सध्याच्या बिझी लाइफस्टाईमुळे आहाराकडे फारसे लक्ष देणे शक्य होत नाही.अनियमित जीवनशैलीमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. चुकीच्या आहारामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. त्यातील सामान्य समस्या म्हणजे पोटात गॅस होणे. पोटात जास्त गॅस जमा होतो आणि पोट फुगू लागते. असंतुलित आहार आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आपल्याला पचनाच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा जास्त खाल्ल्याने गॅस, पोट फुगणे, आंबट ढेकर येणे असे अनेक प्रॉब्लेम्स होतात. पोटात गॅस होण्याच्या समस्येपासून आराम मिळविण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करुन पाहतो. बहुतेकवेळा आपल्या पोटामध्ये गॅस जमा होतो. या समस्येला आपण घरच्या घरी सुद्धा बरे करू शकतो(Hing Ajwain for stomach gas pain & bloating).
पोटात गॅस होण्याची समस्या खूप त्रासदायक असते. परंतु पोटात गॅस होणे ही एक कॉमन समस्या झाली आहे. पोटात गॅस तयार होणे आणि त्रासाचे कारण बनणे हे देखील आपल्या खाण्याच्या सवयींवर बऱ्याच अंशी अवलंबून असते. जेव्हा पोटात गॅसमुळे तीव्र वेदना होतात आणि पोट फुगणे सुरू होते, तेव्हा त्याचा उपचार आपल्या स्वयंपाकघरातच असतो. आपण स्वयंपाक घरातील रोजच्या वापरातील दोन पदार्थांचा वापर करून आपल्या पोटातील गॅस अतिशय सहज सोप्या पद्धतीने दूर करु शकतो(Here's How You Can Use Ajwain And Hing To Ease Gassiness And Indigestion).
पोटातील गॅस दूर करण्यासाठी घरगुती उपाय ...
१. हिंग :- हिंग खाणे आणि पोटावर लावणे या दोन्हीमुळे पोटातील गॅसची समस्या दूर होण्यास मदत मिळते. पोटातील गॅसमुळे आपल्याला अस्वस्थ वाटते अशावेळी कोमट पाण्यात चिमूटभर हिंग टाकून प्या. त्याचबरोबर पोटात गॅस होऊन तीव्र वेदना होत असल्यास हिंग पाण्यात विरघळवून पोटाच्या बेंबीभोवती लावा.
पावसाळ्यात खायलाच हवी आजी करायची तशी आलेपाक वडी, सर्दी खोकला राहतो लांब - पाहा रेसिपी...
२. ओवा :- ओव्यामध्ये थायमॉल नावाचे रासायनिक संयुग असते. ज्यामुळे पोटातील गॅस बाहेर पडणे सोपे जाते. रोज एक चमचा ओवा कोमट पाण्यासोबत प्यायल्याने पोटात गॅस होण्याची समस्या दूर होते.
१ चमचा अळशी - १ चमचा तांदुळाचे पीठ, उपाय साधा- चेहऱ्यावरून तुमचं वय ओळखता येणार नाही...
पोटातील गॅस दूर करण्यासाठी हिंग आणि ओवा खाण्याचे फायदे :-
१. हिंग आणि ओवा हे दोन्ही मसाले पोटदुखी आणि गॅसमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी गुणकारी आहेत.
२. हिंगामध्ये गॅस विरोधी घटक असतात. जे पोटातील गॅस दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
३. हिंग अन्नाचे पचन चांगले होण्यास मदत करते. यामुळे गॅस, ॲसिडीटी, अपचन, पोटदुखी आणि पोट फुगणे या समस्यांपासून आराम मिळतो.
४. हिंग आणि ओव्याचे पाणी वेदनाशामक गुणधर्मांनी समृद्ध आहे.
५. ओव्यामध्ये अँटी - मायक्रोबियल गुणधर्म असतात. जे पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे.