Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सर्दी झाली म्हणून वाफ घेताना गरम पाणीच अंगावर सांडलं, नाक -चेहरा पोळला? ‘असं’ होऊ नये म्हणून..

सर्दी झाली म्हणून वाफ घेताना गरम पाणीच अंगावर सांडलं, नाक -चेहरा पोळला? ‘असं’ होऊ नये म्हणून..

home accident prevention how to take care while having water vapor in cold and cough : करायला गेलो एक आणि झालं भलतंच असं होऊ नये यासाठी (most common household accidents)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2024 05:21 PM2024-10-04T17:21:42+5:302024-10-04T18:02:42+5:30

home accident prevention how to take care while having water vapor in cold and cough : करायला गेलो एक आणि झालं भलतंच असं होऊ नये यासाठी (most common household accidents)

home accident prevention most common household accidents how to take care while having water vapor in cold and cough | सर्दी झाली म्हणून वाफ घेताना गरम पाणीच अंगावर सांडलं, नाक -चेहरा पोळला? ‘असं’ होऊ नये म्हणून..

सर्दी झाली म्हणून वाफ घेताना गरम पाणीच अंगावर सांडलं, नाक -चेहरा पोळला? ‘असं’ होऊ नये म्हणून..

सर्दी-कफ या समस्या अगदीच सामान्य असतात. हवा बदलाच्या वेळी तर घरोघरी सगळ्यांनाच सर्दी आणि कफाने ग्रासलेले असते. यावर लगेच औषधोपचार करण्यापेक्षा आधी घरगुती उपाय करुन पाहूया असे आपण म्हणतो. मग कधी दूध-हळद घेणे, कधी मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे, गरम पाणी पिणे किंवा कफ शरीरात घट्ट साचून राहीला असेल तर गरम पाण्याची वाफ घेणे असे काही ना काही उपाय केले जातात.  पण घरच्या घरी हे उपाय करताना अपघात घडण्याची शक्यता असते (home accident prevention  how to take care while having water vapor in cold and cough most common household accidents).

कधी वाफ घ्यायला घेतलेले गरम पाणी अंगावर सांडते तर कधी वाफ एकदम तोंडावर किंवा नाकावर बसल्याने त्वचा लाल होऊन सोलवटल्यासारखी होते. नंतर याची आग आग होते आणि काहीवेळा त्वचेवर हे डाग कित्येक दिवस तसेच राहतात. करायला गेलो एक आणि झाले वेगळेच असे होऊ नये म्हणून अशाप्रकारचे घरगुती उपाय करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी, ती कोणती पाहूया ...

(Image : Google)
(Image : Google)

१. गरम पाणी घेताना

आपण सर्दीने आणि कफाने आधीच हैराण असतो. त्यामुळे आपण असे काही उपाय करायला जातो तेव्हा आपल्याला काही सुधरत नसते. कधी चटका लागल्याने, कधी कोणाशी बोलत असल्याने तर कधी आणखी काही कारणाने आपला हात किंवा हातातला चिमटा सटकण्याची शक्यता असते. असे झाले तर हे पाणी अंगावर सांडते आणि चटका बसतो. पण असे होऊ नये यासाठी शांतपणे पाणी घ्यावे. पाणी घेताना हाताची पकड घट्ट असेल याची काळजी घ्यावी. तरीही भाजलेच तर भाजलेला भाग लगेच गार पाण्याखाली धरावा म्हणजे चट्टा, डाग पडत नाही. त्यानंतर एखादे क्रिम लावावे जेणेकरुन या भागाला होणारी आग कमी होईल.

२. प्रत्यक्ष चेहऱ्यावर वाफ घेताना

पातेल्यातून किंवा वेपोरायजरमधून वाफ घेताना आपण एकदम त्यावर तोंड नेतो. असे केल्याने गरम पाण्याची वाफ एकदम तोंडावर आणि सगळ्यात आधी नाकावर येते. यामुळे नाक, तोंड्याच्या जवळचा भाग भाजू शकतो. त्यामुळे एकदम वाफेवर तोंड न घालता वाफेच्या गरमीचा अंदाज घेऊन मग तोंड वाफेजवळ न्यावे. दर काही वेळाने तोंड वाफेवरुन बाहेर काढावे. यामुळे चटका बसून आग होत नाही आणि चेहरा आणि नाक अपघातापासून वाचू शकतात. 

(Image : Google)
(Image : Google)

३. वाफ घेण्याचे प्रमाण 

जास्त सर्दी असेल तर काही जण सलग तासभर वाफ घेत राहतात. यामुळे बरे वाटत असले तरी ते त्वचेसाठी अजिबात चांगले नाही. यामुळे त्वचा हुळहुळते आणि सोलवटून निघाल्यासारखी होते. त्यामुळे दिवसातून २ वेळा ठराविक वेळच वाफ घ्यावी. तसेच सलग ५-७ दिवस वाफ घेण्याची गरज नसते. २-३ दिवस वाफ घेऊन सर्दी-कफ बरा व्हायला हवा. अन्यथा याबाबत डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेणे केव्हाही अधिक चांगले.   

Web Title: home accident prevention most common household accidents how to take care while having water vapor in cold and cough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.