Join us   

कानात मळ झाला आहे? पिन-इअरबड्स घालू नका, पाहा ३ उपाय- बहिरेपणाचा धोका टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2024 3:59 PM

Home Remedies: Effective earwax removal : कानातला मळ काढणे झाले सोपे, हात न लावता-इअरबड्स न घालता मळ झटक्यात निघेल

हवेतील धूळ, माती, प्रदुषणामुळे स्किन आणि केस तर खराब होतातच, यासह कानातही मळ जमा होत जाते. काही दिवस कानातला साचलेला मळ साफ केला नाही तर, कान जड होणे, कानाला खाज येणे, शिवाय कान दुखायला सुरुवात होणे, यासह कानाच्या निगडीत समस्या निर्माण होतात. कानात मळ साचल्यावर बरेचजण त्याला साफ करण्यासाठी माचीसच्या काड्या, सेफ्टी पिन, गाडीची चावी, इअरबड्स अशा गोष्टी वापरतात (Ear Wax Removal).

पण या गोष्टींचा वापर करून कानातली घाण काढणे घातक ठरू शकते. यात जरातरी निष्काळजीपण झाला तर, कानाच्या पडद्याला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही (Cleaning Tips). जर आपल्याला कानात कोणतीही गोष्ट न घालता मळ काढायचा असेल तर ३ ट्रिक्सचा वापर करा. यामुळे नक्कीच कान साफ होईल(Home Remedies: Effective earwax removal).

तेल

कानातली घाण काढण्यासाठी आपण तेलाचा वापर करू शकता. ऑलिव्ह ऑईल, मोहरीचे तेल किंवा बदामाचे तेल वापरून कानातली घाण काढता येऊ शकते. कानातला मळ काढण्यासाठी सर्वात आधी थोडे तेल गरम करा. तेल कोमट झाल्यानंतर कानात घाला. काही मिनिटे तसेच ठेवा, आणि नंतर कोमट पाण्याने स्वच्छ करा. कोमट तेलामुळे कानातील मळ सहज मऊ होऊन बाहेर पडेल.

झोपण्यापूर्वी पाणी प्यावे का? किती प्यावे? तज्ज्ञ सांगतात, रात्री भरपूर पाणी पिऊन झोपत असाल तर..

कोमट पाणी

कोमट पाण्याच्या वापराने आपण कानातला मळ काढू शकता. यासाठी एका कपमध्ये कोमट पाणी घ्या. नंतर कानात हळुवारपणे घाला. कोमट पाण्यामुळे कानातला मळ मऊ होऊन सहज बाहेर येईल.

बाहेरचं चमचमीत खाऊनही वजन वाढणार नाही! फॉलो करा ४-३-२-१ चा वेट लॉस रूल

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा फक्त जेवणासाठी नसून, कानातला मळ काढण्यासाठीही मदत करते. यासाठी एका वाटीत पाणी आणि बेकिंग सोडा मिक्स करून पेस्ट तयार करा. बेकिंग सोड्याच्या पेस्टची काही थेंब कानात घाला. काही वेळ तसेच ठेवा. काही मिनिटात कानातला मळ सहजरित्या बाहेर येईल.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यस्वच्छता टिप्स