Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Home Hacks Ideas :  कपडे चुरगळलेत, पण इस्त्री करायला वेळच नाही? घ्या सोप्या ट्रिक्स, कपडे होतील पटकन कडक

Home Hacks Ideas :  कपडे चुरगळलेत, पण इस्त्री करायला वेळच नाही? घ्या सोप्या ट्रिक्स, कपडे होतील पटकन कडक

Home Hacks Ideas : जर कपडे जास्त चुरगळलेले असतील तर घरीच इस्त्री वापरू शकता.  स्प्रे बाटलीतून थोडेसे पाणी कपड्यांवर घालून  इस्त्री फिरवल्यास कपडे बर्‍याच प्रमाणात सरळ होतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 03:29 PM2022-04-20T15:29:37+5:302022-04-20T15:58:52+5:30

Home Hacks Ideas : जर कपडे जास्त चुरगळलेले असतील तर घरीच इस्त्री वापरू शकता.  स्प्रे बाटलीतून थोडेसे पाणी कपड्यांवर घालून  इस्त्री फिरवल्यास कपडे बर्‍याच प्रमाणात सरळ होतात.

Home Hacks Ideas : Easy ironing hacks for those who dont like  | Home Hacks Ideas :  कपडे चुरगळलेत, पण इस्त्री करायला वेळच नाही? घ्या सोप्या ट्रिक्स, कपडे होतील पटकन कडक

Home Hacks Ideas :  कपडे चुरगळलेत, पण इस्त्री करायला वेळच नाही? घ्या सोप्या ट्रिक्स, कपडे होतील पटकन कडक

कपडे धुणे, वाळवणे, इस्त्री करणं हे खूप अवघड काम आहे. अनेकांना हे अजिबात आवडत नाही. कपडे धुतले तरी इस्त्री करताना नेहमीच त्रास होतो. जर घाईघाईने तयारी करावी लागली तर ते आणखी कठीण होते.  (Home Hacks Ideas) जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल जे कपडे इस्त्री करण्यास  खूप आळस दाखवतात. तर आम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत. (Easy ironing hacks for those who don't like) ज्याचा वापर करून तुम्ही कमी वेळात कपड्यांना कडक इस्त्री करू शकता.

१) घाईघाईत इस्त्रीचा वापर करू नका

जर कपडे जास्त चुरगळलेले असतील तर घरीच इस्त्री वापरू शकता.  स्प्रे बाटलीतून थोडेसे पाणी कपड्यांवर घालून  इस्त्री फिरवल्यास कपडे बर्‍याच प्रमाणात सरळ होतात. कपड्यांवर स्प्रे करून एकदा दोनदा फिरवल्यास कपडे पटकन कडक होतील. इस्त्री व्यवस्थित तापल्यानंतरच कपड्यांवर फिरवा. 

  'मेरी शादी २६ एप्रिल को है!' व्हायरल होतेय विशालच्या गर्लफ्रेंडची १० रूपयांची नोट; नेटिझन्स म्हणाले....

२) स्प्रे केल्यानंतर इस्त्री करा

पाण्याचे काही थेंब चमत्कार करू शकतात आणि म्हणून इस्त्रीपुर्वी फॅब्रिकवर थोडेसे पाणी शिंपडणे महत्वाचे आहे. लोकांना असे वाटते की हे फक्त कॉटनच्या  कपड्यांसाठी आहे, परंतु तसे नाही. हे सामान्य कपड्यांसाठी देखील तितकेच उपयुक्त असल्याचे सिद्ध होते. जर तुम्ही वाफेची इस्त्री वापरत असाल तर त्याचाही तसाच फायदा मिळेल.

रोज स्वच्छ घासले तरी दात पिवळेच दिसतात? पांढऱ्याशुभ्र, चमकदार दातांसाठी १० उपाय, कायम चमकदार दिसतील दात

३) कपड्यांना लटवकून ठेवा

एकदा कपडे इस्त्री केल्यानंतर त्यांना हँगरला लावा. कापड गरम असताना काही लहान रेशा राहिल्या तरी गुरुत्वाकर्षणामुळे त्या दूर होऊ शकतात. कपडे हँगरमध्ये व्यवस्थित लटकवा, यामुळे नवीन चुरगळ्या पडण्याचा होण्याचा धोकाही कमी होतो. 

४) व्हिनेगरचा वापर

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की व्हिनेगर वापरून तुम्ही कपडे व्यवस्थित ठेवता येऊ शकतात. ही एक चांगली युक्ती सिद्ध होऊ शकते. पाण्यात थोडे पांढरे व्हिनेगर घालून ते विरघळवा. 1 ग्लास पाण्यात 1 चमचे पांढरे व्हिनेगर घाला. आता हे पाणी फवारून तुमचे काम करा. असे केल्याने कपडे लवकर सरळ होतील. पण व्हिनेगर थोडेच घालावे लागेल. जास्त मिक्स करू नका, हे फक्त चुरगळलेला भाग लवकर काढून टाकण्यासाठी आहे. जास्त प्रमाणात वापरू नका नाहीतर फॅब्रिक खराब होऊ शकते.

कितीही स्वच्छ केलं तरी टॉयलेट, बाथरूममधून वास येतो? 5 उपाय, दुर्गंध कमी होऊन घर नेहमी वाटेल फ्रेश

५) स्ट्रेटनरचा वापर

ज्याप्रमाणे तुम्ही इस्त्रीने कपडे पटकन प्रेस करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही स्ट्रेटनर देखील वापरू शकता. चुरगळलेले कपडे व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही स्ट्रेटनरचा वापर करू शकता. कपडे दोन्ही बाजूंनी एकत्र प्रेस करा. 

Web Title: Home Hacks Ideas : Easy ironing hacks for those who dont like 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.