Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मान्सून सुरु होताच सर्दी - खोकल्याने घेरलं? सद्गुरू सांगतात ४ घरगुती उपाय; श्वासाचा त्रास होईल दूर

मान्सून सुरु होताच सर्दी - खोकल्याने घेरलं? सद्गुरू सांगतात ४ घरगुती उपाय; श्वासाचा त्रास होईल दूर

Home Remedies for Cold and Cough During Monsoon, Tips by Sadguru : हवामान बदलले की सर्दी, खोकला, ताप, कफचा त्रास होतो? सद्गुरुंनी सांगितलेले ४ उपाय करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2024 03:35 PM2024-06-28T15:35:55+5:302024-06-28T15:38:37+5:30

Home Remedies for Cold and Cough During Monsoon, Tips by Sadguru : हवामान बदलले की सर्दी, खोकला, ताप, कफचा त्रास होतो? सद्गुरुंनी सांगितलेले ४ उपाय करून पाहा..

Home Remedies for Cold and Cough During Monsoon, Tips by Sadguru | मान्सून सुरु होताच सर्दी - खोकल्याने घेरलं? सद्गुरू सांगतात ४ घरगुती उपाय; श्वासाचा त्रास होईल दूर

मान्सून सुरु होताच सर्दी - खोकल्याने घेरलं? सद्गुरू सांगतात ४ घरगुती उपाय; श्वासाचा त्रास होईल दूर

कडाक्याच्या उष्णतेनंतर आता हवामानात बदल झाला आहे (Sadguru Jaggi Vasudev). मान्सूनचेही आगमन झाले आहे. मात्र हवामानातील बदलामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भावही वाढला आहे (Health Tips). जिवाणू, विषाणू, बुरशीजन्य संसर्ग यामुळे अनेक आजार शरीराला घेराव घालतात (Monsoon). हे बॅक्टेरिया सर्वात आधी अन्नद्वारे तोंडात प्रवेश करतात. ज्यामुळे श्वसनाच्या समस्या वाढतात.

शिवाय सर्दी, खोकला, ताप आणि कफमुळे श्वास घेण्यात अडचण निर्माण होते. बरेच जण सर्दी - ताप, खोकला झाल्यावर डॉक्टरांकडे जाणं टाळतात. जर आपल्याला ऋतू बदलांमुळे होणाऱ्या आजाराचा त्रास होत असेल तर, सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी शेअर केलेले टिप्स फॉलो करून पाहा. तब्येत सुधारेल(Home Remedies for Cold and Cough During Monsoon by Sadguru).

सद्गुरुंनी शेअर केले ४ मेथड

- मान्सूनमध्ये ऋतू बदलांमुळे होणाऱ्या आजारापासून सुटका हवी असेल तर, ४ गोष्टी फॉलो करा. सर्वात आधी या दिवसात दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे बंद करा.

अनुष्का शेट्टीला झालाय हसण्याचा दुर्मिळ आजार; उगाचच हसण्याचा हा आजार नेमका असतो काय?

- जर आपल्याला कफचा त्रास होत असेल तर, एका बाऊलमध्ये काळीमिरीची पावडर घ्या. त्यात मध घालून मिक्स करा. १० ते १२ तासांसाठी तसेच ठेवा किंवा रात्रभर ठेवा. सकाळी उठल्यानंतर खा. यामुळे कफाचा त्रास कमी होईल.

- सद्गुरूंनी सांगितले मान्सूनमध्ये प्राणायाम नियमित करावे. यामुळे श्वास घेण्यात अडचण होणार नाही.

- जर आपल्याला दमा, कफचा त्रास असेल तर, हळद-कापूर आणि हळद-कडुलिंब यांचे मिश्रण करून खा. यामुळे कफचा त्रास कमी होईल.

कफचा त्रास कमी करण्यासाठी डॉक्टर सांगतात..

- इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत डॉ. रेणू सोनी सांगतात, 'जेव्हा सर्दी खोकल्याचा त्रास वाढतो, तेव्हा श्वसनमार्गातील कफ देखील वाढते. ज्यामुळे बऱ्याचदा श्वास घेण्यातही अडचण निर्माण होते. अशावेळी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे टाळावे. यामुळे कफचे उत्पादन वाढते. ज्यामुळे घशाचा त्रास वाढू शकते.

आपण खाताय ती प्लास्टिकची साखर तर नाही ना? FSSAI सांगते, भेसळयुक्त साखर ओळखण्याची १ सोपी ट्रिक

- यासाठी गोल मिरची देखील फायदेशीर ठरू शकते. गोल मिरचीमध्ये पाइपरिन कंपाऊंड असते. जे कफ पातळ करते. ज्यामुळे सर्दी आणि खोकल्याचा त्रास कमी होतो. यासह योग आणि प्राणायाम देखील ऋतू बदलांमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळवून देऊ शकतात.

Web Title: Home Remedies for Cold and Cough During Monsoon, Tips by Sadguru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.