Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वाटण घरभर उडालं? असे भयंकर अपघात कसे टाळता येतील

वाटण घरभर उडालं? असे भयंकर अपघात कसे टाळता येतील

Home accident prevention accidents related to mixer : घरातले अपघात : मिक्सर ही सततच्या वापरातली वस्तू, पण तीही अतिशय काळजीपूर्वक वापरावी लागते, नाहीतर (most common household accidents)...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2024 06:55 PM2024-09-27T18:55:48+5:302024-09-27T19:38:08+5:30

Home accident prevention accidents related to mixer : घरातले अपघात : मिक्सर ही सततच्या वापरातली वस्तू, पण तीही अतिशय काळजीपूर्वक वापरावी लागते, नाहीतर (most common household accidents)...

Home accident prevention accidents related to mixer : Got a finger cut in the mixer, know how to avoid accidents... | वाटण घरभर उडालं? असे भयंकर अपघात कसे टाळता येतील

वाटण घरभर उडालं? असे भयंकर अपघात कसे टाळता येतील

मिक्सर ही आपल्या प्रत्येकाच्या घरातली एक अतिशय महत्त्वाची वस्तू. पूर्वी पाटा-वरवंट्यावर होणारे काम आता मिक्सर काही सेकंदात करतो. त्यामुळे कष्ट आणि वेळ दोन्हीची मोठ्या प्रमाणात बचत व्हायला लागली.  कोणत्याही पदार्थाचे वाटण करण्यासाठी, चटणी करण्यासाठी नाहीतर जिन्नस बारीक करण्यासाठी मिक्सरचा सतत वापर केला जातो (Home accident prevention accidents related to mixer most common household accidents)...

हा मिक्सर चुकून बिघडला तर आपल्या स्वयंपाक करताना काहीच सुधरत नाही. तसंच मिक्सर वापरताना अपघात झाल्याचंही आपण अनेकदा ऐकतो. हा अपघात काहीवेळा इतका भयंकर असतो की बोट तुटण्यापर्यंत समस्या उद्भवू शकते. असं होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी समजून घेऊया. 

(Image : Google)
(Image : Google)

१. भांडे लावलेले असताना बोट घालणे 

मिक्सरला भांडे लावलेले असताना त्यामध्ये चुकूनही बोट घालू नये. आपण वाटण बारीक झाले आहे की नाही हे कळण्यासाठी किंवा बाजूने अडकलेले मध्यभागी घालण्यासाठी थेट मिक्सरच्या भांड्यात हात घालतो. पण मिक्सरच्या आतले ब्लेड धारधार असते, यामुळे बोट कापले जाण्याची शक्यता असते. काहीवेळा बोट अशाप्रकारे आतमध्ये असताना नकळत मिक्सरचे बटण फिरवले जाते आणि बोट तुटू शकते. म्हणून भांडे बाहेर काढून मगच भांड्यामध्ये सावकाश बोट घालावे. 

२. झाकण नसताना डीश ठेवणे 

काहीवेळा मिक्सरच्या भांड्यावर जे झाकण असते ते हरवते, त्याला तडा गेलेला असतो किंवा ते तुटलेले असते. अशावेळी आपण या भांड्यावर एखादी डीश किंवा दुसरे एखादे झाकण ठेवून मिक्सर फिरवतो. पण ते नीट बसत नसल्याने ते अचानक उडून वर येण्याची शक्यता असते. यामुळे आतला जिन्नसही अंगावर येतो आणि तेही धोकादायक ठरु शकते. 

(Image : Google)
(Image : Google)

३. जिन्नस बारीक करताना

मिक्सरमध्ये काही कडक गोष्टी बारीक होत नाहीत. यामध्ये बिया किंवा खारीक यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. आपल्याला माहित नसल्याने किंवा ट्राय करुन पाहूया म्हणून आपण त्या गोष्टी बारीक करायला जातो. मात्र त्यामुळे भांड्यातील ब्लेड तर तुटतेच पण भांडे एकदम अंगावर येण्याचीही शक्यता असते. याशिवाय भांड्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त भरले गेले, बारीक करत असलेले जिन्नस गरम असेल तरी ते बाहेर येते आणि अंगावर उडते. यामुळे चटका बसू शकतो किंवा तिखट असेल तर डोळ्याला इजाही होऊ शकते.

काय करावे?

१. मिक्सर वापरुन झाल्यावर मिक्सरचा मुख्य स्विच न विसरता बंद करावा.
२. मिक्सर आणि भांडे वेळोवेळी दुरुस्त करुन वापरावे. 
३. लहान मुलांपासून मिक्सर दूर ठेवावा. 
४. घाई गडबडीच्या वेळी मिक्सर शक्यतो वापरु नये कारण डोक्यात विचार असताना अपघात घडण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी वाटणाच्या गोष्टी थोड्या आधी शांत असताना करुन ठेवाव्यात
५. आपण वापरत असलेल्या उपकरणाबाबत योग्य ती माहिती घेऊन मगच त्याचा वापर करावा.
६. अपघात झाल्यानंतर घरगुती उपाय न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने त्वरीत योग्य ते उपचार घ्यावेत.

Web Title: Home accident prevention accidents related to mixer : Got a finger cut in the mixer, know how to avoid accidents...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.