसार नाश्त्याला तुम्हाला फार काही खायला आवडत नसेल तर ग्लासभर दूध पिऊ शकता. डेअरी प्रोडक्टमध्ये कोबालामिन, व्हिटामीन बी, व्हिटामीन डी, प्रोटीन, कॅल्शियम, हेल्दी फॅट आणि न्युट्रिएंट्स असतात. ही हाडं कमकुवतपणा दूर करतात. रात्री झोपण्याच्या आधी  कोमट पाण्यात दूध पिऊ शकतो. 

राग आला की जीभेवरचा ताबाच सुटतो? सद्गुरू सांगतात १ गोष्ट करा; राग येणारच नाही-आनंदी राहाल

टेम्पेह

टेम्पेह एक प्लांट बेस्ड फूड आहे. पनीरप्रमाणे दिसणार हा पदार्थ कॅल्शियम, आयर्न, व्हिटामीन बी-१२ चा उत्तम स्त्रोत आहे. यामुळे रक्ताची कमतरता दूर होते. यात आयर्न आणि  कोबालामिन  हे दोन्ही पदार्थ असतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स