गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. घरोघरच्या महिलांची साफ सफाईचा लगबग सुरू झाली असेल. कमी वेळात स्वच्छ, नीटनेटकं घर दिसायला हवं असं प्रत्येकालाच वाटतं. कारण घर आवरत असताना डोक्यात खूप काही असतं पण वेळेअभावी अनेक गोष्टी करायच्या राहून जातात.
आरोग्याच्या दृष्टीनं पाहता साफसफाई आठवड्यातून एकदा व्हायलाच हवी कारण नकळतपणे बॅक्टेरिअल इन्फेक्शनचे आजार पसरत जातात. चादरी, उशा यांचे कव्हर, सोफा या वस्तूंचा वापर रोज केला जातो. जेव्हा घरामध्ये स्वच्छतेचा प्रश्न येतो तेव्हा अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात, ज्या आपण अनेकदा साफ करायला विसरतो.
बेडशीट, उशाचे कव्हर आणि पडदे इत्यादी गोष्टी आठवड्यातून दोनदा स्वच्छ केल्या पाहिजेत. अंथरूण स्वच्छ ठेवण्याव्यतिरिक्त, उशा देखील स्वच्छ ठेवायला हव्यात. सोफा कुशनच्या बाबतीत बहुतेक लोक ते विसरतात. घाणेरड्या आणि दुर्गंधीयुक्त सोफा कुशनमुळे तुमच्या घराचे सौंदर्यच बिघडणार नाही, तर आजार पसरण्याची भीतीही असते. सोफा, कुशन स्वच्छ करण्यासाठी काही टिप्स वापरल्या तर लवकरात लवकर स्वच्छ करण्यास मदत होऊ शकते.
घरी उशांप्रमाणे, आपण सोफा कुशन देखील स्वच्छ करू शकता. सोफ्यांप्रमाणेच कुशनचीही काळजी घेणे आवश्यक आहे. जर थोडी घाण असेल तरी ते लगेच खराब दिसून येतं. जर तुम्हाला सोफ्याचे कुशन धुणे अवघड वाटत असेल, तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, अशा काही टिप्स ज्याचे पालन करून तुम्ही ते लगेच साफ करू शकता.
कुशनचे कव्हर कसे साफ करायचे?
उशांप्रमाणे, बहुतेक सोफा कुशनमध्ये कव्हर्सचा वापर केला जातो. विशेषतः जर कुशनचे फॅब्रिक कॉटनचं असेल तर ते सहज साफ करता येते. आपण वॉशिंग मशीन किंवा डिटर्जंटच्या पाण्यात भिजवून ते धुवू शकता. जर ते खूप घाणेरडे असेल तर कोमट पाण्यात डिटर्जंट पावडर घाला. काही वेळ भिजवून ठेवा आणि नंतर ब्रशच्या मदतीनं ते स्वच्छ करा. आठवड्यातून दोनदा कुशन कव्हर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा.
ओल्या कापडानं साफ करा
कित्येक वेळा घरातील पाळीव प्राणी सोफ्यावर बसतात, ज्यामुळे त्यांचे केस ,अन्नकण इत्यादी. सहजपणे त्यात अडकतात. एवढेच नाही तर ते कधी कधी ते लघवी करतात, अशा स्थितीत डाग किंवा घाण काढण्यासाठी ओल्या कापडाचा वापर करा. डिटर्जंट किंवा इतर कोणत्याही क्लीनरचे लिक्विड तयार करा आणि नंतर ज्या ठिकाणी घाण आहे ती जागा स्वच्छ करण्यासाठी कापड ओलं करा. यानंतर, जेव्हा ते सुकेल तेव्हा पुन्हा स्वच्छ करा.
घाणेरडा वास कसा घालवायचा?
जर तुमच्या सोफा कुशनला दुर्गंधी येत असेल तर ती साफ करण्यापूर्वी स्प्रे करून घ्या. एका स्प्रे बॉटलमध्ये बेकिंग पावडर आणि लिंबाच्या सालीच्या पावडरचे लिक्विड तयार करा. आता उशीवर फवारणी करा, त्यामुळे वास कमी होईल. उशीचे फॅब्रिक खूप मऊ असते, म्हणून ते धुण्याऐवजी ड्राय क्लिन करून घ्या. या व्यतिरिक्त, आपण इच्छित असल्यास, आपण व्हॅक्यूम क्लिनरच्या मदतीने देखील स्वच्छ करू शकता.
स्टिम वॉशची मदत घ्या
आपण स्टीम वॉशच्या मदतीने सोफा कुशन साफ करू शकता. महागडी कुशन टॅगसह येतात, टॅगवर दिलेल्या सूचनांनुसार साफ करता येतात. अशावेळी फॅब्रिक लक्षात घेऊन स्टीम वॉश करा, तसेच टॅगवर दिलेली खबरदारी घ्या. यामुळे सोफा कुशन पूर्वीप्रमाणे चमकेल आणि लवकर खराब होणार नाही.
ऊन्हात ठेवा
कुशन्स रोज साफ करता येत नाहीत. पण जर रोज २ तास उन्हात ठेवाल तर कुशन्स स्वच्छ होऊ शकतात. त्यावरची धूळ माती सहज निघून जाते. याशिवाय कुशन्सवरील लहान लहान बॅक्टेरियासुद्धा नष्ट होतील. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सोफा कुशन साफ करण्यासाठी या सर्व टिप्स वापरू शकता.