Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सर्दीमुळे किंवा तेलकट- तुपकट फराळ खाल्ल्याने घसा दुखतो? १ सोपा उपाय- एका रात्रीतून मिळेल आराम

सर्दीमुळे किंवा तेलकट- तुपकट फराळ खाल्ल्याने घसा दुखतो? १ सोपा उपाय- एका रात्रीतून मिळेल आराम

Home Remedies For Bad Throat & Cough: थंडीमुळे किंवा तेलकट- तुपकट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे जर तुमचा घसा धरल्यासारखा झाला असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा..(how to get relief from throat infection?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2024 01:48 PM2024-10-31T13:48:59+5:302024-10-31T13:55:07+5:30

Home Remedies For Bad Throat & Cough: थंडीमुळे किंवा तेलकट- तुपकट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे जर तुमचा घसा धरल्यासारखा झाला असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा..(how to get relief from throat infection?)

home remedies for Bad Throat & Cough, how to get relief from throat infection, simple ayurvedic solution for reducing throat pain | सर्दीमुळे किंवा तेलकट- तुपकट फराळ खाल्ल्याने घसा दुखतो? १ सोपा उपाय- एका रात्रीतून मिळेल आराम

सर्दीमुळे किंवा तेलकट- तुपकट फराळ खाल्ल्याने घसा दुखतो? १ सोपा उपाय- एका रात्रीतून मिळेल आराम

Highlightsउपाय अतिशय सोपा असून प्रत्येकालाच अगदी सहज करता येईल असा आहे.

सध्या वातावरणात थोडी थंडी जाणवायला लागली आहे. ऋतू बदलायला सुरुवात झाली की त्याचा परिणाम आधी तब्येतीवर होतो. म्हणूनच सध्या अनेकांना सर्दी, खोकला असं व्हायरल इन्फेक्शन होत आहे. सर्दी होण्याआधी एक- दोन दिवस घसा खूप दुखतो. अगदी पाणी पिणंही अनेकांना नकोसं होतं. एकवेळ नाक गळणे, सटासट शिंका येणे हे त्रास परवडले. पण घसा दुखणे नको रे बाबा असं म्हणण्याची वेळ येते. दिवाळीदरम्यान आपलं बरंच तेलकट- तुपकट खाणं होतं. त्यामुळेही नंतर घसा खवखवण्याचा त्रास अनेकांना होतो (how to get relief from throat infection?). या कोणत्याही कारणामुळे जर तुमचा घसा दुखायला लागला असेल तर हा एक सोपा उपाय लगेचच करून पाहा (simple ayurvedic solution for reducing throat pain). अगदी एकदाच उपाय केला तरी बराच फरक पडेल.(home remedies for Bad Throat & Cough)

 

सर्दीमुळे घसा दुखत असल्यास घरगुती उपाय

सर्दीमुळे घसा दुखायला सुरुवात झाली असेल तर ते दुखणं कमी करण्यासाठी कोणता घरगुती उपाय करावा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी thefitcodebycharuarora या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

लक्ष्मीपुजनाच्या दिवशी पारंपरिक लूक करून खुलवा तुमचं सौंदर्य!! मराठी अभिनेत्रींकडून घ्या खास टिप्स..

यामध्ये त्यांनी सांगितलेला उपाय अतिशय सोपा असून प्रत्येकालाच अगदी सहज करता येईल असा आहे.

हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये मध, आल्याचा ताजा रस सम प्रमाणात घ्या. त्यामध्ये चिमूटभर दालचिनी पावडर आणि चिमूटभर मिरेपूड घ्या. हे सगळे पदार्थ मिळून ते साधारण १ टेबलस्पून होतील एवढेच त्याचे प्रमाण असावे.

 

सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यानंतर रात्री झोपण्यापुर्वी हे घरगुती आयुर्वेदिक औषध खा.

लक्ष्मीपूजन: पुरणपोळी चवदार होण्यासाठी ५ टिप्स; इतकी स्वादिष्ट होईल की एखादी पोळी जास्तच खाल...

ते खाल्ल्यानंतर साधारण ३ ते ४ तास काही खाऊ नका. अगदी पाणीही पिऊ नका. त्यामुळेच रात्री झोपण्यापुर्वी हे औषध घेणे अधिक चांगले. सकाळी उठल्यानंतर घसादुखी बऱ्याच प्रमाणात कमी झालेली जाणवेल. 


 

Web Title: home remedies for Bad Throat & Cough, how to get relief from throat infection, simple ayurvedic solution for reducing throat pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.