Join us   

कंबर दुखते, अशक्तपणा येतो? व्हिटामीन बी-१२ देणारे ५ पदार्थ खा; तरतरी येईल-हाडं होतील बळकट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 10:56 AM

Highest Source Of Vitamin B-12 : शरीरात व्हिटामीन बी-१२ कमतरता भासल्यास एनिमिया होण्याचाही शक्यता असते.

शरीर हेल्दी ठेवण्यासाठी पोषक तत्वांची आश्यकता असते. (Health Tips) यात व्हिटामीन्सचे महत्वाचे योगदान असते. शरीरातील पेशींच्या निर्मितीसाठी व्हिटामीन्सची महत्वाची भूमिका असते. (Foods Rich In Vitamin B-12) व्हिटामीन बी-१२ मुख्य घटक असून यामुळे लाल रक्त पेशी आणि डिएनएच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात. शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास एनिमिया होण्याचाही शक्यता असते. (Food You Should Eat Which Food Is Have a B-12 Deficiency) शरीर व्हिटामीन बी-१२ चे व्यवस्थित उत्पादन करत नाही. काही पदार्थांमध्ये व्हिटामीन बी-१२ चे प्रमाण जास्त असते. 

व्हिटामीन बी-१२ वाढवण्यासाठी लाल आणि पांढऱ्या वस्तू खाणं फायदेशीर ठरतं. दूध, दही यात व्हिटामीन बी-१२ मोठ्या प्रमाणात असते. व्हिटामीन बी-१२ युक्त पदार्थ खाल्ल्याने शरीराचा गंभीर आजारांपासूनही बचाव होतो. (5 Best Food Sources Of Vitamin B-12) हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार शरीरात या व्हिटामीन्सची कमतरता भासल्यास मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. (Ref) यात मेमरी लॉस, कन्फ्यूजन होणं यांचा समावेश आहे. व्हिटामीन बी १२ च्या कमतरतेचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम मेगालोब्लास्टीक एनिमिया हा असतो. यात आरबीसीचा आकार  मोठा होत जातो.  (Vitamin B-12 Foods For Vegetarians)

व्हिटामीन बी मिळवण्यासाठी काय खावे? (Foods For Vitamin B-12)

1) दुग्धजन्य पदार्थ

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार दूध, दही, अंडी, डेअरी प्रोडक्ट या पदार्थांमध्ये व्हिटामीन बी-१२ जास्तीत जास्त असते. म्हणूनच जर तुम्हाला जास्त थकवा वाटत असेल तर समजून जा की व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेमुळे जाणवत आहे. म्हणून डेअरीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

2) लाल फळं

लाल फळं जसं की डाळींब, सफरचंद बीट यातून मोठ्या प्रमाणात व्हिटामीन बी-१२ मिळते.  हिरव्या भाज्यांच्या तुलनेत लाल भाज्यांमध्ये व्हिटामीन बी-१२ जास्त प्रमाणात असते.

200 किलो वजनाच्या कोरोओग्राफरनं ९८ किलो घटवलं; डाएटमध्ये 'हे' ५ बदल करून मेंटेन केलंं

3) टोफू

टोफूमध्ये व्हिटामीन बी-१२ मोठ्या प्रमाणात असते. यातील प्रोटीन, जिंक, आयर्न, कॅल्शियम, सेलेनियम ही पोषक तत्व शरीराला पोषण देतात. ज्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो. म्हणूनचा आहारात टोफूचे सेवन करा.

4) ब्रोकोली

ब्रोकोलीतील पोषक तत्वांमुळे सगळ्यात उत्तम भाजी मानली जाते. ब्रोकोलीत व्हिटामीन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात.  याच्या सेवनाने कॅल्शियमची कमतरता दूर होण्यास मदत होते.  प्रोटीन्सची कमतरता पूर्ण करण्यासाठीही ब्रोकोली फायदेशीर ठरते.  तुम्ही टोमॅटो, केळी, टोफू, स्प्राऊट्स, मशरूम या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. 

बदामापेक्षा दुप्पट प्रोटीन देते 'ही' भाजी; सद्गुरू सांगतात 'ताकदीचा खजिना'- हाडं होतील बळकट

5) चीझ 

आजकाल प्रत्येक पदार्थांत चीझ वापरले जाते. आपल्या आहारात जास्तीत जास्त  चीझयुक्त पदार्थांचा समावेश करा. कॅल्शियम आणि प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे मसल्स आणि हाडंही बळकट होतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सलाइफस्टाइल