Join us   

Holding urine is dangerous : सोय नाही म्हणून खूप वेळ लघवी कन्ट्रोल करता; महिलांना ही गंभीर चूक पडते महागात कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 4:04 PM

Holding urine is dangerous : वेगवेगळ्या कारणांनी लघवी तासन् तास दाबून ठेवण्याची अनेकींना सवय असते. पण ही सवय आरोग्यासाठी घातक असून त्यातून पुढे गंभीर आजार उद्भवू शकतात...

ठळक मुद्दे बराच काळ युरीन दाबून ठेवल्याने पोटदुखीची समस्याही उद्भवू शकते वयाप्रमाणे युरीन रोखून ठेवण्याची प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. लहान मुले जास्ती जास्त २ तास तर मोठी माणसे २ ते ३ तास लघवी कंट्रोल करु शकतात

लघवी लागली की बाथरुम किंवा टॉयलेटमध्ये जाणे स्वाभाविक आहे. पण अनेकदा बाहेरचे काम, कामाचा इतर ताण, अस्वच्छ शौचालये किंवा सार्वजनिक ठिकाणी लघवीला जाण्यास घाण वाटणे यांसारख्या कारणांनी लघवी दाबून (Holding urine is dangerous) ठेवली जाते. अनेकदा तर लघवी लागेल (passing urine) म्हणून कित्येक तास पाणीच न पिणाऱ्या महिलाही आपल्या आसपास असतात. असे करणे त्या वेळासाठी योग्य वाटत असले तरी एकूण आरोग्यासाठी मात्र ते अतिशय घातक असते. लघवी लागणे हे ज्याप्रमाणे नैसर्गिक आहे त्याचप्रमाणे वेळच्या वेळी ती बाहेर पडणेही आवश्यक आहे. अन्यथा आरोग्याच्या गंभीर तक्रारी उद्भवू शकतात. लघवीला न जाण्याची काही कारणे आपण देत असलो आणि आपल्या बाजूने ती बरोबरही असली तरी त्याचा आरोग्यावर भविष्यात वाईट परिणाम होणार असतो हे वेळीच लक्षात घ्यायला हवे. लघवी म्हणजे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडण्याचे उत्तम माध्यम असते. पण हे घटक शरीरातून वेळीच बाहरे पडले नाहीत आणि शरीरात साठून राहिले तर मात्र शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. अनेक जणी तर काही ना काही कारणामुळे कित्येक तास लघवी रोखून धरतात. अशाप्रकारे लघवी रोखण्याची प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. मात्र असे करणे आरोग्यासाठी धोक्याचे असते हे वेळीच लक्षात घ्यायला हवे. 

(Image : Google)

१. युरीन लीक होणे

काही महिलांना एकाएकी युरीन लीक होण्याची समस्या भेडसावते. याचा अर्थ लघवीवर नियंत्रण न राहील्याने एखाएकी लघवी व्हायला सुरुवात होते. याचे मुख्य कारण हे पूर्वी आपण बहुतांश वेळा लघवी दाबून धरलेली असते हे असू शकते. सतत लघवी दाबून ठेवल्याने ब्लॅडर कमजोर होते आणि वय झाल्यावर लघवीवरचे नियंत्रण जाते. 

२. किडनीच्या आरोग्यासाठी अतिशय घातक

जास्त वेळ लघवी दाबून ठेवणे कीडनीच्या आरोग्यासाठी तोट्याचे असते. कारण युरीन दाबून ठेवल्याने त्याचा भार किडनीवर येतो आणि भविष्यात किडनी कमकुवत व्हायला लागतात. किडनी योग्य पद्धतीने काम करत नसेल तर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडते आणि एकातून एक गुंतागुंत वाढत जातात. 

३. युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन 

लघवी बराच काळ दाबून ठेवल्यास युरीनरी ट्रॅकचे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. महिलांमध्ये बहुतांश प्रमाणात ही समस्या झाल्याचे आढळते. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असल्या तरी सतत लघवी दाबून धरणे हेही त्यामागील एक महत्त्वाचे कारण असते. वेळच्या वेळी लघवी पास केली नाही तर लघवीच्या मार्गातील बॅक्टेरीयांची वाढ होते आणि हे बॅक्टेरीया ब्लॅडरच्या आतपर्यंत जाऊ शकतात. 

४. पोटदुखीची समस्या 

युरीन दाबून धरल्याने पोटाच्या स्नायूंना ताण पडतो. त्यामुळे पोटातील इतर क्रियांवरही त्याचा परिणाम होतो. अशामुळे पोटदुखीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे पोटदुखीचे हे एक महत्त्वाचे कारण असू शकते.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स