Join us   

Hives Causes and Symptoms :  पित्ताचा त्रास कमी होण्यासाठी घरगुती उपाय; वाचा पित्त झाल्यावर काय खायचं काय नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 11:28 AM

Hives Causes and Symptoms Solution : हे पित्त बोटं, मान, चेहरा इत्यादींवर येऊ शकते. त्याच वेळी, दीर्घकालीन पित्त त्वचेवर 6 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकते.

जेव्हा शरीरात ऍलर्जीची प्रतिक्रिया (Hives) असते तेव्हा त्यामुळे अंगावर  पित्ताच्या गाठी दिसतात.  जेव्हा अंगावर उठतात तेव्हा लाल रंगाचे पुरळ आणि खाज सुटते. आणि ते बाहेर येऊ लागतात. (Hives causes symptoms treatment ) अशा स्थितीत अति थंड-गरम किंवा तापमानातील बदलामुळे ही समस्या उद्भवू शकते. परंतु या समस्येची आणि अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठींची इतर कारणे आहेत. आज या लेखात पित्ताचे प्रकार, कारणं आणि बचावाचे उपाय पद्धती जाणून घेऊया. (Hives causes symptoms treatment and prevention of pitt)

कारणं

ताण-तणाव

चुकीचे औषध घेतल्यानं

तापमानात वाढ होणं

त्वचेवर दबाव असल्यास

एखाद्या प्राण्याच्या संपर्कात असताना 

एलर्जीक रिएक्शन

पित्ताचे प्रकार

पित्ताचे २ प्रकार आहेत एक्यूट आणि क्रोनिक. लक्षात घ्या की क्रॉनिक  एक्यूट 6 आठवडे किंवा त्यापेक्षा कमी काळ टिकतो. हे पित्त बोटं, मान, चेहरा इत्यादींवर येऊ शकते. त्याच वेळी, दीर्घकालीन पित्त त्वचेवर 6 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकते.

लक्षणं

बोटे, हात, चेहरा, तळ पायांवर सुज

पित्ताचा आकार बदलत राहणं

खाज येणं

डोकेदुखी, घसादुखी

ओठ सुजणं

श्वास घ्यायला त्रास होणं

चक्कर येणं

हृदयाचे ठोके वाढणे.

उलटी होणं

पित्त उसळण्यापासून बचाव कसा करायचा?

१) सूर्यप्रकाशात जाताना सुती कपडे घाला. तसेच सनग्लासेस वापरा.

२) काहीवेळा थंडीमुळे अंगावर येत असलेल्या पित्ताच्या गाठीची समस्या तीव्र होते. अशा वेळी थंडीच्या वातावरणात कमी बसा.

३) जर कोणतेही औषध घेतल्याने तुमच्या शरीरात अंगावर पित्ताच्या गाठीची समस्या उद्भवत असेल तर लगेच डॉक्टरांना सांगा.

४) खूप गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करा.

५) जास्त जळत असल्यास थंड पाण्याने दाबून घ्या.

काय खायचं, काय नाही?

१) पित्त

जर तुम्हाला पित्त दोष असेल तर तुम्ही तिखट-मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. असे अन्न तुमचे नुकसान करू शकते. लाल मिरचीचा प्रभाव गरम असतो, त्यामुळे शरीरात जास्त पित्त तयार होते. जेवणात काळी मिरी, दालचिनी, तमालपत्र, लवंग इत्यादींचे सेवन टाळावे.

२) सुका मेवा

सुक्या मेवा खूप गरम असतो. ज्यांना पित्ताचा विकार आहे त्यांनी सुका मेवा कमी प्रमाणात खावा. तुम्ही काजू, बदाम, मनुका, पिस्ता आणि अक्रोडाचे सेवन करू नये. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भिजवलेले बदाम खाऊ शकता.

३) आंबट फळं

पित्त असलेल्या लोकांना लिंबूवर्गीय फळे देखील टाळावी लागतात. आंबट पदार्थ शरीरात पित्ताचे प्रमाण वाढवतात. संत्री, मोसमी, किवी, द्राक्ष यांसारखी फळे खाऊ नयेत. त्याऐवजी तुम्ही टरबूज, काकडी आणि सफरचंद खाऊ शकता.

४) कॅफेन

पित्त असलेल्या लोकांनी कॅफिन असलेले अन्न टाळावे. कॉफी, चहा, सोडा आणि चॉकलेट्स यांसारख्या कॅफिनयुक्त गोष्टी कमी प्रमाणात घ्याव्यात. यामुळे पित्त वाढते. त्याऐवजी तुम्ही हर्बल टी किंवा ग्रीन टी पिऊ शकता.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य