पावसाच्या दिवसात खाण्यात तेलकट, मसालेदार पदार्थ बरेच येत असतात. असे पदार्थ खाल्ल्यानंतर पचायला बराचवेळ लागतो. खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन झालं नाही तर गॅस, कॉन्स्टिपेशन, जुलाब, एसिडिटी असे पचनाचे विकार उद्भवतात. (Home remedies for constipation by baba ramdev) उन्हाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात पचनक्रिया संथपणे कार्य करते त्यानुसार खाण्यापिण्याच्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. अन्न पचायला जास्तवेळ लागतो त्यामुळे कमी प्रमाणात आणि योग्य तेच खायला हवे. (Yoga for acidity, constipation, gas Ramdev Babas tips)
एलोवेरा ज्यूस प्या
एलोवेरा जेलचा वापर त्वचेपासून खाण्यापर्यंत सर्वच ठिकाणी केला जातो. पावसाळ्याच्या दिवसात पर्यावरणात मॉईश्चर असल्यामुळे सुक्ष्मजीव असतात. यामुळे अन्न दुषित होते. अशात गॅसचा त्रास टाळण्यासाठी एलोवेरा ज्यूसचे सेवन करा. दोन चमचे एलोवेरा ज्यूसमध्ये अर्धा कप पाणी मिसळा. व्यवस्थित एकत्र करून दिवसभरातून २ वेळा या ज्यूसचे सेवन करा.
चिया सिड्स
चिया सिड्स तब्येतीसाठी फायदेशीर ठरतात कारण यात फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. यामुळे रक्तदाबाची समस्या कमी होते. हृदयाच्या आजारांचा धोकाही कमी होतो. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल किंवा गॅसची समस्या उद्भवत असेल तर चिया सिड्सचा आहारात समावेश करा. फायबर्स व्यतिरिक्त यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस असते.
दूध प्या
पावसाळा हा ऋतू आनंदासोबत आजारही घेऊन येतो. या वातावरणात व्हायरल फ्लूचा त्रास होणं सामान्य आहे. पोटाच्या संबंधित समस्याही उद्भवतात. गॅसच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दूध प्यायला हवं. दूधात एक चमचा तूप मिसळून रात्री झोपण्याआधी दूध प्या. दूधात तूप घालून प्यायल्यानं शरीर हेल्दी राहतं खासकरून जेव्हा तुम्हाला थकवा आला असेल तेव्हा हा उपाय करा.
पावसाळ्यात अशी घ्या काळजी
१) पावसाळ्यात हवेत मॉईश्चर जास्त असल्यानं बॅक्टेरिया जास्त तयार होतात. म्हणूनच या वातावरणात साफ-सफाई करणं गरजेचं असतं. काहीही खाण्याआधी स्वच्छ हात धुवा.
२) पावसाळ्यात शिळे अन्नपदार्थ खाऊ नका. शिळे खाल्ल्यानं जुलाब- उलट्यांचा त्रासस होऊ शकतो.
३) रस्त्यावर विकले जाणारे पदार्थ खाणं टाळा. यात मायक्रो-ऑर्गेनिज्म शिरतात त्यामुळे अन्न अन्हेल्दी होतं. म्हणून घरी बनवलेले अन्न पदार्थ खाण्याला जास्त प्राधान्य द्या.