बहुतेकवेळा आपलं आरोग्य बिघडण्यास आपल्या सवयीच कारणीभूत असतात. आरोग्यास घातक सवयींमधली अशीच एक घातक सवय म्हणजे लघवी रोखून धरणं. लघवी लागलेली असतांनाही लघवीस न जाणं (holding pee) या सवयीचे परिणाम आरोग्यावर होतात. बहुतांशवेळा हा प्रसंग महिलांच्या बाबतीत घराबाहेर असताना उद्भवतो. बाहेर लघवीसाठी योग्य जागा नसल्यास लघवी बराच वेळ रोखून धरली जाते. तर कधी कधी हातात काही महत्वाचं काम आहे म्हणून लघवी रोखून धरली जाते. लघवी लागल्यानंतर लगेच लघवीला न जाण्याचे अनेक दुष्परिणाम (disadvantages of holding pee) होतात. याबाबत किगल 8 चे संस्थापक आणि तज्ज्ञ स्टेफनी टेलर यांनी विस्तृत माहिती दिली आहे.
लघवी रोखून धरल्यास
1. लघवी लागल्यानंतर वेळेत न जाता ती रोखून धरल्यास पेल्विक फ्लोर डॅमेज होतो. जास्त वेळ लघवी रोखून धरल्यास मूत्राशयात असलेले स्नायू जेव्हा गरज पडते तेव्हा आंकुचन पावत नाही. ती क्षमता स्नायु गमावतात. यामुळे मूत्राशय पूर्ण रिकामं होत नाही. पेल्विक फ्लोर योग्य पध्दतीनं काम करत आहे का हे स्वत:लाही ओळखता येतील असे मार्ग आहेत. खोकताना, शिंकताना जर लघवी बाहेर येत असल्यास पेल्विक फ्लोर कमजोर झालं आहे असं समजावं. लघवी रोखण्याच्या सवयीतून पेल्विक स्नायू कमजोर झाले असतील तर संभोगादरम्यान तसेच शौचास गेल्यावर तीव्र वेदना जाणवतात.
2. लघवी जास्त वेळ रोखून धरल्यास योनीमार्गात कोरडेपणा निर्माण होतो. आपोआप लघवी बाहेर येण्याची समस्या उद्भवते.
3. प्रौढ व्यक्तीचं मूत्राशय 2 कप लघवी साचवू शकतं. मूत्राशय पाव भाग भरतं तेव्हा मेंदूला लघवी लागण्याचे संकेत मिळतात. पण लघवीला न जाता लघवी रोखल्यास युरिनरी ट्रॅक्ट इंन्फेक्शन (युटीआय) होतं. या समस्येकडेही जर दुर्लक्ष झालं, त्यावर वेळेवर उपचार झाले नाहीत तर जिवाणु संसर्ग होवून सेप्सिस ही गंभीर आरोग्यसमस्या निर्माण होण्याचा धोका असतो सेप्सिस म्हणजे वारंवार गंभीर संसग होण्याचा आजार.
Image: Google
4. लघवी रोखून धरल्यास मूत्राशय, किडनी आणि मूत्रनलिकेत आग होते. यामुळे किडनीसही धोका निर्माण होतो. किडनीच्या कार्यात अडथळे येतात. किडनीची कार्यक्षमता कमी होते. किडनी स्टोन (मूतखड्यांची समस्या) होतात, किडनीस संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
5. लघवीद्वारे शरीरातील अशुध्दी बाहेर पडते. योग्य वेळी जर लघवी शरीराबाहेर टाकली गेली नाही तर शरीरात संसर्ग होण्याची शक्यता असते.