Join us   

हिना खानला झाला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर; महिलांना होणाऱ्या या आजाराची लक्षणं कोणती, वेळीच कसं ओळखाल..

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 4:40 PM

Hina Khan Diagnosed With Breast Cancer : स्तनांमध्ये झालेले बदल लक्षात  येण्यासाठी स्तनांना स्पर्श करत राहा, परिवर्तन पाहा, कोणत्याही प्रकारचा बदल जाणवल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.

अभिनेत्री हिना खान (Hina Khan) हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून तिचे फॅन्स निराश झाले आहेत. अभिनेत्रीने सांगितले की तिला कॅन्सरचा आजार झाला आहे. तिनं या पोस्टमध्ये म्हटलं की सगळ्यांना नमस्कार, मला तुम्हाला सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. मला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. (Hina Khan Diagnosed With Cancer Actress Share Cryptic Note Goes Viral Amid Health Scare Reports)

पुढे तिनं लिहिले की या गंभीर आजाराची ट्रिटमेंट घेत आहे. या आजारावर मात करण्यासाठी मजबूत, दृढ, निश्चय आणि पूर्ण प्रयत्न करत आहे.  माझे उपचार खूप आधीच सुरू झाले आहेत आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही गोष्ट गोपनीय ठेवण्याचे आवाहन तिने केले आहे. (Know  Breast Cancer Symptoms And Prevention) या लढाईत हिनाने फॅन्सचा सपोर्ट मागितला आहे. लवकरात ती बरी होण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी करण्यास सांगितला आहे. या पोस्टावर तिच्या फॅन्सनी प्रार्थना  करत ती लवकर बरी होण्यासाठी कमेंट्स केल्या आहेत. 

स्तनांच्या कॅन्सरची लक्षणं (Symptoms Of Breast Cancer)

स्तनांमध्ये झालेले बदल लक्षात  येण्यासाठी स्तनांना स्पर्श करत राहा, परिवर्तन पाहा, कोणत्याही प्रकारचा बदल जाणवल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा. स्तन, वरच्या भागात छातीत सूज गाठ येणं, त्वचेत बदल होणं, त्वतेच खड्डे पडणं,  त्वचेचा रंग बदलणं, त्वचा सूजणं, निप्पल्सचा आकार बदलणं अशी लक्षणं दिसून येतात. स्तनांच्या गाठींमुळे अनेकदा कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो. 

ब्रेस्ट कॅन्सरचे उपचार (Solution For Breast Cancer)

ब्रेस्टर कॅन्सर किमोथेरेपी, सर्जरी, रेडिओथेरेपी, टारगेटेडे थेरेपी,  हॉर्मोनल थेरेपी, एंडीोक्राईन थेरेपी, इम्यूनो थेरेपी करू शकता.  सर्जरीचा अर्थ असा नाही करी रुग्णाची ब्रेस्ट कापली जाणार. काही उपचारात ब्रेस्ट वाचवताही येते. रुग्णांची गंभीरता स्टेज, वय बायोलॉजिकल प्रोफाईलवर अवलंबून असते. 

ब्रेस्ट कॅन्सरची कारणं (Causes Of Breast Cancer)

ब्रेस्ट कॅन्सर  जेनेटिक असू सकतो.बहिण, आजी किंवा मावशीला हा आजार असल्यास असा परिणाम होतो १० ते १५ टक्के ब्रेस्ट कॅन्सर जेनेटीक असतो. अनियमित लाईफस्टाईल, हॉर्मोनल बॅलेंन्समध्ये बिघाड यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सकर्करोगकॅन्सर जनजागृतीसेलिब्रिटी